Health And Weight Loss: साठीत असताना तिशीतील सौंदर्य आणि फिटनेस हवी? मग या ३ गोष्टी फॉलो करा

Fitness After 50: ५६ वर्षांच्या भाग्यश्री पाटवर्धनच्या फिटनेस आणि ब्युटी सिक्रेट्स जाणून घ्या. चालणे, स्विमिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग या तीन गोष्टींमुळे त्या आजही ३० वयातील दिसतात.
Bhagyashree health secrets
Bhagyashree fitness tipsgoogle
Published On
Summary

भाग्यश्री पाटवर्धन वयाच्या ५६ व्या वर्षीही तंदुरुस्त आणि तेजस्वी.

दररोज चालणे, स्विमिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग या तीन गोष्टींचा सराव.

व्यायामामुळे वजन नियंत्रणात राहतं आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते.

संतुलित आहार आणि नियमित जीवनशैली हे त्यांच्या सौंदर्याचे मुख्य रहस्य आहे.

सध्याच्या खाण्यापिण्याच्या जीवनशैलीचा परिणाम थेट तुमच्या स्कीनवर दिसायला लागतो. त्यातच अनेकांना हा प्रश्न पडतो की, बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या उतरत्या वयात इतक्या तरुण आणि सुंदर कशा दिसतात? पुढे आपण सलमान खानच्या प्रसिद्ध 'मैंने प्यार किया' या चित्रपटातल्या अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनच्या फिटनेस बद्दल जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन आता ५६ वर्षांची आहे. तरी सुद्धा तिच्या चेहऱ्यावर ३० वर्षासारख्या स्त्रीसारखे तेज पाहायला मिळते. या वयात अभिनेत्री फीट राहण्यासाठी आणि सुंदरते काय करते याबद्दल आपण थोडक्यात सिक्रेट्स जाणून घेणार आहोत.

Bhagyashree health secrets
Heart Attack Signs: हार्ट अटॅकची 'ही' लक्षणे झोपेतच जाणवतात, वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांनी दिल्ला सल्ला

सगळ्यात अगोदर आपण फिटनेसबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर जीममध्ये किंवा पार्कमध्ये जाऊन एक्सरसाइज करायला वेळ नसेल तर तुम्ही पुढील टिप्स फॉलो करु शकता. हा व्यायाम तुम्हाला घरातच करता येऊ शकतो.

१ चालणे.

चालणे ही एक शरीरासाठी आवश्यक वाटणारी एक्सरसाइज आहे. ही एक्सरसाइज सगळ्यात सोपी आणि महत्वाची असते. तुम्ही चालण्यासाठी बालकनी, गच्ची किंवा गार्डनमध्ये सुद्धा जाऊ शकता. त्याने तुम्हाला फीट राहण्यासाठी, कोलेस्ट्रॉल सुधारण्यासाठी, हाडं मजबूत करण्यासाठी सगळ्यात जास्त फायदा होईल.

२. स्विमिंग करणे

स्विमिंग करणे हा सगळ्यात फायदेशीर व्यायाम म्हणायला हरकत नाही. पाण्यात पोहत राहील्याने तुमचा स्नायूंचा ताण सहन करावा लागत नाही. ज्या व्यक्तींना संधिवाताचा त्रास आहे, त्यांनी स्विमिंग नियमित केली पाहिजे. पोहण्यामुळे तुमची मानसिक स्थिती आणि मूड सुधारतो. तसेच कॅलरीज बर्न करण्यासाठी आणि टोन अप करण्यासाठी याचा खूप वापर केला जातो.

३. स्ट्रेंथ ट्रेनिंग

जर तुम्हाला वाटत असेल की, स्ट्रेंथ ट्रेनिंग ही पुरुषांसाठी एक शारीरिक क्रिया आहे. ज्यासाठी खूप ताकद लावावी लागते तर तुम्ही चुकताय. तुम्ही घरात ट्रेनिंगचे साहित्य घेऊन हलके वजन उचलू शकता. पुढे तुमच्या क्षमतेनुसार तुम्ही काम करु शकता. त्यामुळे मांसपेशी मजबूत होतात. जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी फॉलो करता आल्या तर तुम्ही काहीच दिवसात सुंदर आणि फीट दिसाल.

Bhagyashree health secrets
Fridge Cleaning Tips: फ्रिजचा रबर काळा पडलाय? मग महागडे क्लिनर कशाला? 'या' जबरदस्त ट्रिक्स करा फॉलो
Q

भाग्यश्री ५६ वयातही इतक्या तरुण कशी दिसते?

A

चालणे, स्विमिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग करतात. यामुळे त्यांचे शरीर तंदुरुस्त आणि त्वचा तेजस्वी राहते.

Q

कोणता व्यायाम घरच्या घरी करु शकतो?

A

वजन उचलणे, स्ट्रेचिंग आणि चालणे अशा सोप्या घरगुती व्यायाम आहेत.

Q

त्वचेची चमक टिकवण्यासाठी काय करावे?

A

भरपूर पाणी पिणे, संतुलित आहार आणि नियमित झोप हेच मुख्य रहस्य आहे.

Q

वय वाढल्यानंतर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?

A

चालणे, स्विमिंग, हलका व्यायाम आणि साखर-मिठाचा वापर कमी करणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com