Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; ७ दिवसांत पोटावरील चरबी कमी होईल

4 Weight Loss Drinks : वजन कमी करायचे म्हणजे फक्त कसरत आणि व्यायाम करावा असे नसते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात विविध ड्रिंक्सचा देखील समावेश करू शकता
Weight Loss Drinks
Weight Loss DrinksSaam TV

वजन कमी करण्यासाठी किंवा वजन मेन्टेन ठेवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही करत असतो. अशात सध्या उन्हाळा असल्याने सतत घाम येतो आणि गरमही फार होतं. वेटलॉस करण्यासाठी अनेक व्यक्ती व्यायाम करणे टाळतात. त्यामुळे आज या बातमीतून व्यायाम किंवा एक्ससाइज न करता वजन कमी करण्यासाठी काही सिंपल टीप्स जाणून घेणार आहोत.

Weight Loss Drinks
Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी 'हे' हेल्दी सूप करा ट्राय

वजन कमी करण्यासाठी खास ड्रिंक

वजन कमी करायचे म्हणजे फक्त कसरत आणि व्यायाम करावा असे नसते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहारात विविध ड्रिंक्सचा देखील समावेश करू शकता. सकाळी उठल्या उठल्या काही खाण्याआधी हे ड्रिंक पिल्याने वेटलॉस आणि विशेष म्हणजे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

१. लिंबू पाणी

वजन कमी करायचे असेल तर दिवसाची सुरुवात लिंबू पाणी पिऊन केल्याने फायदा होईल. लिंबू पाणी पिल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत होते. त्यामुळे पोटाजवळ असलेली अतिरिक्त चरबी देखील झटपट कमी होते.

2.ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये मोठ्याप्रमाणावर अॅन्टीऑक्सीडंट असतं. त्यामुळे आपली पचन क्षमता सुधारते. अनेक व्यक्ती नाश्ता करण्याआधी दुधाचा चहा पितात आणि दिवसाची सुरुवात करतात. मात्र तुम्ही चहा ऐवजी ग्रीन टी पिण्यास सुरुवात करा. त्याने चरबी कमी होईल आणि वजनही कमी होईल.

3. जीऱ्याचं पाणी

जर तुम्हचं वजन जास्त वाढलं असेल तर या सर्वापेक्षा जास्त जीऱ्याचं पाणी उपयुक्त ठरेल. रोज रात्री झोपताना एक कप पाण्यात एक चमचा जीरे भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर उपाशी पोटी हे पाणी प्या. असं पाणी पिल्याने तुम्हाला ८ दिवसांमध्ये बदल जाणवेल.

4. अदरक चहा

जर चहाशिवाय तुम्हाला जमत नसे तर दूधाचा चहा पिण्याऐवजी कोरा चहा बनवा. कोरा म्हणजेच दूध न टाकता काळा चहा बनवा. त्यात लिंबूरस आणि अद्रक किसून अॅड करा. त्याने देखील बेली फॅट कमी होतं.

पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी या काही सिंपल टीप्स आहेत. जर तुम्ही नियमीत हे ड्रिंक पिणे सुरु ठेवले तर तुमचं वजन कमी होईल आणि कायम मेन्टेन राहिल.

टीप : ही फक्त सामान्य माहितील आहे. तुम्हाला सविस्तर माहिती हवी असल्यास डॉक्टरांचा अथवा जिम ट्रेनरचा सल्ला घ्या.

Weight Loss Drinks
Weight Loss Tips : उन्हाळ्यात वजन कमी करायचय? आहारात करा 'या' फळांचा समावेश

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com