Eyebrow personality traits: भुवयांचा आकार सांगतो व्यक्तीचा स्वभाव, खाली झुकलेल्या भुवयांमागचं रहस्य जाणून घ्या

What eyebrow shape says about personality: सामुद्रिक शास्त्रानुसार भुवयांचा आकार व्यक्तीच्या स्वभावाबद्दल अनेक संकेत देतो. खाली झुकलेल्या भुवया असलेल्या लोकांचा स्वभाव, नातेसंबंध आणि कलात्मक आवडींबाबत या प्राचीन शास्त्रात महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.
Eyebrow personality traits
Eyebrow personality traitssaam tv
Published On

चेहऱ्यावरील प्रत्येक अवयव माणसाच्या स्वभावाबद्दल काही ना काही संकेत देत असतो, असे अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये सांगण्यात आलंय. विशेषतः सामुद्रिक शास्त्रामध्ये व्यक्तीच्या डोळे, नाक, कपाळ आणि भुवयांच्या आकारावरून त्याचा स्वभाव ओळखण्याचा दावा केला जातो.

आज आपण अशाच एका खास भुवयांच्या आकाराबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यामुळे व्यक्तीचा स्वभाव आणि वागणूक समजण्यास मदत होते. तुमच्या भुवयांचा आकार देखील काही ना काही सांगून जातो.

ज्योतिषशास्त्र आणि सामुद्रिक शास्त्र यांचा उल्लेख धर्मग्रंथांमध्येही असल्याचं तुम्हाला आढळतं. मान्यतेनुसार, भगवान शिव यांचं पुत्र कार्तिकेय यांनी या शास्त्राची निर्मिती केली होती. या शास्त्रात शरीराच्या विविध अवयवांच्या आधारे व्यक्तीचे गुण, स्वभाव आणि आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या जातात.

खाली झुकलेल्या भुवया

एखाद्या व्यक्तीच्या भुवयांचा आकार पाहून त्याचा स्वभाव, त्याच्या आवडी-निवडी आणि तो इतरांशी कसा वागतो याचा अंदाज लावला जाऊ शकतो, असं सामुद्रिक शास्त्रात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः काही लोकांच्या भुवया मधल्या भागातून खाली झुकलेल्या दिसतात. अशा व्यक्तींविषयी काही खास गोष्टी सांगितल्या जातात.

सामुद्रिक शास्त्रानुसार, अशा प्रकारच्या भुवया असलेले लोक प्रेमळ स्वभावाचे असतात. त्यांना सजणं, फिरणं आणि नवीन गोष्टी अनुभवणं खूप आवडते. हे लोक आपल्या कामात पूर्ण मन लावून मेहनत करतात. त्यामुळे घेतलेली अनेक कामं ते यशस्वीरीत्या पूर्ण करतात.

Eyebrow personality traits
Chanakya Niti On Marriage : चाणक्यांच्या मते मुलींच्या या गुणांकडे आवर्जून लक्ष द्या, अन्यथा लग्नानंतर येऊ शकतात अडचणी

कलात्मक गोष्टींची आवड

याशिवाय, या व्यक्तींना कलात्मक गोष्टींची विशेष आवड असते. घर सजावट, फॅशन किंवा नवीन खाद्यपदार्थ पदार्थ बनवणं अशा सर्जनशील गोष्टींमध्ये त्यांना रस असतो. मात्र, सामुद्रिक शास्त्रात असंही म्हटलंय की, अशा लोकांवर पूर्णपणे विश्वास ठेवणं काही वेळा कठीण ठरू शकतं.

Eyebrow personality traits
Personality test: तुमच्या अंगठ्याचा आकार सांगतो तुमच्या व्यक्तिमत्त्वाची गुपितं! जाणून घ्या सामुद्रिक शास्त्र काय सांगतं?

अशा भुवया असलेले काही लोक स्वतःचं काम करून घेण्यासाठी इतरांवर दबाव टाकतात किंवा कठोर भाषेचा वापर करतात, असंही या शास्त्रात नमूद करण्यात आलंय. त्यांचा बोलण्याचा अंदाज प्रभावी असल्याने ते लोकांना सहज प्रभावित करतात. तसंच, हे लोक एकापेक्षा अधिक नात्यांमध्ये रस ठेवू शकतात असंही सामुद्रिक शास्त्रात सांगण्यात आलंय.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सामुद्रिक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com