Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

Psychological disorders: पॅरानोइया म्हणजे कोणताही ठोस पुरावा नसताना इतरांविषयी सतत संशय वाटणे. त्याची कारणे, लक्षणे आणि मानसिक आरोग्यावर होणारे परिणाम जाणून घ्या. वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यास योग्य उपचार आणि मदत मिळू शकते.
Paranoia symptoms
Paranoia symptomssaam tv
Published On

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण कामाच्या ठिकाणी, शाळा-कॉलेजमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी मनाला लावून घेतात. एखादा साधा विनोद किंवा सहज बोललेलं वाक्यही काही लोकांना टोमणा वाटू शकतो. अशा वेळी त्यांना इतर लोक जाणूनबुजून त्रास देतायत किंवा त्यांच्या विरोधात कट रचतायत असा संशय येऊ लागतो. तज्ज्ञांच्या मते, ही स्थिती ‘पॅरानोइया’ (Paranoia)चे संकेत असू शकते.

पॅरानोइया म्हणजे नेमके काय?

क्लीव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार, कोणताही ठोस पुरावा नसताना इतर लोक आपल्याविरोधात बोलतायत किंवा आपल्याविरुद्ध कट रचत आहेत असा सतत संशय वाटणं याला पॅरानोइया म्हणतात. अशा प्रकारचे विचार काही काळासाठी किंवा दीर्घकाळ येऊ शकतात.

तज्ज्ञांच्या मते, सायकोसिसचा त्रास असलेल्या 70 टक्क्यांहून अधिक रुग्णांमध्ये पॅरानोइयाची लक्षणं दिसून येतात. अनेकदा व्यक्ती प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या गोष्टींबाबतही गैरसमज निर्माण करून घेतात.

Paranoia symptoms
Heatwave in India: उष्णतेचा कहर वाढला! डॉक्टरांनी दिला हीट स्ट्रोक आणि डिहायड्रेशनपासून बचावाचा गंभीर इशारा

पॅरानोइयामागील कारणं काय आहेत?

एनसीबीआयच्या माहितीनुसार, काही लोकांमध्ये आनुवंशिक कारणांमुळे पॅरानोइया विकसित होऊ शकतो. याशिवाय मेंदूमधील न्यूरोट्रान्समीटरमध्ये होणारे बदलही यासाठी कारणीभूत ठरू शकतात. अशा बदलांमुळे मेंदूपर्यंत पोहोचणारे संदेश, भावना आणि विचारांच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.

‘जर्नल ऑफ सायकोसिस अँड रिलेटेड डिसऑर्डर’मध्ये प्रकाशित माहितीनुसार, लहानपणी झालेला एखादा मानसिक आघात यामागे कारण ठरू शकतो. जसं की, इतर मुलांकडून सतत चिडवणं, त्रास देणं किंवा बुलींगचा सामना करावा लागणं. त्याचप्रमाणे दीर्घकाळ तणावाखाली राहिल्यास व्यक्तीच्या विचारसरणीवर परिणाम होऊन पॅरानोइयाचा धोका वाढू शकतो.

पॅरानोइयाची लक्षणं कशी ओळखाल?

इतरांवर विश्वास ठेवण्यास अडचण येणं

या समस्येने ग्रस्त व्यक्तीला इतर लोकांवर सहज विश्वास ठेवता येत नाही. त्याला सतत संशय वाटत राहतो की, लोक त्याच्याविषयी वाईट बोलत आहेत किंवा त्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत.

छोट्या गोष्टींवरून दुखावणं

सामान्य विनोद, सल्ला किंवा सहज बोललेलं शब्दही अशा व्यक्तीला अपमानासारखे वाटू शकतात. त्यामुळे ती व्यक्ती वारंवार रागावते.

नकारात्मक विचारांची वाढ

पॅरानोइयामुळे व्यक्तीला असं वाटू शकतं की, इतर लोक तिचा फायदा घेत आहेत. त्यामुळे ती प्रत्येक गोष्टीचा नकारात्मक अर्थ काढू लागते. एखाद्या साध्या बोलण्यावरूनही ती व्यक्ती लगेच रिएक्ट होऊ शकते.

Paranoia symptoms
Poor blood circulation: शरीरात ही ६ लक्षणं दिसली तर समजा रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होत नाहीये

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, जर पॅरानोइयाची लक्षणं वारंवार जाणवत असतील आणि त्याचा परिणाम दररोजचं आयुष्य, नाती किंवा कामावर होऊ लागला असेल तर लगेच तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

Paranoia symptoms
Blue bruises on skin: कोणतीही दुखापत नसतानाही शरीरावर पडतात निळे डाग? यामागे असू शकतात हे आजार

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com