सध्या सणासुदीचा काळ चालू आहे. त्यामुळे महिला आपल्या स्टाईलकडे विशेष लक्ष देताना पाहायला मिळतात. प्रत्येक सणाला नवीन कपडे कुठून आणायचे? असा प्रश्न महिलांना पडतो. त्यावर रामबाण उपाय म्हणजे जुन्या कपड्यातून नवीन स्टाईल तयार करणे. आपल्याकडे बऱ्याच जुन्या साड्या (Saree)असतात. त्या तशाच वर्षानुवर्षे कपाटात पडून ठेवण्यापेक्षा त्यांच्या पासून नवीन स्टायलिश कपडे आपण डिझायन करू शकतो. जुन्या साडीतून नवीन कपडे बनवल्यास तुम्ही सर्वांपेक्षा वेगळे आणि सुंदर दिसाल.
सलवार सूट
जुन्या साडीपासून तुम्ही आताच्या फॅशनचा (Fashion)सुंदर सलवार सूट बनवू शकता. आजकाल अनारकली सूट खूप ट्रेंडिंगवर आहेत. तर तुम्ही जुन्या काठापदराच्या साडीपासून छान सलवार सूट शिवून घेऊ शकता. सलवार सूटसाठी कांचीपुरम साडी बेस्ट राहील.
लेहंगा
जुन्या, वापरत नसलेल्या साड्यांपासून तुम्ही सुंदर लेहंगा बनवू शकता. लग्नात तुम्हीच उठून दिसाल. हेवी वर्क असलेली साडी लेहंग्यासाठी उत्तम राहील. लेहंगा बनवण्यासाठी मोठा काठ असणे महत्त्वाचे आहे म्हणजे ड्रेसचा लूक खुलून येईल. तुम्ही साडीतून मस्त जास्त घेरदार लेहंगा बनवू शकता. तसेच त्यावर मॅचिंग ब्लाऊज देखील साडीतून शिवून घ्या.
जॅकेट
आजकाल इंडो-वेस्टर्न(Indo Western) मध्ये लांब जॅकेट घालण्याचा ट्रेंड चालू आहे. तुम्ही जुन्या बारीक काठाच्या साड्यांपासून इंडो-वेस्टर्न कपड्यांवर घालता येईल असे जॅकेट बनवू शकता. स्टँड कॉलरचे जॅकेट तुमचा लूक अजून भारी करेल. तुम्ही हे जॅकेट लग्नसोहळ्यात किंवा खास प्रसंगात देखील घालू शकता.
वनपीस
आपल्याकडे जुन्या अनेक सिल्कच्या साड्या असतात. यातून तुम्ही वेस्टर्न स्टाईलमध्ये वनपीस शिवू शकता. तर फ्लोरल प्रिंट काठापदराची साडी असल्यास त्याचा देखील आजच्या फॅशननुसार सुंदर वनपीस डिझाइन करू शकता.
स्कर्ट
परफेक्ट इंडो वेस्टर्न लूकसाठी तुम्ही जुन्या साडीपासून फ्लेअर्ड स्कर्ट बनवू शकता. कॉलेज लूकसाठी हा बेस्ट ऑप्शन राहील. तुम्ही मॅचिंग ज्वेलरीसोबत हा लूक अजून स्टायलिश करू शकता.
टॉप
आजकाल जीन्स आणि टॉप हा कंफटेबल आउटफिट झाला आहे. त्यामुळे तुम्ही जुन्या साड्यांपासून तुम्हाला आवडेल तसे सुंदर टॉप बनवू शकता आणि स्टाईल करू शकता. पारंपरि टॉप बनवायचे असतील तर तुम्ही बांधणीची साडी वापरू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.