Liver health: दहा पैकी तीन लोकांचं यकृत खराब; 'या' गोष्टी ठरतात कारणीभूत, तज्ज्ञांचा इशारा

Liver health: गेल्या काही काळात जीवनशैली निगडीत आजारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. यामध्येच यकृताच्या समस्यांचं प्रमाण वाढल्याचं चित्र दिसतंय.
Liver health
Liver healthsaam tv
Published On

आजकाल चुकीची जीवनशैली आणि अवेळी घेण्यात येणारा आहार यामुळे बऱ्याच आरोग्याच्या समस्या मागे लागतात. यामध्ये यकृताच्या समस्यांच्या रूग्णांची संख्याही वाढल्याचं दिसून येतंय. गेल्या काही काळात जीवनशैली निगडीत आजारांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र आहे. यामधील एक समस्या म्हणजे यकृताचे आजार.

का होतात यकृताच्या समस्या?

अन्नाच्या पचनाची क्रिया पार पाडण्याचं काम यकृत करतं. यकृताचं कार्य बिघडलं की त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होताना दिसतो. आजकाल या आजारांचं प्रमाण वाढलं असून १० पैकी एक ते तीन लोकांना यकृताचा आजार असल्याचं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून समोर आलंय.

Liver health
Hypertension and High Cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास? वाचा तज्ज्ञांनी काय काय सांगितलं

देशातील ‘नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज’ची वाढती संख्या पाहता केंद्र सरकारने आता महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पुढाकार घेतला असून काही मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आलीयेत.

यकृताचा आजार ही भारतातील वाढती समस्या असल्याचं आकड्यांवरून स्पष्ट होतंय. केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी स्पष्ट केलं की, दहापैकी एक ते तीन लोकांमध्ये यकृताचा आजार आहे.

यासंदर्भात मुंबईतील झायनोव्हा शाल्बी रूग्णालयताली इंटरनल मेडिसिन एक्सपर्ट डॉ. उर्वी महेश्वरी म्हणाल्या की, रूग्णांमध्ये नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) आजाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतंय. यामागे अपुरी झोप, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, खराब आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा अशा गोष्टी कारणीभूत ठरत आहेत. सुदृढ जीवनशैलीतून फॅटी लिव्‍हरचा धोका टाळता येऊ शकतो.

डॉ. महेश्वरी यांच्या सांगण्यानुसार, भारतीय खाद्य पदार्थांमध्ये प्रामुख्याने कार्बोहायड्रेडचे प्रमाण ऐंशी टक्क्‍यांपर्यंत असतं. हे प्रमाण कमी करणं असून त्याऐवजी फायबरयुक्‍त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करावा. फॅटी लिव्हरचे लवकर निदान होण्यासाठी व त्याचा प्रसार रोखण्यासाठी स्थूल रुग्ण, मधुमेही आणि यकृतांच्या विकारांचा कौटुंबिक इतिहास असलेल्यांची वेळोवेळी तपासणी करुन घेणं गरजेचं आहे. फॅटी लिव्हर हा रोग तीन प्रकारामध्ये पहायला मिळतो यामधील पहिल्या प्रकार म्हणजे स्टेटोसिसमध्ये ( steatosis, only fat accumulation without swelling) यामध्ये चरबी जमा होते .दुसरा प्रकार म्हणजे स्टेरिएपेटायटिस(steatohepatitis) यामध्ये जखम आणि सूज असलेले यकृत पहायला मिळतं आणि तिसरे म्हणजे सिरोसिस (Cirrhosis) जे गंभीर आणि गुंतागुंतीचे असतं.

Liver health
Side Effects Of Sugar: अतिप्रमाणात साखरेचं सेवन केल्यास शरीर देतं हे सिग्नल; वेळीच लक्षणं ओळखा

कसा रोखता येऊ शकतो यकृताचा आजार?

यकृताचा आजार रोखण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी संतुलित आहार घ्या. यात फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि प्रोटीन (जसं की शेंगा आणि मासे) समृद्ध आहार घेतला पाहिजे. तसंच आहातून साखरेचे प्रमाण कमी केलं पाहिजे. कचंचे किंवा कमी शिजवलेले अन्न खाणे बंद केले पाहिजे. ज्यांना मद्यपानाची सवय आहे त्यांनी यकृताच्या आजार टाळण्यासाठी याचं सेवन करू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com