Answer Sheet Viral Photo: भावानं नादच केला; उत्तरपत्रिकेत हृदयाच्या भागांना दिली गर्लफ्रेंडची नावं, पाहा PHOTO

School Boy Answer Sheet Viral Video: शाळकरी मुले खूप जास्त खोडकर असतात. ते अनेकदा उत्तरपत्रिकेत गाणी, कविता लिहून येतात. परंतु आता एका मुलाने चक्क हृदयाच्या आकृतीवर त्याच्या गर्लफ्रेंड्सची नावे लिहली आहेत.
Answer Sheet Viral Photo
Answer Sheet Viral PhotoSaam Tv
Published On

शाळा- कॉलेजमधील मुले खूप खोडकर असतात. ही मुले कधी काय करतील याचा भरवसा नाही. शाळेत कॉलेजमध्ये मुले अभ्यासाचा खूप कंटाळा करतात. त्यामुळे कधी परीक्षेला उत्तरपत्रिकेत रोमँटिक गाणे लिहतील, तर अनेकदा शिक्षकांवर काहीतरी लिहतील. मुलांच्या या उत्तरपत्रिकांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, आता एका मुलाचे चक्क पेपरमधील हृदयाच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळ्या मुलींची नावे दिली आहेत. आता तुम्ही म्हणाल की, हृदयाला कसं कोणी नाव देईल? परंतु ही नावे त्याने उत्तरपत्रिकेतील हृदयाच्या आकृतीला दिली आहे. या उत्तरपत्रिकेचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Answer Sheet Viral Photo
Viral Video : ती ओरडली, किंचाळत राहिली पण मदतीला कोणीही आलं नाही; मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेवर १५ कुत्र्यांचा हल्ला

एका विद्यार्थ्यांने उत्तरपत्रिकेत हृदयाची आकृती काढली होती. या आकृतीच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळी नावे दिली आहेत. एका भागाला पूजा, प्रिया तर दुसरीकडे नमिता, हरिता, रुपा, पूजा अशी त्याच्या गर्लफ्रेंड्सची नावे दिली आहेत. एवढेच नाही तर, त्या मुलाने या मुलींबद्दल माहितीदेखील लिहली आहे. त्यांचे वर्णन केले आहे. प्रियाच्या नावासमोर लिहलं आहे की, ती नेहमीच माझ्यासोबतच इन्स्टाग्रामवर चॅटिंग करत असते. ती मला आवडते. तर रुपाच्या नावासमोर लिहलंय की, मी रुपासोबत स्नॅपटॅटर नेहमी बोलत असतो. ती खूप सुंदर आणि क्युट आहे.

नमिताच्या नावासमोर लिहलंय की, ही शेजाऱ्याची मुलगी आहे. तिचे केस लांब आणि सुंदर आहेत. तिचे डोळे टपोरे आहेत. तर पूजाच्या नावासमोर लिहलंय की, ती माझी एक्स गर्लफ्रेंड होती. तर हरितासमोर लिहलंय की, हरिता माझी क्लासमेट आहे. या उत्तरपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Answer Sheet Viral Photo
Viral Video: आता 'फ्राईड राईस' नाही तर म्हणा 'मशीन फ्राईड राईस'; मशीन बनवणार राईस

शाळा- कॉलेजमधील मुले उत्तरपत्रिकेवर कधी काय लिहतील याचा काही नेम नाही. याआधीही मुलांनी उत्तपत्रिकेवर बॉलिवूडमधील गाणी, कविता तसेच देवदेवतांची नावे लिहली आहेत.याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Answer Sheet Viral Photo
Viral Video : याला म्हणतात A1 दर्जा! बाजारात आली 24 कॅरेट सोन्याची आईस्क्रीम; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com