Mental Health SAAM TV
लाईफस्टाईल

Mental Health : टेन्शन मुक्त राहण्याचे 'हे' मार्ग ताणतणाव करेल छूमंतर, आजच करा सुरुवात

Health Tips : आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मोठ्या प्रमाणात आपले मानसिक खच्चीकरण होते. मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी ताणतणाव कमी करणारे प्रभावी मार्ग जाणून घ्या.

Shreya Maskar

आजकाल प्रत्येक जण ताणतणावाचा सामना करत आहे. मानसिक ताण कमी केला नाही तर माणूस नैराश्यात जातो. तणाव येण ही सामान्य बाब जरी असली तरी, याचा आरोग्यावर वाईट परिणाम होताना दिसतो. अति ताणामुळे डोळ्यांवर ताण येऊन अंधारी येते. तसेच चिडचिड होते, थकवा जाणवतो आणि मूड स्विंग्स होतात.

ताणतणाव कमी करण्यासाठी 'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • आपण तणावाखाली खाण्यापिण्याची आबाळ करतो. पण यामुळे तुमचे आरोग्य धोक्यात येते. यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे शरीराला जास्त कार्बोहाइड्रेट असणारे पदार्थ खाऊ घाला. पोट भरलेले असल्यास मनही शांत होते.

  • तुमच्या शरीराला व्यायामाची सवय लावा. शारीरिक हालचाली योग्य प्रमाणात झाल्यास मेंदूचे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे नियमित योगासने , जॉगिंग करा. कामात व्यस्त असल्यास किमान चालण्याचा व्यायम तरी करा.

  • नेहमी वर्तमानात जगा भविष्याची चिंता सोडून द्या. यामुळे आयुष्याचा आनंद घेणे राहून जाईल. तसेच याचा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होताना दिसून येईल.

  • स्वतः ची दुसऱ्यासोबत तुलना करणे बंद करा. दुसऱ्यांच्या हेतूवर शंका घेऊ नका. कोणत्याही परिस्थितीत आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवा.

  • कधीही काम आणि पैसा यांमध्ये योग्य समतोल राखा. विनाकारण पैशांच्या मागे पळू नका. पैशांचा ताण आरोग्यासाठी जास्त घातक ठरू शकतो. जास्त ताण आल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.

  • माणसाला सर्वात जास्त ताण हा परफेक्ट बनण्याच्या अट्टाहासामुळे येतो. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा कोणच या जगात परफेक्ट नसतो.

  • परिस्थिती समोरून पळून जावू नका. उलट परिस्थितीचा सामना करा.

  • अपेक्षांचे ओझे घेऊन जगू नका. कारण आयुष्य संपले तरी माणसाच्या अपेक्षा संपत नाही. स्वतःच्या मर्यादा ओळखून भविष्य प्लान करा.

  • उद्याच्या चिंतेत आज खराब करणे चुकीची गोष्ट आहे. कारण उद्या काय घडणार? हे कोणालाच माहित नसते.

  • तुमच्या सोबत वाईट गोष्टी घडत असतील तरी त्यामधून चांगले शिका. सकारात्मक गोष्टी घ्या आणि आयुष्यात येणाऱ्या नकारात्मकतेकडे दुर्लक्ष करा.

  • तणावमुक्त जीवन जगण्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. आपले मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमित झोप रामबाण उपाय आहे. तसेच फोन आणि स्क्रीनचा अतिवापर टाळा.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

Ambernath : अंबरनाथमध्ये तरुणावर हल्ला, पुतणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून काकाने काढला राग; ५ आरोपींवर गुन्हा

Ketan Agarwal Case: केतन अग्रवालच्या हत्येआधीचा धक्कादायक व्हिडीओ आला समोर, सिया अन् चेतन होते सोबत

संजय दिना पाटील यांची पत्रकारांना शिवीगाळ; मुख्यमंत्री काय म्हणाले? VIDEO

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात पावसाचे आगमन

SCROLL FOR NEXT