Fatty Liver Disease saam tv
लाईफस्टाईल

Fatty liver disease: मद्यपान न करताही लिव्हर होतंय खराब? फॅटी लिव्हरच्या या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

Non alcoholic fatty liver disease: नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर हा वाढता आरोग्यविषयक धोका बनत आहे. चुकीचा आहार, लठ्ठपणा, ताण आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे हा आजार होऊ शकतो. त्याची लक्षणे, कारणे आणि बचावाचे उपाय जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

बदलती जीवनशैली, अनियमित खाण्यापिण्याच्या सवयी आणि वाढता ताण यांचा सर्वाधिक परिणाम शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक असलेल्या लिव्हरवर होतोय. त्यामुळेच गेल्या काही वर्षांत नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) या आजाराचं प्रमाण झपाट्याने वाढताना दिसतंय. विशेष म्हणजे हा आजार मद्यपानामुळे होत नाही तर आपल्या दैनंदिन सवयी, चुकीचा आहार आणि कमी शारीरिक हालचाल यामुळे उद्भवतो.

सुरुवातीच्या टप्प्यात याची लक्षणं फारशी जाणवत नाहीत. त्यामुळे अनेकांना हा आजार झाल्याचं उशिरा लक्षात येतं. मात्र वेळेत काळजी घेतली नाही तर पुढे जाऊन लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हर निकामी होण्यासारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर म्हणजे काय?

नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये लिव्हरच्या पेशींमध्ये गरजेपेक्षा जास्त चरबी साठू लागते. सुरुवातीला ही चरबी हळूहळू वाढत जाते आणि लिव्हरच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू लागते. यामुळे लिव्हरमध्ये सूज येऊ शकते.

फॅटी लिव्हर होण्याची प्रमुख कारणं

चुकीच्या खाण्याच्या सवयी

सतत तळलेले पदार्थ, गोड पदार्थ, फास्ट फूड आणि जंक फूड खाल्ल्याने शरीरात अतिरिक्त चरबी तयार होते. ही चरबी हळूहळू लिव्हरमध्ये जमा होऊ लागते आणि फॅटी लिव्हरचा धोका वाढतो.

लठ्ठपणा

विशेषतः पोट आणि कंबरेभोवती वाढलेली चरबी लिव्हरवर अतिरिक्त ताण आणते. त्यामुळे लिव्हरमध्ये चरबी साठण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.

इन्सुलिन रेझिस्टन्स

जेव्हा शरीर इन्सुलिनचा योग्य प्रकारे वापर करू शकत नाही तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते. त्याचबरोबर ट्रायग्लिसराइड्सचं प्रमाणही वाढतं. यामुळे लिव्हरमध्ये चरबी साठण्याची शक्यता अधिक वाढते.

शारीरिक हालचालींचा अभाव

दिवसभर बसून राहणं, व्यायाम न करणं किंवा शारीरिक हालचाल कमी असणं यामुळे शरीरातील चयापचय प्रक्रिया मंदावते. याचा थेट परिणाम लिव्हरच्या आरोग्यावर होतो.

ताणतणाव आणि अपुरी झोप

सततचा मानसिक ताण आणि पुरेशी झोप न मिळाल्यामुळे शरीरात कॉर्टिसोल या हार्मोनचं प्रमाण वाढतं. हे हार्मोन लिव्हरमध्ये चरबी साठण्याच्या प्रक्रियेला चालना देऊ शकते.

फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणं

  • पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही शरीरात ऊर्जा नसल्यास किंवा सतत थकवा जाणवत असल्यास ते फॅटी लिव्हरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं.

  • लिव्हरच्या भागात जडपणा, अस्वस्थता किंवा हलकी वेदना जाणवू शकते.

  • अन्न नीट न पचणं, वारंवार गॅस होणं किंवा पोट फुगल्यासारखं वाटणं यासारख्या समस्या दिसू शकतात.

  • पूर्वीप्रमाणे भूक न लागणं किंवा खाण्याची इच्छा कमी होणं हेही एक महत्त्वाचं लक्षण मानलं जातं.

  • लिव्हरचे कार्य बिघडू लागल्यास काही प्रकरणांमध्ये त्वचा आणि डोळ्यांमध्ये पिवळसरपणा दिसू शकतो.

  • काही लोकांचे वजन अचानक वाढतं तर काहींचं वजन कमी होऊ शकतं. अशा बदलांकडे दुर्लक्ष करू नये.

फॅटी लिव्हरपासून बचाव कसा करावा?

जीवनशैलीत बदल करा

फॅटी लिव्हरपासून बचाव करण्यासाठी नियमित शारीरिक हालचाल अत्यंत महत्त्वाची आहे. दररोज किमान 30 ते 45 मिनिटं चालणं, योगासनं करणं किंवा हलका व्यायाम करणं फायदेशीर ठरतं.

संतुलित आहार घ्या

आहारात भरपूर फायबरयुक्त पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळे, ओट्स, संपूर्ण धान्ये आणि प्रोटीनचा समावेश करा. तळलेले पदार्थ, साखरयुक्त पेये, रेड मीट आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ शक्य तितके टाळा.

वजन नियंत्रणात ठेवा

हळूहळू आणि योग्य पद्धतीने वजन कमी केल्यास लिव्हरमधील चरबी कमी होण्यास मदत होते. मात्र अतिशय वेगाने वजन कमी करणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.

रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची तपासणी करा

ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवल्यास फॅटी लिव्हरचा वेग कमी करता येतो आणि पुढील गुंतागुंत टाळता येते.

पुरेशी झोप आणि ताण नियंत्रण

दररोज पुरेशी झोप घेणं आणि ताण कमी करण्यासाठी योग, ध्यानधारणा तसंच श्वसनाचे व्यायाम करणं उपयुक्त ठरतं. यामुळे मानसिक शांतता टिकून राहते आणि शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुसळधार पावसामुळे नालासोपारा पूर्वेतील तुळींज पोलीस ठाण्यातही पाणी साचले

Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक अपडेट, लोहगड दुर्घटनेआधीचा रोमँटिक व्हिडिओ आला समोर

Ladki Bahin Yojana: जून संपायला अवघे ६ दिवस बाकी; लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी काय खावे? आणि काय खाऊ नये? वाचा पूर्ण लिस्ट

Taila Baila Fort : ३,३२२ फूट उंचीवरून शत्रूंवर नजर ठेवणारा 'तैलबैला' किल्ला पाहिलाय का? मुंबईपासून आहे जवळ

SCROLL FOR NEXT