Parenting Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : मुलांना पैशाची किंमत कशी कळेल? पालकांनी लावा 'या' सवयी, लहान वयात होईल मोठी बचत

Money Management : मुलांना पैशाची किंमत कळण्यासाठी सर्वप्रथम पालकांनी त्यांचे अति लाड करणे बंद करून लक्झरी आणि गरज मधला फरक समजावून सांगितला पाहिजे.

Shreya Maskar

मुलांना पैशांची किंमत आणि बचतीची सवय आपल्या कुटुंबातून सर्वप्रथम लागते. त्यामुळे पालकांनी वेळेतच मुलांना पैशांचे महत्त्व समजावून सांगावे. आर्थिक सुरक्षितता भविष्यात किती गरजेची आहे हे पटकून दिले पाहिजे आणि त्यासाठी वर्तमानात बचत करावी लागते हे सांगावे. तसेच पालकांनीही मुलांसमोर पैशांचा अतिवापर करू नये. उदा, शॉपिंग, बाहेरचे फूड खाणे. कारण मुलं तुमचं निरीक्षण करत असतात.

पिगी बँक

लहान मुलांना पालकांनी पिगी बँकमध्ये पैसे साठवण्याची सवय लावा. यामुळे त्यांच्याकडे हळूहळू करून खूप पैसे जमा होतील. तुम्ही मुलांना एका ठराविक टार्गेट फिक्स करून द्या आणि पैसे साठवण्यास प्रोत्साहन द्या.

आर्थिक गुंतवणूक

लहान वयातच मुलांना पालकांनी आर्थिक गुंतवणूकीचे धडे देणे महत्त्वाचे आहे. कारण त्याशिवाय त्यांना पैशांची किंमत कळणार नाही. वर्तमानातील गुंतवणूक भविष्यासाठी कशी गरजेची आहे. हे पालकांनी मुलांना समजवून सांगावे.

लक्झरी आणि गरज मधला फरक

लहान वयातच मुलांना पालकांनी लक्झरी आणि गरज यातील फरक समजावून सांगावा. यामुळे मुलांनी गोष्टींची आणि पैशांची किंमत कळते. यामुळे लहान मुलं कमी वयात योग्य आर्थिक निर्णय घेतात.

खेळातून पैशांचे महत्त्व

लहान मुलांना खेळायला खूप आवडते. त्यामुळे पालकांनी मुलांना नवा व्यापार सारख्या खेळातून पैशांचे महत्त्व समजावे.

छोट्या एक्टीव्ही

पालकांनी मुलांना रोज छोट्या एक्टीव्ही देऊन पैसे कमवायला शिकवावे. तसेच प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींची किंमत करायला शिकवावी.

हट्ट पुरवू नये

मुलांना पैशांची किंमत नसल्यास यात पालकांचा मोठा वाटा असतो. कारण पालक मुलांचे अतिलाड करून प्रत्येक हट्ट पूर्ण करतात. त्यामुळे मुलांना पैशांची आणि वस्तूंची किंमत समजत नाही. त्यामुळे लहान वयापासूनच मुलांनी शिस्त लावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharashiv Crime : बँकेची लोखंडी खिडकी तोडून चोरट्यांचा आत प्रवेश; दरोड्याचा प्रयत्न फसला

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

SCROLL FOR NEXT