Non Veg Food Saam Tv
लाईफस्टाईल

Non Veg Food: थंडीत चव चाखा खानदेशी काळ्या मटण सूपची; शरीराला मिळेल पौष्टिकता, पाहा रेसिपी

Non Veg Mutton Soup Recipe: नॉन व्हेज जेवण अनेकांना आवडते. नॉन व्हेज शरीरासाठी फायदेशीर असते. त्यात तुम्ही काळ मटण सूप खाऊ शकता. घरी तुम्ही काळ मटण सूप रेसिपी ट्राय करा.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mutton Soup Recipe:

वीकेंड सुरु झाला की सर्वांनाच काही न काही चमचमीत खायच असतं. त्यात मासांहारी लोकांना चिकन- मटण पदार्थ खायला आवडतात. रविवार आणि नॉन व्हेज जेवण हे एक वेगळं समीकरणच असते. परंतु नेहमी नेहमी सेम पद्धतीने बनवलेले नॉन व्हेज फूड खायला कंटाळा येतो. कधीतरी काहीतरी वेगळ्या पद्धतीने बनवलेले चिकन किंवा मटण ट्राय करायला हवे.

नॉन व्हेज बनवण्यासाठी खूप वेगवेगळ्या रेसिपी आहेत. अनेकांच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या आहेत. काही लोकांना तिखट -झणझणीत जेवण आवडतं तर कोणाला कमी तिखटाचं. नॉन व्हेज म्हटल्यावर खानदेशी स्टाईलचे जेवण प्रसिद्ध आहेत. खानदेशी स्टाईल म्हटल्यावर झणझणीत, तिखट असं जेवण. आज आम्ही तुम्हाला खान्देशी स्टाईल काळ मटण सूप रेसिपी सांगणार आहोत.

मटण सूप हे चविष्ट असते. त्याच सोबत शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते. अनेक आजारांवर मटण सूप प्रभावी असते. मटण सूप खालल्याने शरीरास अधिक पोषक तत्व मिळतात. हे सूप हाडांवर प्रभावी असते. हे सूप प्यायल्याने हाडं मजबूत होतात.

साम्रगी

  • मटण

  • बारीक चिरलेला कांदा

  • आले

  • मीठ

  • हळद

  • मिरी पावडर

  • जिरे

कृती

सर्वात आधी एका कुकरमध्ये फोडमीसाठी तेल घ्या. त्यानंतर तेलात कांदा भाजून घ्या. लालसर होईपर्यंत कांदा भाजा. त्यानंतर त्यात हळद टाका.

त्यानंतर फोडणीत आलं किसून टाका. फोडणी परतून घ्या. त्याला मिरी पावडर, जिरे टाकून एकजीव करा.

त्यानंतर त्यावर मटण टाका. सर्व मिश्रण एकत्रितपणे मिक्स करा.

मटण शिजत आल्यावर त्यात मीठ आणि पाणी टाका.

यानंतर कुकरचे झाकण लावून ४ ते ५ शिट्ट्या घ्या. त्यानंतर कुकर थंड होऊ द्या.

त्यानंतर सूप तुम्ही खाऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Save Electricity : AC सोबत फॅन लावावा का? वाचा वीज वाचवण्याच्या टिप्स

Pune News: पुण्यामध्ये पोलिस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू, फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंगजवळ ट्रेनने दिली धडक

Maharashtra Live News Update: पत्नीच्या हत्ये प्रकरणातील कैद्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातील घटना

Political Explainer : ठाकरेंनंतर एकनाथ शिंदेंचाही भीमशक्ती-शिवशक्तीचा प्रयोग; कुणाची ताकद वाढणार?

Pune Tourism : मित्रांची साथ अन् बाईक राइड, वीकेंडला पाहा पुण्यातील 'हा' मनमोहक धबधबा

SCROLL FOR NEXT