Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

Political Tremors in Maharashtra: महायुतीतील अंतर्गत वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय.. त्यामुळे 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार? अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जातेय...मात्र महायुतीत वादाची ठिणगी का पडली? सत्ताधारी मित्रपक्षाला भाजप कसा घेरतोय...
Rising tensions in Maharashtra Mahayuti Key leaders in conflict ahead of December 2 elections
Rising tensions in Maharashtra Mahayuti Key leaders in conflict ahead of December 2 electionsSaam Tv
Published On

मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे, असं सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी महायुतीच्या फुटीचे संकेत दिलेत....आणि त्याला कारण ठरलंय कोकणात शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरावर धाड टाकत पैसे वाटपाचा केलेला भांडाफोड... त्यामुळेच राज्यात सुरु झालंय बदलासत्र...आणि त्याचा पहिला घाव घातला तो शिंदेसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर... भाजप आमदाराच्या दबावामुळेच भल्या पहाटेच 100 पोलिसांनी आपल्या घरावर धाड टाकल्याचा आरोप संतोष बांगरांनी केलाय... मात्र हिंगोली पोलिसांनी हा दावा फेटाळून लावलाय...

एकीकडे संतोष बांगरांवरच्या धाडीची चर्चा सुरु असतानाच दुसरा दणका बसलाय तो सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना... सरकारने सिडकोतील 4500 कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिलेत.. त्यासाठी कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करुन शिरसाटांची कोंडी केलीय...त्यामुळे ही युतीच्या फुटीचे संकेत असल्याची चर्चा आहे... त्यावर शिंदेसेनेने मात्र वेट अँड वॉचची भूमिका घेतलीय...

खरंतर या वादाला सुरुवात झाली ती भाजपनं शिंदेसेनेविरोधात सुरु केलेल्या ऑपरेशन लोटसमुळे... मात्र ऑपरेशन लोटसमुळे शिंदेंचं नाराजीनाट्य कसं रंगलं होतं..

शिंदेसेनेच्या मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार

तक्रारीनंतर फडणवीसांनी शिंदेसेनेला सुनावलं

फडणवीस, रवींद्र चव्हाणांविरोधात अमित शाहांकडे तक्रार

हुतात्मा दिनाच्या कार्यक्रमातही बोलणं टाळलं

पालघरच्या सभेतून भाजपवर टीकास्त्र

खरंतर शिंदेंनी शाहांकडे तक्रार केल्यानंतर अमित शाहांनी शिंदेंच्या तक्रारी बेदखल केल्या... त्यामुळे शिंदेसेनेनं आपलं उपद्रव मूल्य दाखवायला सुरुवात केलीय... तर भाजपनंही शिंदेसेनेला जशास तसं प्रत्युत्तर देत संघर्षाला हवा दिलीय... त्यामुळे 2 डिसेंबरला राज्यातील 236 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीची निवडणूक असताना महायुतीतील तणावाचा मतदारांवर प्रभाव पडणार हे मात्र निश्चित..अंतर्गत संघर्षाची ही ठिणगी ४१ महिन्यांच्या युतीचं अस्तित्व येत्या 2 डिसेंबरला संपुष्टात आणणार का ...?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com