Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Navy Officers Wife Dies: तिकीट तपासणी करताना वाद झाला. या वादानंतर टीसीने महिलेला धावत्या ट्रेनमधून ढकलून दिले. या घटनेत महिलाचा मृत्यू झाला. ही महिला नेव्ही अधिकाऱ्याची बायको होती. या घटनेमुळे खळबळ उडाली.
Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू
Navy Officer’s Wife DiesSaam Tv News
Published On

Summary -

  • तिकीट तपासणीदरम्यान वाद झाल्यावर टीसीने महिला धावत्या ट्रेनमधू ढकलले

  • धावत्या ट्रेनमधून ढकलल्याने आरती यादव यांचा जागीच मृत्यू

  • कुटुंबीयांच्या तक्रारीवर टीसीविरुद्ध हत्या गुन्हा दाखल

  • मृत महिला नेव्ही अधिकाऱ्याची पत्नी होती

उत्तर प्रदेशच्या इटावा रेल्वे स्थानकाजवळ भयंकर घटना घडली. तिकीट तपासणी करताना टीसीसोबत वाद झाला. या वादादरम्यान टीसीने नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोला धावत्या ट्रेनमधून ढकलीन दिलं. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना पाटना- आनंद विहार सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये घडली. नेव्ही अधिकाऱ्याची बायको दिल्लीला जात होती. रेल्वे रुळाजवळ तिचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे खळबळ उडाली.

टीसीसोबत तिकिटाच्या वादातून पाटणाहून आनंद विहारला जाणाऱ्या विशेष ट्रेनमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाला. टीसीने आधी तिचे सामान ट्रेनमधून खाली फेकले आणि नंतर तिला ढकलले. धावत्या ट्रेनमधून पडून या महिलेचा मृत्यू झाला, असा आरोप महिलेच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत महिला नेव्ही अधिकाऱ्याची बायको होती. रेल्वे जीआरपीने टीसीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू
Shocking: लग्नाच्या पहिल्याच रात्री भयंकर घडलं, शरीरसंबंधाला बायकोचा नकार; संतापलेल्या नवऱ्याने डोक्यात हातोडा घातला अन्...

आरती यादव असं या मृत महिलेचे नाव होते. ही घटना बुधवारी सकाळी इटावा येथील भरथाना आणि साहोन रेल्वे स्थानकांदरम्यान घडली . मृत महिलेचा मेहुणा अनिल कुमार यांनी आरोप केला आहे की, तिकिटावरून टीसी संतोष कुमार यांच्याशी झालेल्या वादानंतर त्याने तिला धावत्या ट्रेनमधून ढकलले. आरती यादव या कानपूर देहात येथील रहिवासी होत्या. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे आणि रेल्वे जीआरपीकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मृत महिलेचा मेहुणा अनिल कुमार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर टीसीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू
Shocking : संतापजनक ! पैशांसाठी आई मला शेजाऱ्याकडं पाठवायची; दहावीतील विद्यार्थिनीचा शिक्षिकेकडे धक्कादायक खुलासा

तक्रारीत पोलिसांनी आरोप केला आहे की, आरती यादव कानपूर स्टेशनवरून एका विशेष ट्रेनने प्रवास करत होती आणि कोच S11 च्या सीट क्रमांक चारवर आरक्षित होती. ती तिचे औषध घेण्यासाठी दिल्लीला जात होती पण चुकून चुकीच्या ट्रेनमध्ये चढली. ट्रेन भरथाना रेल्वे स्टेशनजवळ येताच टीसी संतोष कुमार यांनी त्यांच्यासोबत वाद घातला. टीसीने आधी आरती यांचे सामान चार किलोमीटर पुढे फेकले आणि नंतर आरतीला ट्रेनमधून ढकलून दिले. ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू
Shocking : हृदयद्रावक! वडिलांची नजर चुकवून ४ वर्षाचा शिवराज ट्रॅक्टरवर चढला, अचानक गिअर पडला अन् थेट...

आरती यादव यांचे पती अजय यादव हे नौदलात कार्यरत आहेत आणि सध्या ते चेन्नई येथे तैनात आहेत. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रेल्वे सीओ उदय प्रताप सिंह यांनी सांगितले की, 'त्यांना कुटुंबाकडून तक्रार मिळाली आहे. तक्रारीच्या आधारे, टीसीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जर ते घटनेत दोषी आढळले तर त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल.'

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू
Shocking: लग्नात फोटोसेशन सुरू असताना स्टेज कोसळला, नवरा-नवरी, भाजप नेत्यासह १० जण पडले; पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com