Marathi Bhasha Gaurav Din 2024, Marathi Rajbhasha Din 2024 Saam Tv
लाईफस्टाईल

Marathi Bhasha Gaurav Din 2024: लाभाले आम्हास भाग्य...,'मराठी भाषा गौरव' दिनानिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून शुभेच्छा

Marathi Rajbhasha Din 2024 : २७ फेब्रुवारीला दरवर्षी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो. मराठी भाषेच्या गौरवासाठी आजही अनेक सामाजिक आणि राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात काम केले जाते.

कोमल दामुद्रे

मराठी भाषा गौरव दिन शुभेच्छा in Marathi :

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... २७ फेब्रुवारीला दरवर्षी 'मराठी भाषा गौरव दिन' साजरा केला जातो. मराठी भाषेच्या गौरवासाठी आजही अनेक सामाजिक आणि राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात काम केले जाते.

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणून दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रजांच्या स्मृतिला अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे २७ फेब्रुवारी हा दिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा (Celebrate) करण्यात येतो.

या दिवसाला मराठी भाषा गौरव दिन तर काहीजण मराठी राजभाषा दिन असे सुद्धा म्हणतात. विष्णू वामन शिरवाडकर यांनी महाराष्ट्र साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोठे योगदान दिले आहे. श्रेष्ठ कवी, नाटककार, कांदबरीकार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांना कुसुमाग्रज या टोपणनावाने काव्यलेखन केले. मराठी भाषा ही जगात १० क्रमांकावर आहे. तसेच भारतातील २२ अधिकृत भाषांमध्ये तिचा समावेश आहे.

मराठीचा गोडावा जपण्यासाठी आणि तिचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकाने आपल्या नातेवाईकांना, मित्र परिवारास खास मराठमोठ्या शुभेच्छा पाठवल्या पाहिजे. यादिनानिमित्त तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप (WhatsApp) स्टेटसला 'मराठी भाषा गौरव' दिनानिमित्त स्टेटस ठेवू शकता आणि तुमचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांना (Relatives) ही पाठवू शकता.

1. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी!

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

2. धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी।।

मराठी राजभाष दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

3. मराठी माझी जात!

मराठी माझा धर्म!

मराठी माझी माती!

मराठी माझं रक्त!

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

4. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा

हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

5. माझा मराठीची बोलू कौतुके।

परि अमृतातेहि पैजासी जिंके।

ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।

6. रुजवू मराठी, फुलवू मराठी

चला बोलू फक्त मराठी

मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey: राज ठाकरेंना मराठी भाषा वादावरुन धमकी देणारे निशिकांत दुबे कोण?

Raju Patil : ठाणे ते कल्याणचा प्रवास हेलिकॉप्टरने, रस्त्याने पलावा पूलाची परिस्थिती बघितली असती; राजू पाटलांचा शिंदेंना टोला

Maharashtra Live News Update :तीन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेला पलावा पूल पुलावरील रस्त्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत

Amla Chutney : जेवणासोबत रोज लोणचं कशाला? घरीच करा चटपटीत आवळ्याची चटणी

OYO Hotel: कपल्सची होणार गोची? तासांवर रूम मिळणं होणार कठिण? VIDEO

SCROLL FOR NEXT