Natural Way To Reduce Cholesterol saam tv
लाईफस्टाईल

Reduce Cholesterol: शरीरातील रक्तवाहिन्यांना ब्लॉक करतं LDL कोलेस्ट्रॉल; नसांना पूर्ण साफ करतील 'हे' काळे पदार्थ

Natural Way To Reduce Cholesterol: खाण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे शरीरातील नसांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. असे काही काळे पदार्थ आहेत,ज्यांच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होईल.

Surabhi Jayashree Jagdish

चुकीच्या जीवनशैलीमुळे अनेक समस्या आपल्या मागे लागताना दिसतात. अयोग्य आहार आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे शरीरातील नसांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो. शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अनेक लक्षणं दिसून येतात. यामध्ये रात्रीच्या वेळेस थकवा, डोकेदुखी, हात-पाय सुन्न होणं इत्यागी.

कोलेस्ट्रॉल हे दोन प्रकारचे असून LDL कोलेस्ट्रॉल हे वाईट कोलेस्ट्रॉल म्हणून ओळखळं जातं. जर यावर वेळीच नियंत्रण आणलं नाही तर हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघातामुळे अकाली मृत्यूचा धोका वाढतो. त्यामुळे आम्ही तुम्हाला अशाच काही काळ्या पदार्थांबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या सेवनामुळे नसांमध्ये जमा असलेलं कोलेस्ट्ऱॉल कमी होण्यास मदत होते.

काळी द्राक्षं

काळ्या द्राक्षांमध्ये रेझवेराट्रोल असून यामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया रोखली जाते. यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉलची पातळी देखील कमी होत असल्याचं समोर आलं आहे.

ब्लॅक बीन्स

ब्लॅक बीन्समध्ये भरपूर फायबर, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट प्रमाण असतात. हे LDL कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतं. त्यांच्या सेवनाने पचनशक्ती देखील मजबूत होऊ शकते.

ब्लॅक बेरीज

ब्लॅक बेरीजमध्ये अँथोसायनिन्स असतं, जे एक प्रकारचं अँटिऑक्सिडेंट आहे. संशोधनातून असं दिसून आलंय की, काळ्या बेरीचं नियमित पद्धतीने सेवन केल्याने एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

काळे तीळ

काळ्या तिळामध्ये सेसमोलिन असून यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होतो. त्याचप्रमाणे यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. काळे तीळ हे ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी ॲसिडचा चांगला स्रोत मानले जातात.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : पिकांच्या संरक्षणासाठी तारेत सोडला विद्युत प्रवाह; चारा कापताना झाला घात, विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू

Aamhi Saare Khavayye : खुशखबर! मराठी कुकिंग शो 'आम्ही सारे खवय्ये' येतोय? पाहा VIDEO

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

SCROLL FOR NEXT