Cancer: मृत्यूचा धोका टाळणाऱ्या ४ ब्लड टेस्ट; कॅन्सरला प्राथमिक टप्प्यात शोधून काढतील!

How To Diagnose Cancer: प्राथमिक टप्प्यात जर कॅन्सरचं निदान झालं तर मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो. कॅन्सर त्याच्या पहिल्या टप्प्यावर ओळखणं शक्य आहे. जिथे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. यायासाठी ब्लड टेस्ट नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूयात.
How To Diagnose Cancer
How To Diagnose Cancersaam tv
Published On

कॅन्सर म्हटलं की मृत्यू होणार असा अनेकांचा समज होतो. मात्र कॅन्सर झालेल्या व्यक्तीवर योग्य आणि वेळेत उपचार झाल्यास रूग्ण वाचू शकतो. कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी तज्ज्ञ नेहमी काळजी घेण्याचं आव्हान करतात. हा धोका टाळण्यासाठी काही गोष्टींचं पालन करणंही गरजेचं असतं. प्राथमिक टप्प्यात जर कॅन्सरचं निदान झालं तर मृत्यूचा धोका टाळता येऊ शकतो.

कॅन्सरचं उशीरा निदान होण्याची चूक तुम्ही करू नका. हा धोका ओळखण्यासाठी काही रक्त तपासणी करून घेऊ शकता. अलिकडच्या वर्षांत, शास्त्रज्ञांनी रक्त चाचण्या विकसित केल्या आहेत, या ब्लड टेस्टच्या माध्यमातून तुम्ही कॅन्सरचा लवकर निदान होण्यास मदत होते. या चाचणीच्या मदतीने, कॅन्सर त्याच्या पहिल्या टप्प्यावर ओळखणं शक्य आहे. जिथे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. या टेस्ट नेमक्या कोणत्या आहेत ते पाहूयात.

How To Diagnose Cancer
Cancer Screening Device : आता एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

सीए-125 (CA-125)

CA-125 (कॅन्सर एंटीजन) हे एक प्रकारचं प्रोटीन असून सामन्यपणे गर्भाशयाच्या कॅन्सरच्या रुग्णांमध्ये वाढताना दिसतं. या ब्लड टेस्टच्या मदतीने हे सहज ओळखता येणं शक्य आहे. ही चाचणी विशेषतः महिलांसाठी महत्त्वाची मानली जाते.

पीएसए (PSA)

पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरचं निदान करण्यासाठी PSA (प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजेन) चाचणी गरजेचं मानलं जातं. या चाचणीच्या मदतीने रक्तातील PSA ची पातळी मोजली जाते. ब्लड टेस्टच्या रिपोर्टमध्ये जर ही पातळी सामान्यापेक्षा जास्त असेल तर हे प्रोस्टेटमधील समस्येचं लक्षण मानलं जातं.

सीए-19-9 (CA 19-9)

CA-19-9 हे रक्तातील प्रोटीनचा एक प्रकार आहे. शिवाय हे एक ट्यूमर मार्कर देखील आहे. हे मोजण्यासाठी CA 19-9 radioimmunoassay ब्लड टेस्ट केली जाते. ब्लड टेस्टच्या रिपोर्टमध्ये CA-19-9 ची पातळी वाढली असेल तर ते पॅनक्रियाजचा कॅन्सर असण्याचा धोका असतो.

एफपी

एफपी (अल्फा-फेटोप्रोटीन) चाचणी प्रामुख्याने लिव्हर कॅन्सर आणि काही प्रकारचे टेस्टिक्युलर कॅन्सर ओळखण्यात मदत होते. ज्या व्यक्तींना लिव्हर संदर्भात समस्या आहेत, त्यांना ही ब्लड टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.

How To Diagnose Cancer
Navratri 2024: सणा-सुदीच्या दिवसात झपाट्याने वजन वाढतंय? 'या' पद्धतीने करू शकता कंट्रोल

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com