बदलेली जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, आहार आणि मानसिक तणावामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार होतो. हा आजार वाढू लागला की, शरीरातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी आहारासह आपल्याला जीवनशैलीवर देखील पूर्णपणे नियंत्रण ठेवणे अंत्यत आवश्यक आहे.
मधुमेहाच्या (Diabetes) बाबतीत भारत जगात सगळ्यात पुढे आहे. या आजारमुळे रुग्णाच्या शरीरात इन्सुलिन हार्मोन योग्य प्रकारे तयार होत नाही. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कायम राहाते. जर तुम्हाला देखील मधुमेहाचा त्रास असेल तर तुमच्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये (Food) बदल करायला हवा. त्यासाठी गव्हाच्या पीठाऐवजी तुम्ही या पीठाचे सेवन केल्यास साखर (Sugar) नियंत्रित राहाण्यास मदत होईल.
1. नाचणीचे पीठ
नाचणीला सूपरफूड म्हटले जाते यात भरपूर पोषक असतात. तसेच यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते. मधुमेहाच्या रुग्णांनी याचे सेवन करावे. शरीरात इन्सुलिनचे उत्पादन वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
2. बाजरीचे पीठ
बाजरीच्या पिठापासून बनवलेल्या भाकरी मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरु शकते. बाजरीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. त्यामुळे साखर नियंत्रित राहाण्यास मदत होते. याशिवाय वजन नियंत्रणात राहाण्यास मदत होते.
3. ज्वारी
ज्वारीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी आहे. ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. आरोग्यासाठी ज्वारी खूप फायदेशीर आहे. नियमितपणे ज्वारीच्या पिठाची भाकरी खाल्ल्याने शरीरात वाढणाऱ्या साखरेवर नियंत्रण ठेवता येते.
डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.