Sakshi Sunil Jadhav
उकाड्याने हैराण झाल्यानंतर अथवा खोलीतील तापमान थंड करण्याठी एसीची वापर केला जातो. पण एसीमुळे वीज बिल अव्वाच्या सव्वा येतं.
अनेकजण घरात एसी सुरू असतोच, पण त्यासोबत सिलिंग फॅनचाही वापर करतात.
काही लोक खोलीमध्ये एसी सुरू असताना फॅन बंद करण्याला पसंती दर्शवतात.
एसी सुरू असताना फॅनचा वापर करणं योग्य आहे का? एसीसोबत फॅन लावल्यास रूम अधीक थंड होते का? जाणून घेऊ.
एसी सुरु असताना फॅन सुरू ठेवल्यास खोली अधिक लवकर थंड होते.
एसीसोबत फॅन सुरू असल्यास रूम लवकर थंड होतेच, एसीवर अतिरिक्त भार पडत नाही. त्यामुळे वीज कमी प्रमाणात वापरली जाईल.
एसीसोबत फॅन सुरू असल्यामुळे हवा खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यात जाते. त्यामुळे रूम लवकर थंड होते.
फॅन सुरू असल्यास एसीचे तापमान कमी ठेवावे लागेल, ज्यामुळे आपल्या एसीच्या कंप्रेसरवर ताण येत नाही. विजेचे बिल कमी येते.
एसी आणि फॅन एकत्र लावल्यानंतर खोली लवकर थंड होते. त्यानंतर एसी बंद करून रात्रभर फॅन चालवू शकता.
खोली छोटी असेल आणि जास्त टन असणारा एसी असेल, तर फॅन लावण्याची गरज नाही.