Diabetes Causes: हे 6 पदार्थ आत्ताच टाळा, अन्यथा डायबिटीजचा धोका वाढेल

Diabetes Risk Foods: भारतात डायबिटीजचा धोका वाढतोय आणि त्याचे प्रमुख कारण म्हणजे चुकीच्या आहार सवयी. जाणून घ्या कोणते पदार्थ साखरेची पातळी वाढवतात आणि डायबिटीजचा धोका निर्माण करतात.
diabetes risk foods
diabetes risk foodssaam tv
Published On
Summary

बदलत्या आहारामुळे डायबिटीजचा धोका झपाट्याने वाढतो.

तळलेले, साखरयुक्त आणि मैद्याचे पदार्थ टाळावेत.

रोजच्या आहारात संतुलन ठेवल्यास डायबिटीज टाळता येतो.

भारतात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. बदलत्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये रोजच्या आहारात साखरेचे प्रमाण वाढत जाते आणि भविष्यात डायबिटीजच्या समस्येला सामोरे जावे लागते. पुढे आपण अशा पदार्थांबद्दल जाणून घेणार ज्याने तुमचे डायबिटीजचे प्रमाण वाढते. त्याचसोबत तुम्हाला डायबिटीज टाइप २ होण्याची शक्यता असते.

तळलेले पदार्थ

तुमच्या दैनंदिन आहारात तळलेल्या पदार्थांचा समावेश असला तर तुम्हाला भविष्यात डायबिटीजचा सामना करावा लागेल. त्यासाठी तुम्ही समोसा, भजी, चिप्स असे फॅट आणि शुगरलेवल वाढवणारे पदार्थ वेळीच टाळायला हवेत.

ग्रॅनोला

तुम्ही जर हेल्दी गोष्टींमध्ये रोजच्या आहारात प्रोटीन बार खात असाल तर तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे भविष्यात तुम्हाला डायबिटीजचा सामना करावा लागू शकतो. म्हणून असे पदार्थ तुम्ही टाळले पाहिजेत.

diabetes risk foods
Heart Attack Signs: हार्ट अटॅकची 'ही' लक्षणे झोपेतच जाणवतात, वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांनी दिल्ला सल्ला

सोडायुक्त पेय

तुम्ही जर सोड्याच्या कॅनमधील पेय सतत पित असाल तर तुमच्या शरीरातली साखरेची पातळी झपाट्याने वाढते. त्यामुळे स्वादूपिंडावर त्याचा गंभीर परिणाम होतो.

व्हाईट ब्रेड

अनेकांना रोजच्या नाश्त्यात ब्रेड पाहिजे असतात. मात्र त्यामध्ये पुर्णत: मैद्याचा आणि साखरेचा समावेश केलेला असतो. तसेच नाश्त्याच बिस्किटं, नानकेट अशा पदार्थांना कधीतरी खाणं सोयीचं असतं. अन्यथा तुमचे शुगर लेव्हल वाढू शकते.

व्हाईट राइस

रिफाइंड कार्ब्स आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पांढरा भात तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवतो.

पास्ता सॉस

पास्ता सॉस, क्रीम, चीज आणि भरपूर बटर घालून बनवला जातो. त्यामुळे एका सर्व्हिंगमध्ये सुमारे 1,000 कॅलरीज, 75 ग्रॅम फॅट आणि 100 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. पास्ता मैद्यापासून बनवला जातो, ज्यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढते. त्यामुळे लठ्ठपणाचा आणि डायबिटीजचा धोका वाढतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

diabetes risk foods
Health And Weight Loss: साठीत असताना तिशीतील सौंदर्य आणि फिटनेस हवी? मग या ३ गोष्टी फॉलो करा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com