Diabetes Health Saam Tv
लाईफस्टाईल

Diabetes Health : झोपेच्या कमतरतेमुळे जडू शकतो मधुमेह, संशोधनातून धक्कादायक खुलासा

Diabetes Type 2 : मानसिक तणाव, अपुरी झोप आणि सततच्या कामामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार बळावतो. जामा नेटवर्क ओपन जनर्लमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार असे समजून आले की, झोपेच्या कमतरतेमुळे मधुमेह होण्याचा धोका निर्माण होतो.

कोमल दामुद्रे

Sleep Can Affect Diabetes Risk :

बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी आणि चुकीच्या सवयींमुळे आपल्याला अनेक गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते. त्यातील गंभीर आजार मधुमेह. हल्ली प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये मधुमेहाचा आजार पाहायला मिळतो.

मानसिक तणाव, अपुरी झोप आणि सततच्या कामामुळे मधुमेहासारखा (Diabetes) गंभीर आजार (Disease) बळावतो. जामा नेटवर्क ओपन जनर्लमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार असे समजून आले की, झोपेच्या कमतरतेमुळे मधुमेह होण्याचा धोका निर्माण होतो.

अभ्यासामध्ये UK Biobank च्या डेटावर अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये UK मधील जवळपास दशलक्ष लोकांना त्यांच्या आरोग्य (Health) आणि जीवनशैलीवर प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये दहावर्षाहून अधिक लोकांचे अनुसरण करण्यात आले.

संशोधनातून असे कळाले की, सात ते आठ तास झोपणाऱ्या लोकांच्या तुलनेत जे लोक दररोज पाच तास झोप घेतात त्यांना टाइप २ मधुमेह होण्याचा धोका १६ टक्के जास्त असतो. जे लोक तीन ते चार तास झोपतात त्यांना ४१ टक्के मधुमेहाचा धोका जास्त असतो.

टाइप २ मधुमेह हा वयोवृद्धांमध्ये आढळून येणे हे सामान्य आहे. परंतु, यामुळे शरीरातील रक्ताच्या साखरेवर याचा परिणाम होतो. इन्सुलिनवर त्याचा परिणाम होतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.

झोपेची कमतरता ही टाइप २ मधुमेहाला कारणीभूत ठरू शकते. याचा परिणाम जठरांत्रीय मार्गावर होतो. २०१५ मध्ये डायबेटोलॉजियामध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासातून असे कळाले की, कमी झोपमुळे मधुमेहाचा आजार जडतो. शिकोगा युनिव्हर्सिटीच्या संशोधनातून असे आढळून आले की रात्री तीन ते चार झोप घेतल्यामुळे रक्तातील फॅटी ऍसिडची पातळी सामान्य असते पण नंतर हळूहळू कमी होते. पुन्हा सकाळी ४ ते ९ पर्यंत ती वाढलेली राहाते. फॅटी ऍसिडची पातळी जास्त राहिली तोपर्यंत रक्तातील साखरेची इन्सुलिनची क्षमता कमी होते.

मधुमेहाचा आजार हा अनुवांशिकता, बैठी जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, पुरेशी झोप न घेणे, चुकीचा आहार आणि व्यायाम न करणे सारख्या गोष्टींमुळे हा आजार जडतो.

२०१९ च्या ७० दशलक्ष लोकांच्या तुलनेत भारतात आता १०१ दशलक्ष मधुमेह लोक ग्रस्त आहेत. असा दावा युके मेडिकल जर्नल लॅन्सेट मध्ये प्रकाशित झाला. तसेच वाढत्या रुग्णांमुळे तज्ज्ञांनी चिंता देखील व्यक्त केली आहे. शहरी भागात झोप न लागण्याची समस्या सामान्य झाली आहे. तसेच कामाचे वेळापत्रक, ताणतणाव, सोशल मीडियाचा अतिवापर यामुळे मधुमेहाचा आजार जडतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT