Onion price drops : मुंबईसह 'या' १०० ठिकाणी कांदा फक्त २५ रुपये किलो; दिवाळीत सर्वसामान्यांना दिलासा

Onion Sales: कांद्याची किंमत नाफेडकडून २५ रुपये प्रति किलो ठेवण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
Onion rs 25 kg
Onion rs 25 kgSaam TV
Published On

Onion Discount Sales:

प्रत्येक भाजीला चव येण्यासाठी त्यात कांदा टाकावाच लागतो. मात्र कांद्याचे दर वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागत आहे. ऐन दिवाळीत अन्य वस्तूंचा खर्च असताना कांदा महागल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या घरखर्चात भर पडलीये. सणासुदीच्या काळात प्रत्येकाची दिवाळी चांगली जावी यासाठी नाफेडकडून कमी किंमतीत कांदा विक्री सुरू आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Onion rs 25 kg
Onion Prices Increased : कांद्याचे दर लवकरच १५० रुपयांपर्यंत जाणार? दरवाढीचं नेमकं कारण काय?

फक्त २५ रुपये किलो कांदा

नागरिकांना सवलतीमध्ये कांदा मिळावा यासाठी नाफेडकडून वेगळे विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. येथे तुम्ही एक ते दोन किलो कांदा देखील खरेदी करू शकता. या कांद्याची किंमत नाफेडकडून २५ रुपये प्रति किलो ठेवण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

१०० ठिकाणी विक्री केंद्र

नाफेडकडून नागरिकांसाठी एकूण १०० ठिकाणी विक्री केंद्र सुरू करण्यात आलीत. यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच नवी मुंबई आणि पनवेलमध्ये केंद्र उभारण्यात येत आहेत. मोबाइल व्हॅनमार्फत रास्त दरात कांदा विक्री होणार असल्याची माहिती मिळालीये.

२५ केंद्रांतून विक्री सुरू

सद्यस्थितीमध्ये २५ विक्री केंद्रे उभारण्यात आलीत. त्यामार्फत नागरिकांपर्यंत स्वस्त:त कांदा पोहचवला जातोय. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत ग्राहक कल्याण मंत्रालय वेगवेगळ्या ग्राहक कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून बाजारपेठेत हस्तक्षेप करताना दिसते. मात्र नागरिकांसाठी भारत चनाडाळ, भारत आटा आणि कांदा विक्रीसारखी केंद्र सुरू केल्याने सामान्यांना दिलासा मिळतोय.

Onion rs 25 kg
Kanda Lilav : उद्यापासून कांदा लिलाव बेमुदत बंद : व्यापा-यांचा निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com