Sakshi Sunil Jadhav
फ्रिज ही आपल्या दररोजच्या वापरातली वस्तू असते आणि त्यात आपण अन्न ठेवतो.
बऱ्याचदा फ्रिजच्या दरवाज्याचं रबर काही केल्या साफ होत नाही.
फ्रिजच्या रबर अक्षरश: घाण साचून काळाकुट्ट पडलेला असतो.
पुढे आपण हा रबर सोप्या पद्धतीने कसा स्वच्छ करायचा हे जाणून घेणार आहोत.
सुरुवातीला फ्रिजचा मेन स्विच बंद करा.
आता लिक्विड डिशवॉश, व्हिनेगर आणि बेकिंग सोडा मिक्स करून घ्या.
फ्रिजच्या रबराला पाणी लावून त्यामध्ये तयार मिश्रण ओता. ते ५ मिनिटे तसेच असूद्यात.
पुढे वायरची घासणी घेऊन ते घासून काढा.
पुन्हा त्यावर पाणी शिंपडा आणि रबर मऊ कपड्याने पुसून घ्या. काहीच सेंकदात तुमचा फ्रिज स्वच्छ होईल.