Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Women’s Hockey Asia Cup 2025: भारतीय महिला हॉकी संघाने आशिया कप २०२५ ची अंतिम फेरी गाठलीय. कोरियाच्या पराभवामुळे भारताने जेतेपदाच्या सामन्यात स्थान मिळवले आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना यजमान चीनशी होणार आहे.
Women’s Hockey Asia Cup 2025
Indian women’s hockey team enters Asia Cup 2025 final, to face China for the championship.saam tv
Published On
  • भारतीय महिला हॉकी संघ आशिया कप २०२५ च्या अंतिम फेरीत पोहोचला.

  • भारताने जपानविरुद्ध सामना १-१ अशी बरोबरीत सोडला.

  • चीनने कोरियाचा पराभव केल्याने भारताला अंतिम फेरी गाठण्याची संधी मिळाली.

  • अंतिम फेरीत भारताचा सामना यजमान चीनशी होणार आहे.

भारतीय महिला हॉकी संघाने आशिया कप २०२५ च्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. शनिवारी भारताने आपल्या शेवटच्या सुपर फोर सामन्यात जपानविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधली, त्यानंतर अंतिम फेरीत पोहोचण्याच्या त्यांच्या आशा चीन विरुद्ध कोरिया सामन्यावरच टिकून राहिल्या होत्या. यजमान चीनने शेवटच्या सुपर फोर सामन्यात कोरियाचा १-० असा पराभव केला आणि यासह भारत अंतिम फेरीत पोहोचला

Women’s Hockey Asia Cup 2025
India Vs Pakistan: भारत-पाकिस्तान सामना रद्द होऊ शकतो का? BCCI ला अधिकार आहे का, काय आहे नियम? जाणून घ्या!

भारत आणि चीन यांच्यातील विजेतेपदाचा सामना रविवारी हांगझोऊ येथे खेळला जाणार आहे. खरं तर, कोरियाला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन गोलच्या फरकाने विजय आवश्यक होता पण चीनच्या विजयाने भारताचे अंतिम फेरीतील तिकीट निश्चित झालं. सुपर फोर टप्प्यात भारताला हरवून चीनने आधीच अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते.

Women’s Hockey Asia Cup 2025
Asia Cup 2025 : भारत - पाकिस्तान सामना रद्द होणार का? सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय

चीनने तीन विजयांसह नऊ गुणांसह सुपर फोर टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले तर भारताने एका विजय, एका बरोबरी आणि एका पराभवासह चार गुणांसह दुसरे स्थान पटकावले. अंतिम फेरीत विजय मिळवणारा संघ पुढील वर्षी बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी पात्र ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com