Weight Loss SAAM TV
लाईफस्टाईल

Weight Loss : पोटाचा घेर काही केल्या कमी होईना? आजच सुरू करा 'हा' उपाय, झटपट वजन घटेल

Jumping On Rope Benefits : आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे बाहेरचे जंकफूड खाण्याचे प्रमाण वाढत चाले आहे. यामुळे पोटाची चरबी वाढून वजन वाढते. जे चांगल्या आरोग्यासाठी घातक आहे. नियमित दोरी उड्या मारल्यास तुम्ही पोटाची ढेरी कमी करू शकता.

Shreya Maskar

लहानपणी आपण मोठ्या प्रमाणात दोरी उड्या मारायचो. पण आजकाल याचे प्रमाण कमी झाले आहे. पण चांगल्या आरोग्यासाठी शरीराला वेळ देणे गरजेचे आहे. आहारातील बदलामुळे आपले वजन वाढते आणि पोटाची ढेरी काही केल्या कमी होत नाही. अशा वेळी रोज १० ते २० मिनिटे जरी दोरी उड्या मारल्या तरी आरोग्यास अनेक फायदे मिळतात. सतत दोरी उड्या मारल्याने तुम्हाला त्यातून आनंद मिळू लागतो.

स्नायूंचे दुखणे थांबते

नियमित दोरी उड्या मारल्यामुळे शरीराची हालचाल होते. ज्यामुळे पोटाची चरबी कमी करण्यास मदत मिळते. दोरी उड्या मारल्यामुळे स्नायू मजबूत होतात. पावसाळ्यात हाडं दुखत असतील तर नियमित सकाळी दोरी उड्या माराव्यात. यामुळे स्नायू खेचले जातात आणि हाडांना बळकटी येते.

हृदयाचे आरोग्य

हृदयाची गती वाढून रक्तप्रवाह सुरळीत होतो. तसेच फुफ्फुसाची क्षमता वाढते आणि हृदयाच्या निगडीत समस्या उद्भवत नाहीत. हृदय विकाराचा झटका टळतो.

पोटाची चरबी कमी

पोटाची चरबी कमी करण्यासाठी नियमित १० ते २० मिनिटे दोरी उडी मारणे खूप महत्वाचे आहे. यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते. परिणामी वजन नियंत्रणात राहते. शरीराचा चांगला वार्मअप करूनच दोरी उडी घालायला सुरुवात करावी.

मानसिक आरोग्य

नियमित दोरी उड्या मारणे हा व्यायामासोबत एक प्रकारचा विरंगुळा देखील आहे. यामुळे नैराश्या दूर होते. रोजचा ताण कमी होऊन मन आणि शरीर रिफ्रेश होते.

लहान मुलांचे आरोग्य

पावसाळ्यात होणाऱ्या संसर्गाशी सामना करण्यासाठी नियमित दोरी उड्या माराव्या. कारण यामुळे मुलांची रोग प्रतिकारक शक्ती वाढते. लहान मुलांनी विशेषता रोज दोरी उड्या मारल्या पाहिजेत. यामुळे मुलांची उंची झपाट्याने वाढेल. तसेच मुलांची कार्यक्षमता वाढते.

दोरी उड्या मारताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • कधीही रिकाम्या पोटी दोरी उड्या मारू नये.

  • जेवण केल्यावर दोरी उड्या मारणे टाळावे. यामुळे पोटात वेदना उद्भवतात. जेवण केल्यावर ३० ते ४० मिनिटांनी तुम्ही दोरी उड्या मारू शकता.

  • व्यायाम करताना वॉर्मअप झाल्यानंतर दोरी उड्या माराव्या. वॉर्मअप म्हणून दोरी उड्या मारू नये.

  • दमा आणि हृदयाशी संबंधित आजार असलेल्या लोकांनी दोरी उड्या मारू नये.

  • अनेकांना हाडांशी संबंधित आजार असतात. अशा लोकांनी सुद्धा दोरी उड्या मारणे टाळावे. यामुळे स्नायूंचे दुखणे वाढू शकते.

  • भूतकाळात कोणतीही शस्त्रक्रिया झाली असेल तर दोरी उड्या मारू नये आणि जरी तुम्हाला मारायचा असतील तर तब्येत सांभाळून दोरी उड्या माराव्या.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आम्ही नाही आणली भाड्याची माणसं... शिवाजी पार्कमध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांची शेरोशायरी|VIDEO

Maharashtra Live News Update : शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची पुणे येथे जाहीर सभा

Uddhav-Raj Thackeray Rally: ठाकरे मराठी माणसांचे 'सुरक्षाकवच'; भाऊकी जोमात, विरोधक कोमात

Gold vs Diamond Mangalsutra: कोणत्या साडीवर कोणतं मंगळसूत्र दिसेल अधिक रेखीव?

लाडक्या बहिणींनो कमळाला मदत करा, मगच नवऱ्याला जेवण वाढा; भाजपच्या महिला मंत्र्याचा अजब सल्ला

SCROLL FOR NEXT