Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

Akola News in Marathi : हातात मोबाईल नसला की काहितरी चुकल्या सारखं वाटतं... अकोल्यात एकाचा मोबाईल थेट विहिरीतच पडला.... मग पट्टयाने आख्खी यंत्रणाच लावली कामाला.... नेमकं घडलंय काय
akola news
Akola News in Marathi Saam tv
Published On

सध्या झालंय असं की, हातात मोबाईल नसला की काय तर चुकल्या सारखं होतंय. अकोल्यात एकाचा मोबाईल थेट विहिरीतच पडला.... मग पट्टयाने आख्खी यंत्रणाच लावली कामाला. नेमकं घडलंय काय पाहुया...

मोबाईल पडला हिरीत... गडी बसाला डोक्यावर हात मारीत. शेतकऱ्याला आलं टेन्शन.... मग काढाला तोडगा म्हणला रेस्क्यू टीमलाचं बोलवू... गड्याची अडचण ऐकून रेस्क्यू टीम ऑन द स्पॉट हजर... हाय काय नाय डोक्याला कुटाना....

akola news
Famours Actress : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरावर गोळीबार, सिनेसृष्टीत खळबळ

ही हाय अकोल्याच्या येळवण गावचा पप्पू मोहोड .... गडी गेला शेतात... फेरफटका मारला अन् .....हिरीच्या कट्ट्यावर बसला....तेवढ्यात झाला घोटाळा....लाखा भराचा मोबाईल खिशातनं थेट हिरीत पडला... चाळीस फूट खोल हिरीत मोबाईल बुडाला शोधाशोध सुरु झाली... वाघाला काय घावला नाय... मग रेस्क्यु टीमला बोलवलं... रेस्क्यु टीम भी तात्काळ हजर.... हिरीला बघितलं अन् ऑक्सिजन सिलेंडर लावलेल्या पट्ट्यांनी थेट हिरीत उड्या हाणल्या.... अख्खा दिवस गेला मोबाईल घावला नाय. दिवसाची संध्याकाळ अन् संध्याकाळची रात्री झाली... वाघाचा मोबाईल काय घावना....

akola news
TET 2025 परीक्षेबाबत सर्वात मोठी अपडेट; अर्ज, परीक्षा शुल्क अन् वेळापत्रकाची माहिती एका क्लिकवर

ऑक्सिजनचं सिलेंडर लावलेलं गडी बी दमलं... तासचं दोन तास झालं अन् दोन तासाचं चार तास... मोबाईल काय हाताला लागला नाय... शेवटी 22 तासानंतर मोबाईल घावला.... गडी मोबाईल हातात आल्यावर हारकून गेला... ज्यानं मोबाईल शोधला त्याचा पट्ट्याने सत्कार केला.

akola news
Kalyan Street Dogs : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत; एकाच दिवशी ३५ जणांना घेतला चावा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मोबाईलसाठी कधी कोण काय करील याचा नेम नाय... आता मोबाईल हातात आलाय खरा... त्याला थोड सांभाळून ठेवा जरा... या कारनाम्यासाठी या मोबाईल मॅनला 21 तोफांची सलामीच द्यावी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com