सुंदर दिसण्यासाठी प्रत्येक तरुणी, महिला आणि मुली विविध कॉस्मेटिक्स वापरतात. असे प्रोडक्ट वापरत असताना बऱ्याचदा अप्लाय करण्याच्या स्टेप्स माहिती नसल्याने मेकअप फसतो. मुलींना सुंदर दिसण्यासाठी मेकअपमध्ये लिप्सटीक सर्वात महत्वाची वाटते. मात्र लिप्सटीक फार काळ टिकत नाही, अशी तक्रार सर्वच मुली करतात.
लिप्सटीक लावल्यावर ती जास्त वेळ टिकणे सुद्धा महत्वाचे असते. मात्र जेवताना किंवा बोलत असताना देखील ओठांची लिप्सटीक हळूहळू कमी होते. लिप्सटीक पुसट झाली की यामध्ये ओठांचं सौंदर्य कमी होतं आणि ओठांवर असलेली अशी पुसट लिप्सटीक आपला लूक बिघडवते. त्यामुळे लिप्सटीक जास्त वेळ टिकून रहावी यासाठी आम्ही काही टिप्स आणल्या आहेत.
या टिप्सने लिप्सटीक जास्त वेळ टिकेल
लिप्सटीक जास्त वेळ टिकून रहावी यासाठी ती अप्लाय करताना आपल्या ओठांना आधी कंसिलर अप्लाय करा. त्याने ओठ मॉश्चराईज राहतील आणि मऊ राहतील.
त्यानंतर ओठांवर वॉटरप्रूफ लायनर अप्लाय करा. याने तुमची लिपस्टीक ओठांना घट्ट धरून राहिल आणि निघणार नाही.
लायनरवर लिप्सटीक अपल्याय करा. त्यानंतर त्यावर एक साधी टॅल्कम पावडर किंला कॉम्पॅक पावडर अप्लाय करा.
पावडर अप्लाय केल्यानंतर टिशू पेपरच्या मदतीने ते सेट करा. असे केल्याने तुमची लिप्सटीक अगदी १२ तास कितीही खाल्लं तरी निघून जाणार नाही.
फाउंडेशनसाठी टिप्स
चेहऱ्यावर लिप्सटीक प्रमाणे फाउंडेशन सुद्धा जास्त वेळ टिकत नाही. उन्हाळ्यात घाम आल्याने चेहऱ्यावील मेकअप आणि फाउंडेशन कमी होत जातं. त्याने चेहरा काळा पडतो, तसेच आपला पूर्ण लूक आणि मुड सुद्धा बिघडतो.
फाउंडेशन जास्त वेळ टिकून रहावं यासाठी आधी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर थंडगार बरफाचे तुकडे चेहऱ्याला चोळून घ्या. त्याने स्किन मेकअपसाठी परफेक्ट रेडी होते. या काही सिंपल टिप्सने तुम्ही मेकअपमध्ये काळ्या दिसणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.