Cancer Screening Device : आता एका मिनिटात होणार कॅन्सरचं निदान, IIT कानपूरने बनवलं एक खास डिव्हाईस

Cancer Screening Device : कॅन्सर झाला आहे की नाही हे माहिती करून घेण्यासाठी आता केवळ १ मिनिट पुरेसा आहे. IIT कानपूरने एक असं डिव्हाईस तयार केलं आहे, जे ६० सेकंदांच्या आत रिपोर्ट देऊ शकणार आहे.
Cancer Screening Device
Cancer Screening Devicesaam tv
Published On

कॅन्सर या गंभीर आजाराचं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या पाया खालची जमीन सरकते. कॅन्सरचं निदान होण्यासाठी अनेक पद्धतींच्या टेस्ट कराव्या लागतात. मात्र आता अवघ्या एका मिनिटांत कॅन्सरबाबत माहिती मिळू शकणार आहे. IIT कानपूरने एक असं डिव्हाईस तयार केलं आहे, जे ६० सेकंदांच्या आत रिपोर्ट देऊ शकणार आहे.

आता फक्त एका मिनिटात तुम्हाला कॅन्सर आहे की नाही हे कळू शकणार आहे. IIT कानपूरने एक डिव्हाईस तयार केलं असून ते 60 सेकंदामध्ये तुम्हाला रिपोर्ट देणार आहे. हे डिव्हाईस केवळ तोंडाचा कॅन्सर शोधण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. हे डिव्हाईस तोंडाच्या आतील भागाचा फोटो घेऊन आणि त्याचं विश्लेषण करून रिपोर्ट देणार आहे.

Cancer Screening Device
Cardiac arrest: का वाढतायत कमी वयात हार्ट अटॅकचं प्रमाण; जीवघेण्या समस्येचा धोका कसा कमी कराल?

या उपकरणाद्वारे कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये आहे हे देखील समजू शकणार आहे. हे डिव्हाईस केमिकल इंजीनियरिंग डिपार्टमेंट प्रो. जयंत कुमार सिंग यांच्या मदतीने स्कॅन जिनी कंपनीने तयार केलंय. या वर्षी डिसेंबरपर्यंत हे डिव्हाईस बाजारात येण्याची शक्यता आहे.

कसं काम करणार हे डिव्हाईस

प्रोफेसर जयंत यांच्या सांगण्यानुसार, या डिव्हाईसचा आकार एक टूथब्रश इतका आहे. यामध्ये हाय क्वालिटी कॅमेरा आणि एलईडी लावण्यात आले आहेत. याला स्मार्टफोन, टॅबलेट आणि आयपॅडशी कनेक्ट केलं जाऊ शकतं. तोंडाच्या आतील भागातील फोटो काढल्यानंतर कॅमेरा सविस्तर रिपोर्ट मोबाईलवर पाठवणार आहे. हे पॉवर बॅकअपसह ट्रॅकिंगसाठी हेल्थ हिस्ट्री जमा करते. त्याचा परिणाम 90% अचूक आहे आणि त्याच्या चाचणीमध्ये कोणताही त्रास होत नाही.

प्रोफेसर जयंत आणि त्यांच्या टीमने ६ वर्षांमध्ये हे डिव्हाईस तयार केलं आहे. हे एक पोर्टेबल डिव्हाइस असून छोट्या बॅगेतही ते मावण्यासारखं आहे. कानपूरमध्ये अनेक ठिकाणी कॅम्प लावून सुमारे ३ हजार लोकांवर याची चाचणीही करण्यात आली. या उपकरणाद्वारे 22 वर्षांपर्यंतच्या तरुणांमध्ये कॅन्सर आढळून आल्याचं समोर आलं आहे.

Cancer Screening Device
Heart attacks in Mumbai: मुंबईत हार्ट अटॅकने दर ५५ मिनिटाला एकाचा मृत्यू; २५-३५ वयोगटातील तरूणांना सर्वाधिक धोका

प्रो. जयंतने यांनी माहिती दिली की, मुखाचा कॅन्सर कर्करोग शोधण्यासाठी या उपकरणाची किंमत दीड लाख ते दोन लाख रुपयांपर्यंत असू शकते. त्यात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू परदेशातून आयात कराव्या लागतात, त्यामुळे त्याची किंमत जास्त आहे. एका यंत्राद्वारे किमान 5 लाख लोकांची चाचणी केली जाऊ शकते. एका दिवसात सुमारे 300 लोकांची चाचणी करण्यात येऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com