लिव्हर सिरॉसिस हा आजार सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो.
सुरुवातीची लक्षणे दिसत नसल्याने वेळेवर उपचार घेता येत नाहीत.
मद्यपान, हिपॅटायटीस आणि फॅटी लिव्हर ही मुख्य कारणं आहेत.
योग्य आहार, व्यायाम आणि नियमित तपासण्या करा.
जेव्हा आपण गंभीर आजारांबद्दल बोलतो तेव्हा बहुतेकांच्या लक्षात डायबिटीज किंवा वाढलेले वजन हे येतं. पण शरीरात शांतपणे घात करणारा आणखी एक धोकादायक आजार म्हणजे Liver Cirrhosis. हा आजार इतका गंभीर आहे की, त्याची सुरुवातीची लक्षणं अनेकदा दिसतच नाहीत आणि तोपर्यंत लिव्हरचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असतं.
लिव्हर सिरॉसिस म्हणजे काय?
लिव्हर सिरॉसिस हा दीर्घकालीन लिव्हर आजाराचा शेवटचा टप्पा असतो. यात हेल्दी पेशींच्या जागी हळूहळू scar tissue तयार होतात. त्याने रक्तप्रवाहात अडथळा सुद्धा निर्माण होतो आणि लिव्हरची महत्त्वाची कार्यं जसं की, शरीरातील विषारी द्रव्यांचं शुद्धीकरण, पचनक्रिया आणि रक्त गोठवण्याची प्रक्रिया व्यवस्थित होऊ शकत नाहीत.
तज्ज्ञ सांगतात की, जेव्हा लिव्हर काम करणं थांबवतो तेव्हाच शेवटच्या क्षणी ते कळतं. जेव्हा लिव्हर सिरॉसिसची लक्षणं दिसायला लागतात, तेव्हा बऱ्याचसे नुकसान झालेलं असतं.
लिव्हर सिरॉसिसची प्रमुख कारणं
जास्त प्रमाणात मद्यपान, व्हायरल हिपॅटायटीस बी आणि सी, फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD), तसेच काही आनुवंशिक आजार हे या स्थितीमागचं प्रमुख कारण आहेत.
मद्यपानामुळे होणारे नुकसान
सतत आणि जास्त प्रमाणात दारूचे सेवन केल्याने लिव्हरच्या पेशींवर दुष्परिणाम होतो. ही प्रक्रिया हळूहळू वाढत जाते आणि शेवटी सिरॉसिसमध्ये परिवर्तित होते. उपचार न घेतल्यास हे कॅन्सरमध्येही रूपांतरित होऊ शकतं.
फॅटी लिव्हर डिसीजजाडी
फॅटी लिव्हर डिसीज, डायबिटीज आणि चुकीचा आहारामुळे वाढणारा हा आजार आता भारतात झपाट्याने वाढतो आहे. काही वेळा शरीर स्वतःच्या लिव्हर पेशींवरच हल्ला करतं किंवा वारशाने आलेल्या विकारांमुळे लिव्हर खराब होतं.
न ओळखली जाणारी लक्षणे
लिव्हर सिरॉसिसची सुरुवातीची लक्षणं फार सौम्य असतात. त्यामुळे रुग्ण त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु हळूहळू ती गंभीर रूप धारण करतात. सतत थकवा जाणवणं, त्वचा आणि डोळे पिवळसर होणं, पोटात किंवा पायात सूज येणं, सहज रक्तस्राव होणं, तसेच स्मरणशक्ती आणि विचारशक्तीवर परिणाम होणं ही काही प्रमुख लक्षणं आहेत.
तज्ञांच्या मते, लिव्हर सिरॉसिस हा 'सायलेंट किलर' आहे. कारण तो हळूहळू पण गंभीर नुकसान करतो. त्यामुळे नियमित तपासण्या, योग्य आहार, मद्यपान टाळणं आणि हिपॅटायटीस लसीकरण हे लिव्हरचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे उपाय आहेत.
लिव्हर सिरॉसिस म्हणजे नेमकं काय आहे?
लिव्हर सिरॉसिस म्हणजे लिव्हरच्या पेशींमध्ये होणारी हळूहळू प्रक्रिया, ज्यामुळे लिव्हरचं कार्य थांबायला लागतं.
लिव्हर सिरॉसिस का होतो?
जास्त मद्यपान, हिपॅटायटीस बी आणि सी, फॅटी लिव्हर, तसेच काही जेनेटिक कारणं यामुळे सिरॉसिस होऊ शकतो.
सुरुवातीची लक्षणं कोणती असतात?
थकवा, भूक कमी होणं, पिवळसर त्वचा, पोट सूज, स्मरणशक्ती कमी होणं ही लक्षणं दिसू शकतात.
लिव्हर सिरॉसिस टाळण्यासाठी काय करावे?
मद्यपान टाळा, पौष्टिक आहार घ्या, हिपॅटायटीस लस घ्या आणि नियमित तपासण्या करा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.