Sakshi Sunil Jadhav
फ्रिज हा दैंनदिन वापरातल्या उपकरणांपैकी एक मानला जातो. फ्रिजच्या दाराला असलेला रबर गॅस्केट काळा पडतो, त्यात धूळ, बुरशी आणि घाण साचते.
फ्रिजच्या दाराला फक्त वासच नाही तर थंडावा टिकवून ठेवण्याची क्षमता देखील कमी होते. त्यामुळे वेळोवेळी रबर साफ करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया काही सोप्या टिप्स आहेत.
एका भांड्यात कोमट पाण्यात थोडा लिक्विड साबण मिसळा आणि मऊ कपड्याने रबर पुसून घ्या. त्याने रबर लगेचच चमकेल.
छोट्या-छोट्या जागा स्वच्छ करण्यासाठी जुन्या टूथब्रशचा वापर करा. त्याने तुम्हाला कमी मेहतन आणि कमी वेळ लागेल.
बेकिंग सोडा आणि पाणी एकत्र करून तयार केलेले मिश्रण रबरवर हलके चोळा. याने बुरशी निघून जाते.
व्हिनेगर हा नैसर्गिक क्लिनर आहे. तो जंतू मारतो आणि दुर्गंधी दूर करतो.
साफसफाईनंतर रबर पूर्णपणे कोरडे पुसा. ओलावा राहिल्यास पुन्हा बुरशी तयार होते.
रबर कोरडे होऊ नये म्हणून त्यावर थोडं बेबी ऑईल किंवा व्हॅसलिन लावा.
दर १५ दिवसांनी रबर पुसून घ्या. यामुळे फ्रिज दीर्घकाळ टिकतो.
जर रबर सैल झाला असेल तर त्वरित बदल करा, नाहीतर थंडावा बाहेर जातो. त्यामुळे नेहमी रबर तपासत राहा.
अन्नाचे तुकडे रबरला चिकटणार नाहीत याची खात्री करा. कारण त्याने फ्रिजमध्ये उग्र वास येतो.