Maharashtra Live News Update: मावळमध्ये एसटी बस आणि खासगी बसचा अपघात, 11 प्रवासी जखमी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक १६ जून २०२५, महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, जयंत पाटलांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

माढा तालुक्यातील अरण गावतून शाळकरी मुलाचे अपहरण

शाळेच्या मैदानावर खेळत असताना काल सायंकाळच्या सुमारास कार्तिक बळीराम खंडागळे या दहा वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना घडलीय. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आलीय.

Pune:  पुणे रेल्वे पोलिस दलातील अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

पुणे -

पुणे रेल्वे पोलिस दलातील अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

पुण्यातील फुरसुंगी रेल्वे क्रॉसिंग जवळ अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू

सहायक पोलीस उप निरीक्षक चिंतामणी साधू पवार असे या अधिकाऱ्याचे नाव आहे

पवार हे पुणे लोहमार्ग मध्ये डी एस बी मध्ये कार्यरत होते

Pune: भाजपची पुण्यात पश्चिम महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित

पुणे-

भाजपची पुण्यात पश्चिम महाराष्ट्र विभागाची आढावा बैठक

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण बैठकीला उपस्थितीत

पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी बैठकीला उपस्थितीत

सोलापूर,सातारा,सांगली,कोल्हापूर,पुणे विभागातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थितीत

पुण्यात कर्वेनगर डीपी रोडवरील शुभारंभ लॉन्स येथे बैठक सुरू

Beed: महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मीक कराडसह मुलाचा सहभाग, विजयसिंह बाळ बांगर यांचा आरोप

बीड -

- महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट

- वाल्मीक कराडसह मुलाचा सहभाग गोट्या गीते सायको क्लियर विजयसिंह बाळ बांगर यांचे गंभीर आरोप.

- विजयसिंह बाळा बांगर यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची जिल्हा रुग्णालयात भेट घेऊन माध्यमांशी संवाद साधला दरम्यान मुलासह वाल्मीक कराड आणि गोट्या गीतेवर केले गंभीर आरोप.

- ज्ञानेश्वरी मुंडेंची जिल्हा रुग्णालयात जाऊन विजयसिंह बांगर यांनी घेतली भेट.

Wardha  News: प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ वर्धेत निषेध आंदोलन

वर्धा -

- प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ वर्धेत निषेध आंदोलन

- वर्धेच्या परिवर्तनवादी संघटननांनी एकत्र येत केले आंदोलन

- वर्धेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन

- आंदोलनात हल्ला करणाऱ्यांचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी

- संभाजी ब्रिगेड हे विचार असून यापुढे विचारांना दाबण्याचा प्रयत्न झाल्यास जश्याच तसा उत्तर परिवर्तन वादी संघटना देणार असल्याचा इशारा

- आंदोलनात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी

- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करत आंदोलनाची सांगता

Nashik: नाशिक महापालिकेत कार्यकारी अभियंत्याचे खुर्चीचा त्याग करत फरशीवर खाली बसून कामकाज

नाशिक -

- नाशिक महापालिकेत कार्यकारी अभियंत्याचे खुर्चीचा त्याग करत फरशीवर खाली बसून कामकाज

- पदोन्नती डावल्याने कार्यकारी अभियंत्याचे महापालिकेतच आंदोलन...

- पंतप्रधानांना पत्र लिहून केली न्यायाची विनंती, पत्राची सुरुवात गुजराती भाषेत...

Nanded: आमदार हेमंत पाटील यांच्या वक्तव्याविरोधात वंचित बहुजन आघाडीने केला निषेध

शिवसेना शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये केलेल्या वक्तव्याचा नांदेडमध्ये तीव्र निषेध करण्यात आला.

नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर आंबेडकरवादी संघटना आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आमदार हेमंत पाटील यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात आंबेडकरवादी संघटना तसेच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आमदार हेमंत पाटील यांना रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा यावेळी आंबेडकरवादी संघटनांनी दिला.

नवीन मद्य विक्री परवान्यावरून तृप्ती देसाई यांचा सरकारवर हल्लाबोल

राज्यात नवीन मद्य विक्री परवाने वितरणावरून विरोधक सरकारवर तुटून पडत असतानाच आता सामाजिक कार्यकर्तेही पुढे सरसावले आहेत. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी सरकारवर हल्ला चढवलाय.

लाडक्या बहिणींना 1500 रुपये देताय त्याचं स्वागत आहे पण त्यासाठी नवीन दारू विक्री परवाने देण्याची गरज नाही. एखाद्या महिन्यात पैसे नाही दिलेत तरी बहिणी रागावणार नाहीत पण त्यांचे संसार उद्धवस्त करू नका अशी विनंती त्यांनी केलीय.

1972 नंतर मद्य विक्री परवाने दिलेले नाहीत मग आताच का देताय असा सवाल तृप्ती देसाई यांनी सरकारला केलाय.

प्रवीण गायकवाड शरद पवार यांच्या भेटीला

प्रवीण गायकवाड शरद पवार यांच्या भेटीला

निसर्ग कार्यालय येथे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी प्रवीण गायकवाड आले आहेत

प्रविण गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पहिल्यांदा पवारांची भेट घेत आहेत

देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांना ऑफर

तुम्हाला आमच्यासोबत येण्याचा स्कोप आहे, ठाकरेचा शिवसेना पक्ष आजही आमचा मित्रपक्ष आहे असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याची ऑफर दिली आहे. विधीमंडळात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमनेसामने आले होते.

पुण्यातील वाघोली येथील भंगार दुकानाला भीषण आग

वाघोली येथे भंगार दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे या आगीमध्ये संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून दुकानात असलेल्या प्लॅस्टिक व इतर मटरेल मुळे प्रचंड असे धुराचे लोट आकाशात पसरले होते,घटनेची माहिती मिळतात वाघोली पोलीस पुणे महानगरपालिका व पीएमआरडीए अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू

व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणाला 18 महिने पूर्ण झाले असून आरोपी मोकाट फिरत आहेत. यामुळे पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलेलं अल्टिमेटम संपल्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातच विष प्राशन केले.

ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू.

आरोपींना अटक करण्यात यावयासाठी गेल्या सात दिवसांपूर्वी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी केली होती आरोपींना सात दिवसात न शोधल्यास आपण आत्मदहन करणार असल्याचा इशारा देखील दिला होता.

साताऱ्यातील पोवई नाक्यावर दोन गटात हाणामारी...

साताऱ्यातील पोवई नाका परिसरात दोन टोळक्यांत हाणामारी झाली. ही मारामारी महाविद्यालयीन युवकांच्या दोन गटांत झाली असून, परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं.काही वेळातच पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची भेट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची भेट

पुण्यात सकाळी मी घेतली गायकवाड यांची भेट

प्रवीण गायकवाड यांच्यावर केलेला हल्ला अत्यंत भ्याड आणि केविलवाणा आहे. जे या देशात वैचारिक मांडणी करतात समतावाद आणि याची भावना व्यक्त करतात त्यांच्यावर हल्ला होत आहे. ही असली परंपरा भारतीय जनता पक्षाच्या काही बगलबच्चाने सुरू केली आहे.

शिव शाहू फुले आंबेडकरांची वैचारिक भूमिका मांडणारा गांधीचा विचार मांडणारा जो तरुण कार्यकर्त्यावर केलेला हा हल्ला आहे.

ज्यांच्यावर मोका लावला पाहिजे जे आज जेलमध्ये राहिला पाहिजे ते लोक जर आज गॉडफादर म्हणून सत्ताधीशाच नाव घेत असेल तर ही महाराष्ट्राच्या साठी शरमेची बाब आहे.

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळात भेट

जुहूतील घरफोडीचा पर्दाफाश! १.१५ कोटींच्या चोरी प्रकरणी दोघे अटकेत 

जुहू परिसरातील बंद घरातून तब्बल १.१५ कोटींचे सोनं, हिरे आणि मौल्यवान दागिने चोरणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी छडा लावला आहे. घर बंद असताना दोन कपाटे फोडून सुमारे २.६ किलो वजनाचे दागिने व महागड्या वस्तू चोरीला गेल्याची तक्रार जुहू पोलिस ठाण्यात दाखल झाली होती.

या गुन्ह्याचा तपास गुंतागुंतीचा असतानाही पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत दोघा आरोपींना अटक केली. एकास झिरकपूर, पंजाबमधून तर दुसऱ्यास कोपरखैरणे, नवी मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले.

छाप्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी अंदाजे १.६ किलो वजनाचे आणि ८० लाख किंमतीचे दागिने, एक ५०,००० किंमतीची दुचाकी, तसेच २३,००० रुपयांचा मोबाईल फोन असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध

नाशिकच्या मालेगाव मध्ये आज मोसम पुलावरील महात्मा गांधी पुतळ्या जवळ सर्व पक्षीय संघटनांनी धरणे आंदोलन करत त्यांना झालेल्या मारहानीचा निषेध करण्यात आला.यावेळी अभिव्यक्ती स्वात्रंत्याची गळचेपी करणारा जनसुरक्षा कायदा रद्द करावा,मारहाण करणा-यांवर सर्वच आरोपींवर मकोका कायद्या नुसार कारवाई करुन त्यांची मालमत्ता जप्त करावी अशा मागण्या यावेळी आंदोलनकर्त्यांनी केल्या.

रवींद्र चव्हाण खंडोबाच्या चरणी नतमस्तक

भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज जेजुरी येथे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडोबाचे दर्शन घेतलय.... रवींद्र चव्हाण यांची महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी प्रथमच खंडोबाच्या चरणी नतमस्तक होत, दर्शन घेतलय.. रवींद्र चव्हाण हे आज माजी आमदार संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशासाठी सासवड येथे आले होते प्रवेशापूर्वी त्यांनी जेजुरी येथील खंडोबाला जाऊन तिथं खंडोबाचे दर्शन घेतले.. त्यांच्या समवेत माजी आमदार संजय जगताप हे देखील उपस्थित होते..

माझे परममित्र गेले अनेक वर्ष संजय जगताप यांनी आणि मी एकत्र काम केलं आहे, ते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत हे आनंदाची बाब आहे. जमिनीवरचा कार्यकर्ता ज्याची नाळ जनतेसोबत जोडली आहे तो आज भारतीय जनता पार्टीचे राजकीय प्रवाहात सामील होतोय. या भागातील अनेक विषय त्यांनी मला सांगितले.
रवींद्र चव्हाण

भोंदूबाबा बनून दागिने लंपास! अकोल्यातून अटक 

वेशांतर करून घरोघरी जाऊन पूजा करण्याच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाची पोलिसांनी अखेर पोलखोल केली आहे. आरोपीने पूजा विधीच्या नावाखाली दागिने घेऊन पोबारा केला होता. संबंधित तक्रार खार पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास करत अकोला जिल्ह्यातून आरोपीला अटक केली.

गुन्ह्यातील इसमाने विविध वेशांतर करून लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत पूजा, दक्षिणा आणि ग्रहबाधा निवारणाचे बहाणे करत दागिने उचलले. पीडित महिलेला भुरळ घालून तिच्याकडील सुमारे ५९ ग्रॅम वजनाचे दागिने पूजा विधीसाठी घेतले होते. मात्र पूजा पूर्ण झाल्यानंतर तो गायब झाला.

प्रवीण गायकवाडांवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ वाशीममध्ये रास्ता रोको

संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक, धक्का बुक्की,आणि प्राण घातक हल्ला केल्याच्या निषेधार्थ वाशिमच्या पाटणी चौकात आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शिवसेना उबाठा गट,वंचित बहुजन आघाडी,समनक जनता पार्टी, मनसेचे पदाधिकारी,कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

परिणय फुके यांनी भाटिगिरी करत देवेंद्रजींची तुलना रामकृष्ण महादेव सूर्य चंद्र यांच्याशी केली, असली तरी त्यांचे पौराणिक संदर्भ नक्कीच गंडले आहेत.
सुषमा अंधारे

ज्ञानेश्वरी मुंडेंना अतिदक्षता विभागात हलवले

पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात विष प्राशन करणाऱ्या ज्ञानेश्वरी मुंडेंना आता अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपी अजूनही मोकाटच असून, त्यांना अटक होत नसल्याने कुटुंबीयांमध्ये तीव्र नाराजी आहे. या न्यायासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. आता त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष असून, पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. जिल्ह्यात खळबळ उडवणारी ही घटना आता चर्चेचा विषय ठरली आहे.

पुणे महापालिकेच्या मोकळ्या जागी ढोल ताशा पथकांना सराव करू द्या, भाजपची मागणी

महापालिकेच्या मोकळ्या जागा ढोल ताशा पथकांना सरावासाठी उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी भाजपने आज केली आहे. पुणे शहरातील भाजपच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेत त्यांना याबाबत निवेदन सुद्धा दिले. राज्य सरकारने गणेशोत्सव हा राज्याचा महोत्सव असल्याचं सांगितलं आहे मात्र दुसऱ्या बाजूला ढोल ताशा पथकांना सरावासाठी जागा उपलब्ध नसल्याची खंत भाजपचे पुण्याचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी व्यक्त केली आहे. लवकरात लवकर पालिकेच्या मोकळ्या जागांवर ढोल ताशा पथकाला सराव करू द्यावा असे निवेदन भाजपने पालिकेला दिलंय.

Maharashtra Live News Update: शिंदे सेना आणि आनंदराज आंबेडकरांच्या रिपाईंची युती

Jalna: जालना नांदेड समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांचा आंदोलन

नांदेड समृद्धी महामार्गात बाधित होणाऱ्या जमिनींना योग्य मोबदला मिळावा यासाठी जालन्यातील देवमूर्ती येथे मागील 75 दिवसापासून आंदोलन सुरू आहे.जालना - जालना-नांदेड समृद्धी महामार्गासाठी होणाऱ्या जमीन संपादनाच्या विरोधात बाधित शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा देत, शेतकऱ्यांनी जनावरे आणि शेतीची अवजारे घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.

Sanjay Raut: संजय राऊतांचे भ्रष्टाचाराचे दावे फोल; ‘तीनशे कोटींचं कामच नाही, मग घोटाळा कसा?’ – आयुक्त यशवंत डांगे

अहिल्यानगर महानगरपालिकेत 300 ते 400 कोटींच्या रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चौकशीची मागणी केली. मात्र, त्यांच्या या गंभीर आरोपावर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त यशवंत डांगे यांनी ठामपणे फोल ठरवत वस्तुस्थिती मांडली आहे. डांगे यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारची बोगस कामे तसेच बोगस दिलं देण्याचा कुठलाही प्रकार झालेला नाही.

Shrirampur: श्रीरामपूरमध्ये दोन टन डाळिंबाची चोरी

श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथील शेतकरी भागवत खेमनर यांच्या शेतातील बागेतून जवळपास तीन लाख रूपयांचे दोन टन डाळिंब चोरीला गेले आहेत.. गेल्या काही दिवसांपासून परीसरात मोठ्या प्रमाणात डाळिंब चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.. मोठे कष्ट आणि पैसा खर्च करून हातातोंडाशी आलेला घास चोरटे हिरावून घेत आहेत.. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरट्यांना जेरबंद करण्याची मागणी होतेय..

Beed News: महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष घेतल्याची माहिती समोर

महादेव मुंडेंच्या हत्येला 18 महिने पूर्ण झाल्यानंतरही आरोपी अटक होत नसल्याने मुंडे कुटुंबीय आक्रमक.

सकाळी मुंडे कुटुंबियांनी केला होता आत्मदहनाचा प्रयत्न.

पोलीस अधीक्षकांच्या भेटीनंतर बाहेर येऊन मीडियाशी संवाद साधला आणि यानंतर परत त्यांच्या गाडीत बसल्यानंतर पॉइजन घेतल्याची माहिती.

त्यांना बेशुद्ध अवस्थेत बीडच्या जिल्हा रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Kalyan News: कल्याण पूर्वेत गढूळ पाण्यामुळे नागरिक त्रस्त

नळाला दूषित पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

मनसे आक्रमक, मनसे पदाधिकारी कार्यकर्ते बनियन टॉवेल लावून महापालिकेच्या ड प्रभाग कार्यालयात दाखल

पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालय बाहेर मनसेची जोरदार घोषणाबाजी

Koyana: कोयना धरणाच्या विसर्गात वाढ

धरणाचे सहा वक्र दरवाजे सहा फूट सहा इंचाने उघडले

एकूण अकरा हजार चारशे क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु

कोयना नदीवरील जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली

सांगलीला सावधानतेचा इशारा

धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास विसर्गात होणार वाढ

Politics: माजी खासदार हेमंत गोडसे पक्षात नाराज

मी पक्षशेष्टीवर नाराज नही. मात्र पक्ष अंतर्गट गटबाजी मुळे नाराज आहे..

भाजपात शित आणि डिसिपिलीन आहे आपल्या पक्षात नही..

शिवसेनेत पक्ष प्रवेश मोठ्या प्रमाणात आहे त्या मुळे गटबाजी होत आहे..

Chakan: चाकण चौकात वाहतूक कोंडी

पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण चौकात चहुबाजूंनी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी फोडावी यासाठी स्थानिक नागरिक पुणे नाशिक महामार्गावर चाकण चौकात रस्त्यावर उतरलेत. हातात फलक घेऊन ते प्रशासन आणि राजकारण्यांचा निषेध नोंदवत आहेत. हे आंदोलन करताना प्रवाश्यांना कोणता त्रास होणार नाही, याची खबरदारी घेतली जात असुन स्थानिकांचे वाहतुककोंडी विरोध अनोखे आंदोलन सुरुय

वसई विरार शहरात ओला उबेर चालकांकडून भाडे वाढीसाठी गाड्या आढळून आंदोलन

विरारच्या साईनाथ सर्कल जवळ गाड्या अडवून आंदोलनाला सुरुवात

रस्त्यावरून जाणाऱ्या ओला उबेर च्या गाड्या अडवून भाडे रद्द करण्याससाठी चालकांचा संप

रस्त्यात गाड्या अडवल्या जात असल्यामुळे वाढली वाहतूक कोंडी.

Virar: मर्निंग वॉक करताना ट्रकची जोरदार धडक; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरारच्या हद्दीत भालोली या परिसरात मॉर्निंग वॉक करताना भरागाव वेगात आलेल्या ट्रक ने एकाला उडविल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे

रविवारी सकाळी पावणे सात वाजता घडली आहे. या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर भाईंदर च्या ओकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सध्या जखमींची प्रकृती स्थिर असून ही अपघाताची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली आहे. याबाबत विरार च्या मांडवी पोलीस ठाण्यात ट्रक चालकाचे विरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस याची चौकशी करत आहेत.

Satpuda: सातपुड्यातील मोरखी तिनखुण्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांचे हाल...

महाराष्ट्राला गुजरात राज्याची जोडणारा दुर्गम भागातील महत्त्वाचा रस्त्याची दुरावस्था...

ठिकठिकाणी रस्ता खचलेला तर चिखलाचा साम्राज्य मुळे वाहने अडकून दररोजचे अपघात....

चिखलात फसलेला वाहन काढण्यासाठी चालकासह प्रवाशांची मोठी कसरत....

महाराष्ट्र गुजरातला जोडणाऱ्या या अक्कलकुवा तालुक्यातील तीनखुन्या रस्ता दुरुस्तीची मागणी...

मागणी करून ही रस्ता दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचा दुर्लक्ष...

Kolhapur: प्राडाच्या सदस्यांनी कोल्हापूर चप्पल दुकानांची केली पाहणी

प्राडाच्या सहा सदस्यांनी आज सकाळी कोल्हापुरातल्या छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात असणाऱ्या कोल्हापुरी चप्पल दुकानांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर चप्पल विक्रेत्यांशी संवाद साधला. तसच कोल्हापुरी चपलांचे विविध प्रकार बघून प्राडाचे सदस्य अक्षरशः थक्क झाले.

तोरणमाळला जाणारी वाहतूक ठप्प....

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असल्यास तोरणमाळला वाहतूक ठप्प....

वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेले पर्यटक अडकले वाहतूक कोंडीत....

तोरणमाळचा सात पायरी घाटात 4 ते 5 किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांचा रांगाच रांगा....

क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक तोरणमाळमध्ये दाखल झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या....

घाटातील अरुंद रस्ता यातच पर्यटकांनी घाटात बेशिस्तपणे लावलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी....

तोरणमाळला पुरेशी पोलीस यंत्रणा नसल्याने वाहतूक कोंडीची समस्या कायम...

Pune: पुण्यात आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी १ मिनिटं उशीर झाल्याने केंद्रावर गेट बंद

आज पुणे येथे मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाची परीक्षा होती. तरी विद्यार्थ्यांना 1 मिनिटे उशीर झाल्याने त्यांना परिक्षा केंद्रावर येऊ देत नसल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. हडपसर भागात रामटेकडी N Digital Zone मध्ये परिक्षा होती. 8.30 वाजता विद्यार्थीना बोलवण्यात आलं होत .मात्र 8.31 मिनिटांत परिक्षा केंद्रावर गेट बंद करण्यात आला आहे .तसे सुरक्षारक्षकांनी विद्यार्थ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे. व त्यांच्या वरच गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांना वानवडी पोलिस स्टेशन येथे घेऊन गेले आहेत.

छत्रपती संभाजी नगरमध्ये पाइपलाइन फुटली

चितेगाव येथील व्हिडिओकॉन कंपनीसमोर 1200 व्यासाची पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

छत्रपती संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन पुन्हा फुटली

जायकवाडी धरणावरून छत्रपती संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने पाण्याचे मोठे मोठे फवारे

Igatpuri: इगतपुरीतील मनसेच्या ३ दिवसीय शिबिराचा समारोप

- मनसेच्या प्रमुख नेत्यांसह सर्व पदाधिकारी फिरतायत माघारी

- शिबिरात मनसेच्या सर्वच प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी आग्रह

- मात्र राज ठाकरेंकडून नेते, पदाधिकाऱ्यांना सबुरीचा. सल्ला

- युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेणार, राज यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

- युती तसच शिबिरात काय झालं यासंदर्भात माध्यमांशी न बोलण्याचे देखील राज ठाकरेंचे सर्व पदाधिकारांना आदेश

Kolhapur: कोल्हापूरच्या सर्किट बेंच बाबत आज मुंबईत महत्वपूर्ण बैठक

उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात होण्याच्या हालचाली गतिमान

४० वर्षाच्या लढ्याला यश मिळणार

पश्चिम महाराष्ट्रासाठी हे सर्किट बेंच उपयुक्त ठरणार

कोल्हापूरात सर्किट बेंच स्थापन करण्यासाठी सरकार सकारात्मक

जिल्हाप्रमुख पद विकणे आहे ,चंद्रपुरमधील  होर्डिंग्जमुळे उडाली खळबळ

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात अजब होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख विकणे आहे, अशा आशयाचे हे होर्डिंग्ज आहेत. वरोरा शहरात चौकाचौकात आणि मुख्य मार्गांवर ते लावण्यात आले आहेत. उबाठा ही अक्षरे उलटी करून छापण्यात आली असून, संपर्क राऊत यांच्याशी साधावा, असे यात लिहिले आहे

लोकाभिमुख सामाजिक संस्थाचा आधारस्तंभ हरपला-  देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

लोकमान्य टिळक यांचा महाराष्ट्रातील समाजकारणातील विविधांगी क्षेत्रातील वारसा समर्थपणे चालविणारे लोकाभिमुख, मार्गदर्शक असे व्यक्तिमत्व डॉ. दीपक टिळक यांच्या निधनामुळे अनेक सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला आहे,' अशा शोकभावना व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य टिळक यांचे पणतू, दैनिक केसरीचे विश्र्वस्त, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक जयंत टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मुलुंडमधील काही भागांत आज पाणीपुरवठा बंद! | Mulund Water Crisis

मुलुंडच्या टी विभागातील काही भागात आज पाणीपुरवठा बंद राहणारेय. सकाळी 10 ते रात्री 10 असा 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं महापालिकेने सांगितलंय. मुलुंड पश्चिममधील मलबार हिल मार्ग, स्वप्ननगरी, वीणा नगर, मॉडेल टाऊन मार्ग, योगी हिल, घाटीपाडा याठिकाणी पाणीपुरवठा बंद असणारेय. महापालिकेकडून जलवाहिनी जोडणीचं काम हाती घेतलं जाणारेय. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेनं केलंय.

असदुद्दीन ओवैसी नांदेडमध्ये दाखल

एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी मध्यरात्री रात्री दीड वाजता नांदेड मध्ये दाखल.

आज नांदेड न्यायालयात हजेरी लावणार आहेत. 2010 च्या महापालिकेच्या पोट निवडणूकीत विना परवानगीने रैली काढल्याने ओवैसीसह नऊ जना विरोधात नांदेडच्या इतवारा पुलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज सकाळी 11 वाजता एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी न्यायालयात हजर राहणार आहे.

शालेय पोषण आहारात अळ्या,  

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शालेय पोषण आहारातुन देण्यात येणाऱ्या चॉकलेट मध्ये अळ्या निघाल्याच्या घटना समोर आल्यानंतर या संबधित गुत्तेदारावर कारवाई करावी अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सभागृहात केलीय.विद्यार्थांना देण्यात येणाऱ्या चॉकलेट मध्ये अळ्या आढळुन आल्या आहेत तरी त्या गुत्तेदाराचे कंञाट रद्द केले नाही.एका बाजुला आमदार निवास येथील कॅप्टीन मध्ये निकृष्ट जेवन दिल्यावरून एका आमदाराच्या तक्रारीवरून दुसऱ्याच दिवशी कॅन्टीन बंद करुन अन्न औषध प्रशासनाकडुन तपासणी होते माञ सामान्य विद्यार्थी ज्यांना आहारात थेट अळ्या येऊनही त्याची गंभीर दखल घेतली जात नसेल तर असा भेदभाव का?असा प्रश्न कैलास पाटील यांनी उपस्थित केला.

कान्हूर मेसाई येथील शेतकऱ्याचे सर्पदंशाने निधन

कान्हूर मेसाई (ढगेवाडी) येथील शेतकरी बबन वनाजी शिंदे (वय ५७) यांचे सर्पदंशामुळे दुःखद निधन झाले. जनावरांसाठी चारा आणताना त्यांना सर्पदंश झाल्याची माहिती आहे. उपचारासाठी शिरूर येथे हलवले असता, रात्री १०:४५ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.

जालन्यातील कार आणि दुचाकीचा भीषण अपघात 

जालन्यातील घनसावंगी - अंबड रोडवर कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. अंबड तालुक्यातील वलखेडा फाट्याजवळ ही घटना घडलीय. या अपघातात दुचाकीवरील दोघे भाऊ गंभीर जखमी झालेत. बाळू बरडे (वय 38 वर्ष) आणि दीपक बरडे (वय 25 वर्ष) अशी दोन्ही गंभीर जखमी झालेल्यांची नावं आहेत. बाळू आणि दीपक हे दोन्ही भाऊ आपल्या दुचाकीने पांगरखेडा परिसरातील वलखेडा फाट्यावरुन जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला कारने समोरासमोर जोराने धडक दिली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुचाकीवरील दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. यावेळी स्थानिकांनी तातडीने मदतकार्य करत दोन्ही भावांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लोणार तालुक्यात अचानक मुसळधार पाऊस

बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार तालुक्यात काल सायंकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने पांग्रा डोळे, टिटवी, नांद्रा या गावात पावसाचे पाणी शिरलं. गावात पावसाचे पाणी शिरल्याने काही घरांचे हे नुकसान झाल्याची माहिती आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 45.76 मिलिमीटर पवसाची नोंद

काल इशारा पातळीवर धावणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट

लांजा तालुक्यातील काजळी, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदी अजूनही दुथडी भरून वाहतेय

तर खेड तालुक्यातील जगबुडी नदी अजूनही इशारा पातळीवर

खेडमधील जगबुडी नदी 5.30 मीटरवर

पहाटेपासून जिल्ह्यात पावसाची उघडीप

मंडणगड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 88 मिलिमीटर पाऊस

सराफ व्यावसायिकाला लुटणारे तीन दरोडेखोर गजाआड, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई

परंडा ते कुर्डूवाडी मार्गावर चोरट्यांनी वाटमारी करत राञीच्या दरम्यान घरी जाणाऱ्या सराफ व्यावसायिकाला लुटल्याची घटना 7 जुलैला घडली होती.या प्रकरणातील तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे.या लुटमारीत चोरट्यांनी तीन लाख 97 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता.पोलिसांनी या प्रकरणी तपास करत सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील बारलोणी येथुन संतोष गुंजाळ याला पकडले व त्याच्याकडे चौकशी केली असता परंडा येथील राजु सिध्दु शिंदे याचे नाव सांगितले तर त्याला पोलिसांनी समता नगर परंडा येथुन ताब्यात घेतले तर दोघांनी मिळून सर्जेराव डिकोळे याचे नाव सांगितले त्याला माढा तालुक्यातील लव्हळ याला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडुन मुद्देमाल जप्त केला आहे.

खडकवासला धरणसाखळीमध्ये दमदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीतील चारही प्रमुख धरणांमध्ये पावसामुळे जलसाठ्यात मोठी भर पडली आहे. १६ जुलै रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांमधील पाण्याचा पातळीत लक्षणीय वाढ झाली असून, साठा गेल्या वर्षाच्या तुलनेत दुपटीने वाढला आहे.

३०० महाविद्यालयांत एकही विद्यार्थी नसताना कर्मचाऱ्याच्या वेतनावर कोट्यवधी खर्च

- राज्यातील ३०० महाविद्यालयांत एकही विद्यार्थी नसताना कर्मचाऱ्याच्या वेतनावर कोट्यवधी खर्च

- नागपूर खनाडपीठाचा निदर्शनास येताच गंभीर दखल : स्वतःच याचिका केली दाखल

- एकही विद्यार्थी शिक्षण घेत नसताना महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांना वेतन देणे म्हणजे सार्वजनिक निधीचा दुरुपयोग आहे.

- शिक्षण संस्थांना विद्यार्थ्यांचे आवश्यक प्रवेश मिळाले नसल्यास, यावर राज्य सरकार नियमतील तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांबाबत आवश्यक निर्णय घेऊ शकते

- राज्य सरकारने सखोल माहिती रेकॉर्डवर आणणे आवश्यक असल्याचं नागपूर खंडपीठाने म्हंटलं

- न्यायालयीन मित्राची निवड करत प्रकरणावर येत्या ४ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार...

पुणे ते सिंगापूर ही विमानसेवा पुढील अडीच महिने बंद

पुणे ते सिंगापूर ही विमानसेवा पुढील अडीच महिने बंद ठेवण्याचा निर्णय 'एअर इंडिया' या विमान कंपनीने घेतला आहे.

अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर 'एअर इंडिया'च्या ताफ्यातील विमानांच्या तक्रारी समोर येत आहे.

त्या पार्श्वभूमीवर नागरी विमान वाहतूक संचालनालयाने 'एअर इंडिया'च्या विमानांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे २४ जूनपासून १५ जुलैपर्यंत या कंपनीच्या विमानांची उड्डाणे बंद करण्यात आली होती.

मात्र, अद्याप सुरक्षितता आणि तांत्रिक दुरुस्ती सुरू असल्याने ३० सप्टेंबर पर्यंत विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आठवड्याला पाच विमानांची पुणे-दिल्ली- सिंगापूर अशी नियोजित उड्डाणे होती.

परिणामी, पुणे ते सिंगापूर या विमानांची सेवा अडीच महिने रद्द केल्याने याचा फटका पुणे-दिल्ली विमान सेवेलाही बसणार आहे.

Maharashtra Live News Update: रायगडमध्ये अतीवृष्टीचा बळी

महाड तालुक्यातील विन्हेरे विभागातील शिंगर कोंड येथे स्थानिक नदीच्या पात्रात वाहून गुराख्याचा मृत्यू

० सुरेश भोसले वय वर्ष 58 असे मृत गुराख्याचे नाव

० सुरेश भोसले हे गुरे चरण्यासाठी गेला असता जोरदा पावसादरम्यान ओढ्याचे पाणी अचनाक वाढल्याने पाण्याचा अंदाज आला नाही आणि हि दुर्घटना घडली

महाडमधील मांडवकर कोंड गावात बिबट्याच्या जोडीच दर्शन

महाड तालुक्यातील विन्हेरे विभागातील मांडवकर कोंड या गावात रहदारीच्या रस्त्यावर बिबट्याच्या जोडीच दर्शन घडल आहे. हे दोन बिबटे चार ते पाच तास एकाच परिसरात स्थान मांडून राहिल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी हे देखील मांडवकर कोंड येथे दाखल झाले. फटाके, गाड्यांचे हॉन वाजवत मोठा आवाज करीत या बिबट्याच्या जोडीला पळवून लावण्यात आले. दरम्यान मांडवकर कोंड आणि परिसरातील गावांमध्ये बिबट्यांच्या अशा प्रकारे वापरामुळे घबराट पसली आहे.

गणेशोत्सवासाठी लालपरीच्या पाच हजार जादा गाड्या

गणेशोत्सवासाठी एस टी महामंडळ आता सज्ज झालेय गणपतीत कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय.गणेशोत्सवासाठी कोकणात लाल परीच्या पाच हजार जादा गाड्या होणार आहेत.२३ आँगस्ट ते ७ सष्टेंबर पर्यत या गाड्या सोडण्यात येणार आहेत.रेल्वेनंतर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची एसटीला सर्वाधिक पसंती असते.

21जुलै पासुन जनावरांचा व्यापार करणार नाही.. कुरेशी समाजाचा ऐतिहासिक निर्णय

कुरेशी समाजावर हिंदुत्ववादी संघटनेसह पोलिस जनावरे तस्करीचा आरोप करत असतात त्यामुळे विदर्भातील कुरेशी समाजाने अमरावतीत बैठक घेत यानंतर जनावरे खरेदी -विक्री करणार नाही असा निर्णय त्यांनी घेतला,त्यामुळे आता याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे, आजही अमरावती जिल्ह्यासह विदर्भात जनावरे खरेदी विक्रीचा बाजार भरतो,मात्र गोवंश बंदी कायदा असल्याने कुरेशी समाजावर जनावरे तस्करीचा आरोप करून त्यांच्यावर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करतात तर सरकारकडून कुठलंही संरक्षण नसल्याने कुरेशी समाज आता एकाकी पडला असल्याने त्यांनी आता कंटाळून जनावरे खरेदी विक्रीवर 21 जुलैपासून बहिष्कार टाकला आहे,एकट्या अमरावती जिल्ह्यात 10 हजाराच्या वर कुरेशी समाज आहे या जनावरे खरेदी विक्रीवर त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून असतात मात्र पोलीस कारवाईला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी येऊ शकते

शेतकऱ्यांच्या शेतात हुमणी अळीचा कहर

बुलढाणा जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके बहरलेली असताना बुलढाणा जिल्हयातील सोयाबीन पिकांत आता हुमणी अळीने शिरकाव केला असून शेतकरी संकटात सापडला आहे .. एकट्या चिखली तालुक्यातील बारा गावांमध्ये 'हुमणी' अळीचा जोरदार प्रकोप दिसून येत आहे... विशेषतः सोयाबीन पीक या कीडमुळे बाधित झाले असून, नुकतीच अंकुरलेली पिके वाळू लागली आहेत... परिणामी शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे... तर हुमणी अळीने झालेले नुकसान नैसर्गिक आपत्तीत येत नसल्याने त्याला नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही, अळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय .. तर आता सोयाबीन पिक वाळत असल्याने दुबार पेरणीचे संकट ही उभे राहिले ..

कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत

कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची सोडत आज कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली . ही सोडत उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह नायब तहसीलदार लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांच्या समक्ष पारदर्शक पद्धतीने ही सोडत काढण्यात आली . कल्याण तालुक्यातील 41 ग्रामपंचायत पैकी तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे तर तीन ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे . अकरा ग्रामपंचायतींचे सरपंच पद मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे तर उर्वरित 24 ग्रामपंचायतीचे सरपंच पदे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहे . मागास प्रवर्गासाठी असलेल्या 11 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांमधील पाच पद ही मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित आहेत. तर 24 खुला प्रवर्गापैकी बारा पद ही खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहेत. एकूणच कल्याण तालुक्यातील एकूण 41 सरपंच पद आहेत त्यामधील 21 सरपंच पदही महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com