हिवाळा सुरू झाल्याने तुमच्यातील आळशीपणाचे प्रमाण वाढते. हे तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का? सकाळी अंथरुणातून उठवेसे वाटत नाही, तर यावेळी जास्त झोप लागते. हवामानातील बदलामुळे घडते असे आपल्याला अनेकदा सांगितले जाते, परंतु त्यामागील कारण क्वचितच कोणाला माहित असते. चला तर मग जाणून घेऊया हिवाळ्यात (Winter) जास्त झोपे का येते आणि त्यामागची कारणं कोणती असू शकतात.
हिवाळा सुरू झाला की, दिवस कमी होऊ लागतात कारण तापमान थंड होते आणि सूर्य लवकर मावळतो. अशा स्थितीत कमी सूर्यप्रकाशामुळे शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता निर्माण होऊ शकते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, व्यक्तीला जास्त झोप आणि थकवा यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. यासोबतच थंड तापमानामुळे चयापचय क्रिया वाढू शकते, ज्यामुळे भूक वाढणे आणि जास्त झोप यासारख्या समस्या (Problem) उद्भवू शकतात.
शारीरिक अॅक्टिव्हिटी
हिवाळा सुरू होताच, लोक व्यायाम थांबवतात आणि एका जागी बसणे पसंत करतात. अशा परिस्थितीत कमी शारीरिक हालचालींमुळे आळस आणि जास्त झोप यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
खाण्याच्या सवयींमध्ये बदल
हिवाळ्याच्या मौसमात आपण दूध, दही, चीज यासारख्या गोष्टींचे अधिक सेवन करतो. अधिक दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने देखील जास्त झोप येते.
सीझनल इफेक्ट डिसऑर्डर
हवामानातील बदलाचा माणसाच्या मानसिक आरोग्यावरही (Health) परिणाम होतो, त्यातील एक म्हणजे सीझनल इफेक्ट डिसऑर्डर. हा एक प्रकारचा नैराश्य आहे जो हवामानाशी निगडीत आहे. जरी हा विकार उन्हाळ्यात होतो, परंतु उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात त्याचे प्रमाण अधिक दिसून येते. यामध्ये व्यक्तीला तणाव, राग, चिडचिड अशी लक्षणे जाणवतात. यासोबतच, हे तुमच्या रात्री चांगली झोपण्याच्या क्षमतेत अडथळा आणते, ज्यामुळे तुम्हाला दिवसा झोप येते.
टाळण्यासाठी हे उपाय करा
दिवसा थोडा वेळ उन्हात बसा
हंगामी फळे आणि भाज्या खा
दररोज 20 ते 30 मिनिटे व्यायाम करा
सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.