Early onset stroke: कमी वयात स्ट्रोक येण्यामागे तुमचा ब्लड ग्रुप कारणीभूत? नव्या संशोधनाने वाढवली चिंता

Blood group stroke risk: नव्या संशोधनानुसार रक्तगट A असलेल्या लोकांमध्ये कमी वयात स्ट्रोकचा धोका अधिक असू शकतो. रक्त गोठण्याच्या प्रक्रियेशी संबंधित जनुकीय घटकांमुळे हा धोका वाढू शकतो, असं संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.
StrokE
Strokesaam tv
Published On

रक्तगट म्हणजे फक्त रक्तदान किंवा आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडणारी माहिती, अशीच अनेकांची समजूत असते. मात्र आता शास्त्रज्ञांनी केलेल्या नव्या संशोधनातून एक धक्कादायक बाब समोर आलीये. काही विशिष्ट रक्तगट असलेल्या लोकांमध्ये कमी वयात स्ट्रोक येण्याचा धोका जास्त असू शकतो, असं या अभ्यासात स्पष्ट झालंय.

वैद्यकीय जर्नल न्यूरोलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या जेनेटीक अभ्यासात रक्तगट आणि स्ट्रोक यांच्यातील संबंधाचा सखोल अभ्यास करण्यात आला. संशोधकांच्या मते, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेवर आणि हृदयाशी संबंधित धोक्यांवर जनुकीय घटकांचा प्रभाव कसा पडतो, हे समजून घेण्यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा ठरू शकतो.

StrokE
Tumor warning signs: शरीरात ही ७ लक्षणं दिसली तर समजा कॅन्सरचा ट्यूमर होतोय तयार

संशोधनात नेमकं काय आढळलं?

या संशोधनासाठी ४८ वेगवेगळ्या जेनेटीक अभ्यासांतील माहितीचा वापर करण्यात आला. यात जवळपास १७ हजार स्ट्रोक आलेले रुग्ण आणि सुमारे ६ लाख निरोगी व्यक्तींचा समावेश होता. या गटातील व्यक्ती १८ ते ५९ वयातील होत्या.

संशोधकांना आढळून आलं की, A1 या उपगटातील रक्तगट असलेल्या लोकांना ६० वर्षांपूर्वी स्ट्रोक येण्याचा धोका इतर रक्तगटांच्या तुलनेत १६ टक्क्यांनी अधिक होता. दुसरीकडे O1 रक्तगट असलेल्या व्यक्तींमध्ये हा धोका सुमारे १२ टक्क्यांनी कमी असल्याचं दिसून आलं.

त्याचप्रमाणे रक्तगट B असलेल्या लोकांमध्येही स्ट्रोकचा धोका थोड्याफार प्रमाणात वाढलेला आढळला. डॉ. स्टिव्हन किटनेस यांनी सांगितलं की, कमी वयात स्ट्रोक येण्याच्या घटना जगभरात वाढत आहेत आणि तरुणांमध्ये हा प्रकार चिंतेचा विषय ठरत आहे.

अर्ली स्ट्रोक म्हणजे काय?

मेंदूकडे जाणारा रक्तपुरवठा अचानक बंद होणं किंवा मेंदूतील रक्तवाहिनी फुटणं याला स्ट्रोक म्हणतात. त्यामुळे मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही आणि मेंदूच्या पेशींना नुकसान होऊ शकतं.

६० वर्षांपूर्वी होणाऱ्या स्ट्रोकला ‘अर्ली-ऑनसेट स्ट्रोक’ असं म्हटलं जातं. डॉक्टरांच्या मते, अशा प्रकारच्या स्ट्रोकचा परिणाम गंभीर असू शकतो. रुग्णाला दीर्घकाळ अपंगत्व, बोलण्यात अडचण, शरीराचा काही भाग निकामी होणं किंवा स्मरणशक्तीवर परिणाम होण्याची शक्यता असते.

स्ट्रोकची सामान्य लक्षणं

  • चेहरा एका बाजूला वाकणं

  • अचानक कमजोरी किंवा मुंग्या येणं

  • बोलताना अडचण येणं

  • तीव्र डोकेदुखी

  • दृष्टी धूसर होणं

  • गरगरणं

  • तोल जाणं

रक्तगट A मुळे धोका का वाढू शकतो?

शास्त्रज्ञांच्या मते, हा संबंध रक्त गोठण्याच्या प्रक्रियेशी संबंधित असू शकतो. रक्तगट A मुळे प्लेटलेट्सचं काम, रक्तवाहिन्यांच्या आतील थराचं काम, रक्तातील क्लॉटिंग प्रोटीन्स आणि रक्ताभिसरण यावर परिणाम होऊ शकतो. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये सहज गाठी तयार होण्याची शक्यता वाढते आणि त्यामुळे स्ट्रोकचा धोका वाढू शकतो, असं संशोधकांचं मत आहे.

StrokE
Brain cancer symptoms: अचानक ही ६ लक्षणं दिसली तर समजा ब्रेनच्या कॅन्सरचा आहे धोका

मात्र तज्ज्ञांनी याबाबत घाबरण्याचं कारण नसल्याचं स्पष्ट केलंय. हा वाढलेला धोका तुलनेने कमी प्रमाणात आहे. केवळ रक्तगट A असल्यामुळे कोणाला अतिरिक्त तपासण्या किंवा विशेष वैद्यकीय देखरेखीची गरज नाही, असंही संशोधकांनी स्पष्ट केलंय.

StrokE
Eyebrow personality traits: भुवयांचा आकार सांगतो व्यक्तीचा स्वभाव, खाली झुकलेल्या भुवयांमागचं रहस्य जाणून घ्या

तरुणांमध्ये स्ट्रोकची कारणं

या अभ्यासातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे ६० वर्षांनंतर होणाऱ्या स्ट्रोकमध्ये रक्तगटाचा संबंध फारसा दिसून आला नाही. यावरून कमी वयातील स्ट्रोक आणि वृद्धापकाळातील स्ट्रोक यामागची कारणं वेगळी असू शकतात, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com