Child Type 1 Diabetes Care: टाइप १ मधुमेहग्रस्त मुलांसाठी रामबाण उपाय, वाचा डॉक्टरांचा सल्ला

Diabetes Control Tips in Marathi: टाइप १ मधुमेहाने ग्रस्त असलेल्या मुलांसाठी शारीरिक व्यायाम रामबाण उपाय आहे. यावर डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊन आपल्या मुलांची व्यवस्थित काळजी घ्या.
Child Type 1 Diabetes: टाइप १ मधुमेहग्रस्त मुलांसाठी रामबाण उपाय, वाचा डॉक्टरांचा सल्ला
Child Type 1 DiabetesSaam TV
Published On

मुलांच्या काळजीने पालक नेहमी चिंतेत असतो. त्यात तुमच्या मुलाला टाइप १ डायबेटिस असल्याचे निदान झाले असल्यास पालकांनी मुलांची विशेष काळजी घ्यावी. टाइप १ डायबेटिसमध्ये रक्तातील साखरेच्या पातळीवर सातत्याने लक्ष ठेवणे गरज आहे. टाइप १ मधुमेह असूनही तुमच मुलं परिपूर्ण, निरोगी आयुष्य जगू शकतं. दैनंदिन व्यायाम करणे हा त्यावर रामबाण उपाय आहे.

मुंबईच्या झेन मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलमधील पीडियाट्रिक एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. प्रशांत पाटील म्हणाले, टाइप १ डायबेटिस असलेल्या मुलाच्या दिनक्रमामध्ये शारीरिक व्यायामाचा समावेश करणे हे त्यांच्या आरोग्यासाठी आणि स्वास्थ्यासाठी महत्त्वाचे आहे. रोज ३० मिनिटे व्यायाम केल्यास रक्तातील साखरेच्या नियंत्रणावर सकारात्मक प्रभाव दिसेल. त्यांना निरोगी जीवनशैली लाभेल.

रक्तातील साखरेची पातळी नियमित तपासा

धावायला जाण्यापूर्वी ग्लुकोजची पातळी तपासा. असे केल्याने इन्सुलिनचा पुढचा डोस निश्चित करण्यास मदत होईल. FreeStyle Libre सारख्या कन्टिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग उपकरणाच्या मदतीने तुम्ही हे सहज करू शकता. अशी उपकरणे मोबाइल फोनमधल्या ॲपशीही जोडली जातात, ज्यामुळे तुम्हाला त्यांवरील आकडेवारी सहज प्राप्त होऊ शकते. संपूर्ण दिवसभर आणि रात्रीही ग्लुकोजची पातळी मोजत राहील.

मुलांच्या आवडीची कामे करा

मुलांना सक्रिय ठेवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या आवडीची कामे त्यांना करायला द्या. उदा. आवडता व्यायाम, सायकल चालविणे, नृत्य, क्रिकेट. फक्त मुलं एकटी पडणार नाही याची काळजी घ्यावी. मुलांसोबत पालकांनी हा व्यायाम करा. शरीराच्या हालचालीमुळे सगळ्यांचीच शरीर सुडौल बनेल. टाइप २ डायबेटिस असलेल्या मुलांना पुरेशी झोप घेणे तितकेच महत्वाचे आहे.

Child Type 1 Diabetes: टाइप १ मधुमेहग्रस्त मुलांसाठी रामबाण उपाय, वाचा डॉक्टरांचा सल्ला
Diabetes Health: मधुमेह असणाऱ्यांनी रिकाम्या पोटी खाऊ नका हे पदार्थ, अन्यथा होईल नुकसान

स्नॅक्स सोबत ठेवावा

व्यायाम करण्यापूर्वी रक्तातील साखरेची पातळी १००mg/dlच्या खाली असेल तर व्यायाम सुरू करण्यापूर्वी १५ ग्रॅम्स कर्बोदके खाणे महत्वाचे आहे. तुमचं मुलं ३० मिनिटांपेक्षा जास्त बाहेर फिरणार नाही याची काळजी घ्यावी. बऱ्याचदा वर्कआऊट पूर्वीच्या खाण्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहत नाही. अशावेळी व्यायाम करत असताना थोडा स्नॅक्स सोबत ठेवावा.

अन्नानुसार साखरेची पातळी तपासा

तुमच्या मुलांच्या रक्तातील साखरेची पातळी वेगवेगळ्या प्रकारच्या अन्नाला आणि व्यायामाला कशाप्रकारे प्रतिसाद देते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.व्यायामाच्या दरम्यान त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची पातळी, ते काय खात आहेत आणि कोणता व्यायाम करत आहेत हे वेळेसह नोंदवून ठेवा. यानुसार त्यांच्या संपूर्ण व्यायामाचे आणि खाण्यापिण्याचे वेळापत्रक तयार करा.

Child Type 1 Diabetes: टाइप १ मधुमेहग्रस्त मुलांसाठी रामबाण उपाय, वाचा डॉक्टरांचा सल्ला
Diabetes Tips : सावधान! मधुमेह असून उपवास करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com