Brain Tumor Warning Signs: कोणत्या व्यक्तींना असतो ब्रेन ट्युमर सर्वाधिक धोका? सुरुवातीला दिसणारी ही लक्षणं जाणून घ्या

Brain Tumor Risk Factors: सतत डोकेदुखी, चक्कर येणे किंवा फिट्स येणे ही ब्रेन ट्युमरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. कोणत्या लोकांना जास्त धोका असतो, त्याची कारणे, लक्षणे आणि बचावाचे उपाय जाणून घ्या.
Brain Cancer Early Symptoms
Brain Tumor Warning Signssaam tv
Published On

आजच्या धावपळीच्या जीवनात डोकेदुखी, चक्कर येणं किंवा थकवा जाणवणं या गोष्टी अनेकजण सामान्य समजून दुर्लक्ष करतात. मात्र काही वेळा हीच लक्षणं गंभीर आजाराची सुरुवात असू शकतात. मेंदूतील ट्युमर (ब्रेन ट्युमर) हा असाच एक गंभीर आजार आहे. सुरुवातीला त्याची लक्षणं फारशी जाणवत नाही, त्यामुळे अनेकदा हा आजार उशिरा लक्षात येतो. काही लोकांमध्ये इतरांच्या तुलनेत ब्रेन ट्युमरचा धोका अधिक असतो.

ब्रेन ट्युमर म्हणजे नेमकं काय?

मेंदूमधील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागल्या की त्यांचा एक गाठीसारखा समूह तयार होतो त्यालाच ब्रेन ट्युमर म्हणतात. काही ट्युमर हळूहळू वाढतात तर काहींची वाढ वेगाने होते आणि ते मेंदूच्या इतर भागांवरही परिणाम करू शकतात.

ब्रेन ट्यूमरचे प्रकार

ब्रेन ट्युमरचे मुख्यतः दोन प्रकार असतात. पहिला म्हणजे सौम्य (Benign) ट्युमर जो कॅन्सरचा नसतो. दुसरा म्हणजे घातक (Malignant) ट्युमर, जो कॅन्सरशी संबंधित असतो. या आजारामागे रेडिएशनचा संपर्क, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असणं, काही विषाणू किंवा कुटुंबातील आनुवंशिक इतिहास यांसारखी कारणं असू शकतात.

Brain Cancer Early Symptoms
Heart health: रात्री उपाशी पोटी झोपल्याने हार्ट अटॅक येतो? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

शरीरावर कसा होतो परिणाम?

ब्रेन ट्युमरमुळे मेंदूचं कार्य बिघडू शकतं. ट्युमरचा आकार वाढत गेला की, तो मेंदूतील नसांवर आणि ऊतींवर दबाव टाकतो. त्यामुळे विविध प्रकारची लक्षणं दिसू लागतात. सतत डोकेदुखी होणं, मळमळ किंवा उलट्या होणं, फिट्स येणं, दृष्टी कमी होणं किंवा धूसर दिसणं, बोलण्यात किंवा समजून घेण्यात अडचण येणं आणि चालताना तोल जाणं अशी लक्षणं दिसू शकतात.

काही रुग्णांमध्ये हात-पाय सुन्न पडणं, शरीराच्या एका बाजूला कमजोरी जाणवणं किंवा वागण्यात आणि स्वभावात अचानक बदल होणं यासारखे त्रासही दिसून येतात. ट्युमर मेंदूच्या कोणत्या भागात आहे, यावर ही लक्षणं अवलंबून असतात.

वेळेत उपचार न घेतल्यास हा आजार मेंदूच्या महत्त्वाच्या भागांना नुकसान पोहोचवू शकतो आणि काही प्रकरणांमध्ये जीवासाठीही धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे सुरुवातीची लक्षणं कधीही दुर्लक्षित करू नयेत.

कोणत्या लोकांना ब्रेन ट्युमरचा धोका जास्त असतो?

न्यूजपॉईंट्स या बेवसाईटला माहिती देताना सर्वोदया हॉस्पिटलमधील न्यूरोसर्जरी विभागाचे डॉ. गंगेश गुंजन यांनी सांगितलं की, काही लोकांमध्ये ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता सामान्य लोकांपेक्षा अधिक असते. ज्या व्यक्तींच्या कुटुंबात यापूर्वी ब्रेन ट्युमर किंवा इतर गंभीर न्यूरोलॉजिकल आजार झाले आहेत, त्यांच्यात हा धोका वाढलेला दिसतो.

Brain Cancer Early Symptoms
Chips side effects: भूक लागली की चिप्स खाताय? पाहा तुमच्या शरीरासाठी किती धोकादायक ठरतेय ही सवय
  • याशिवाय, दीर्घकाळ रेडिएशन थेरपी घेतलेल्या व्यक्तींनाही ब्रेन ट्युमरचा धोका जास्त असू शकतो. विशेषतः कर्करोगाच्या उपचारादरम्यान रेडिएशन घेतलेल्या रुग्णांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

  • काही आनुवंशिक विकार असलेल्या व्यक्तींमध्येही ब्रेन ट्युमर होण्याची शक्यता वाढते. यामध्ये ली-फ्रॉमेनी सिंड्रोम, न्यूरोफायब्रोमॅटोसिस आणि ट्युबरस स्क्लेरोसिस यांसारख्या विकारांचा समावेश होतो.

  • महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये ब्रेन ट्युमरचे प्रमाण किंचित जास्त आढळते. तसंच वय वाढत गेल्यानंतर धोका वाढू शकतो. मात्र हा आजार केवळ वृद्धांनाच होतो असं नाही. लहान मुलं आणि तरुणांनाही तो होऊ शकतो.

ब्रेन ट्युमरपासून बचावासाठी काय करावं?

  • मोबाइल आणि वायरलेस उपकरणांचा वापर गरजेपुरताच करावा आणि त्यांचा अतिवापर टाळावा.

  • आहारात पौष्टिक, संतुलित आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध पदार्थांचा समावेश करावा.

  • सतत डोकेदुखी, चक्कर येणं, फिट्स येणं किंवा इतर संशयास्पद लक्षणं दिसत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

  • कुटुंबात कोणाला ब्रेन ट्युमर झाला असल्यास नियमित न्यूरोलॉजिकल तपासणी करून घेणे फायदेशीर ठरू शकते.

  • नियमित व्यायाम करावा आणि मानसिक तणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.

Brain Cancer Early Symptoms
Kidney Tumor: पाठदुखीकडे दुर्लक्ष करत वारंवार पेनकिलर घेताय? किडनी ट्युमरचा धोका असू शकतो, तज्ज्ञांचा इशारा

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com