Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Volcano Ethiopia : इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. यामुळे आता जग भस्म होणार असल्याचा दावा करण्यात आलाय.पण आफ्रिकेतील इथियोपियात झालेल्या ज्वालामुखी उद्रेकामुळे खरंच जगावर परिणाम होणार आहे का.? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात.
Volcano Ethiopia :
Viral video of Ethiopia volcano eruption triggers global panic; ash cloud rumours spread rapidly.saam tv
Published On
Summary
  • या व्हिडिओत भयंकर अशा आगीच्या ज्वाळा दिसतायत.

  • ज्वालामुखीच्या उद्रेकाची राख भारतात आल्यामुळे भीतीचं वातावरण

  • आफ्रिकेतील इथिओपियातून भारतात राखेचे ढग आले?

हा व्हिडिओ पाहून थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. किती भयंकर असा हा ज्वालामुखी आहे. काही क्षणात इथे होत्याचं नव्हतं झालंय. इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने त्याचे भयंकर परिणाम भारतात पाहायला मिळत असल्याचा दावा करण्यात आलाय. इथिओपियात ज्वालामुखीचाचा उद्रेक झाल्याने राखेचे ढग भारतापर्यंत आलेयत. एवढ्या लांब हे राखेचे ढग आल्याने हा ज्वालामुखी आता जग भस्म करणार असल्याचा दावा करण्यात आलाय. यामुळे भीतीचं वातावरण पसरलंय. राखेच्या ढगांमुळे काही विमानंही रद्द करण्यात आली.

Volcano Ethiopia :
Ethiopia Volcano Ash: सावधान! ज्वालामुखीची राख भारतात; दिल्लीसह राजस्थानात पसरतंय विषारी धुकं, महाराष्ट्राची परिस्थिती काय?

व्हायरल सत्य

21 नोव्हेंबरला इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक झाला

जगभरातील अनेक देशांच्या आकाशात राखेचे ढग पसरले

आफ्रिकेतील इथिओपियातून भारतात राखेचे ढग आले

आता व्हायरल होत असलेला व्हिडिओ AI निर्मित

रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांमधून लावा बाहेर आलेला नाही.

Volcano Ethiopia :
12 हजार वर्षांनंतर ज्वालामुखीचा उद्रेक; राखेचे ढग दिल्ली-मुंबईत,कोणत्या विमानांच्या वेळांमध्ये बदल? VIDEO

या व्हायरल व्हिडिओमुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झालीय. राखेच्या ढगांमुळे सगळीकडे धुराचं वातावरण दिसतं. प्रदुषणामुळे लोकांना त्रासही होतो. इथियोपियात ज्वालामुखीचा उद्रेक झाला हे खरं आहे. पण, आता आणखी काही व्हिडीओ व्हायरल करण्यात आलेयच ते AI निर्मित आहेत. त्यामुळे अशा व्हिडिओवर विश्वास ठेवू नका. ज्वालामुखीच्या या उद्रेकामुळे जग भस्म होणार हा दावा आमच्या पडताळणी असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com