Smoking Side Effects : धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या शेजारी थांबल्याने कॅन्सर होतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Health Care Tips : 'धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. त्यामुळे याचे व्यसन सोडा.' हे वाक्य वारंवार ऐकूनही बरेच लोक धूम्रपान करतात. मात्र आता धूम्रपान करणाऱ्या सोबत त्यांच्या शेजारी असणाऱ्या व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
Health Care Tips
Smoking Side EffectsSAAM TV
Published On

वारंवार धूम्रपान केल्याने फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयविकार आणि अर्धांगवायू सारखे आजारांना आमंत्रण मिळते. धूम्रपान हे फुप्फुसाचा कॅन्सरचे प्रमुख कारण आहे. म्हणून आजकाल सिगारेट ओढणाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. पण आता फक्त धूम्रपान करणाऱ्यांच्या जीवाला धोका नसून त्यांच्या शेजारी असणाऱ्या व्यक्तीच्या जीवाला देखील धोका निमार्ण झाला आहे.

तज्ज्ञांचे मत स्मोकर्सच्या बाजूला थांबल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. कारण धूम्रपान करताना हवेत सोडलेला धूर शेजारी असलेल्या व्यक्तीचा शरीरात जातो आणि त्यांचे आरोग्य बिघडते. सर्वात मोठा फुफ्फुसांवर परिणाम होतो. फुप्फुसाच्या कर्करोगाच्या अवस्थेचे मूल्यांकन करून कर्करोगाचा प्रकार, ट्यूमरचा आकार, तो किती प्रमाणात पसरला, रुग्णाची स्थिती आणि त्यावर उपचार अवलंबून असतात.

फुप्फुसाच्या कर्करोगाचे दोन प्रकार

  • स्मॉल सेल

  • नॉन-स्मॉल सेल

स्मॉल सेल

स्मॉल सेलच्या पहिल्या टप्प्यात कर्करोग फक्त फुप्फुस आणि त्यांचा आजूबाजूच्या भागांपर्यंत मर्यादित राहतो. तर दुसऱ्या टप्प्यात कर्करोगाचा प्रसार संपूर्ण शरीरावर होतो.

नॉन-स्मॉल सेल

नॉन-स्मॉल सेलच्या पहिल्या टप्प्यात कर्करोग फक्त फुप्फुसात आढळतो. दुसऱ्या टप्प्यात कर्करोग फुप्फुसात आणि जवळच्या भागात आढळतो. तर तिसऱ्या टप्प्यात कर्करोग छातीच्या मध्यभागी असलेल्या फुप्फुसात आढळतो. शेवटच्या टप्प्यात कर्करोग दोन्ही फुप्फुसांमध्ये आणि शरीराच्या इतर अवयवांमध्ये पसरतो.

Health Care Tips
Narcissistic Personality Disorder : नार्सिसिस्टिक पर्सनालिटी डिसऑर्डर म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

धूम्रपान कसे सोडावे?

  • धूम्रपान सोडणे कठीण जरी असले तरी आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे.

  • धूम्रपान सोडण्यासाठी तुम्ही नाशमुक्ती केंद्राची मदत घेऊ शकता.

  • धूम्रपानाला ट्रिगर करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा. उदा. चहा-कॉफी

  • धूम्रपान करणाऱ्या मित्रांची संगत सोडून द्या किंवा कमी करा.

  • धूम्रपान करण्याची इच्छा झाल्यास आपले लक्ष इतर कामामध्ये लावा. किंवा नवीन छंद जोपासा.

  • आपल्या शरीरावर आणि इच्छेवर तुम्ही नीट नियंत्रण ठेवल्यास कमी काळात धूम्रपान सोडू शकाल.

  • तुम्ही निकोटिन थेरपीचा वापर करू शकता. ही थेरपी सिगारेट सोडण्यासाठी प्रभावी आहे.

  • कोमट पाण्यात मध घालून नियमित प्यायल्याने धूम्रपान करण्याचा मोह टाळतो.

  • धूम्रपान करण्याची इच्छा होत असल्यास तोंडामध्ये वेलची चघळावी .

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Health Care Tips
Child Type 1 Diabetes Care: टाइप १ मधुमेहग्रस्त मुलांसाठी रामबाण उपाय, वाचा डॉक्टरांचा सल्ला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com