Vishal Gangurde
जगभरातील बहुतांश लोकांमध्ये लठ्ठपणाची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
लहान ते मोठ्यांपर्यंत अनेक जण लठ्ठपणामुळे त्रस्त झाले आहेत.
तुम्हाला उन्हाळ्यातही वजन कमी करायचं असेल,तर आहारात काही फळांचा समावेश करणे गरजेचे आहे.
कॅलरी आणि साखरेचे प्रमाण कमी असणाऱ्या फळांचा समावेश केल्याने वजन कमी होऊ शकतं.
किवी या फळामध्ये साखरेचे प्रमाण कमी असते. हे फळ हृदय आणि पोटासाठी फायदेशीर मानलं जातं.
किवी फळामुळे शरीरातील चयापचयाची क्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
कलिंगड फळाचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. या फळामध्ये ९० टक्के पाणी असते.
कलिंगडमध्ये कॅलरी आणि साखरेचे प्रमाण अतिशय कमी असते. त्यामुळे वजन कमी करण्यास गुणकारी मानले जाते.
संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सी आढळते. संत्री फळ उन्हाळ्यात वजन कमी करण्यास चांगला पर्याय आहे.