Diabetes Health
Diabetes HealthSaam Tv

Diabetes Health : मधुमेहींनो, या भाजीचे सेवन नियमित करा, रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

Drumstick Benefits : हिवाळा सुरु झाला की, बाजारात अनेक भाज्या पाहायला मिळतात. त्यातील काही भाज्या शरीरासाठी गुणकारी असतात. त्यातील एक शेवग्याची शेंग.
Published on

How To Control Blood Sugar Level :

बदलेल्या जीवनशैलीनुसार खाण्यापिण्याच्या अनेक सवयी बदल्या आहेत. आहारात देखील बदल झाले आहेत. मानसिक तणाव, अपुरी झोप आणि सततच्या कामामुळे मधुमेहासारखा (Diabetes) गंभीर आजार बळावतो.

हा आजार वाढू लागला की, शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक वाढते. हिवाळा सुरु झाला की, बाजारात अनेक भाज्या पाहायला मिळतात. त्यातील काही भाज्या शरीरासाठी गुणकारी असतात. त्यातील एक शेवग्याची शेंग. यामध्ये अँटिऑक्सिडेंटचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे रक्तातील साखर (Sugar) नियंत्रित राहाण्यास मदत करते. तसेच यात असणारे फायबर पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते. जाणून घेऊया याचे फायदे (Benefits)

1. शेवग्याच्या शेंगाचे पाणी

शेवग्याच्या शेंगाला पाण्यात उकळवून ते मॅश करुन घ्या. त्यात मीठ आणि जिरे पावडर घालून हे पाणी आठवड्यातून तीन दिवस प्यावे. यामुळे साखरेची पातळी नियंत्रणात राहाण्यास मदत होते.

Diabetes Health
Diet After 30: वयाची तिशी ओलांडल्यानंतर आहारात करा या पदार्थांचा समावेश, अनेक आजारांपासून राहाल दूर

2. बद्धकोष्ठतेचा त्रास

मधुमेहीच्या रुग्णांसाठी शेवग्याच्या शेंगाचे पाणी उपयुक्त आहे. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. यामध्ये असणारे स्टूल पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करते. तसेच शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते.

3. ब्लड शुगर कंट्रोल करते

शरीरातील साखर नियंत्रणात ठेवायची असेल तर चयापचय दर वाढवायला हवा. यासाठी शेवग्याची शेंग फायदेशीर ठरते. यामुळे स्वादुपिंडाचे काम हळू होऊन शरीरातील साखर नियंत्रणात राहाते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com