Tumor warning signs: शरीरात ही ७ लक्षणं दिसली तर समजा कॅन्सरचा ट्यूमर होतोय तयार

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर

कॅन्सरची काही लक्षणं सुरुवातीला साधी वाटतात. मात्र ती दीर्घकाळ टिकून राहिल्यास दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं. कॅन्सरचा ट्यूमर ज्यावेळी तुमच्या शरीरात तयार होत असतो तेव्हा कोणती ७ लक्षणं दिसतात ते पाहूयात.

Early signs of cancer

सतत जाणवणारा थकवा

सतत थकवा जाणवणं हे कॅन्सरच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक मानले जाते. हा थकवा विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नाही. योग्य आहार, पुरेशी झोप आणि आराम घेतल्यानंतरही शरीरात शक्ती जाणवत नसेल, तर ते गंभीर संकेत असू शकतात.

Cancer symptoms

अचानक वजन कमी होणं

अनेक वेळा कोणतंही कारण नसताना वजन झपाट्याने कमी होणं हे देखील धोक्याचं आहे. विशेषतः पचनसंस्था आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरमध्ये असे प्रकार अधिक दिसून येतात. ट्यूमरमुळे शरीरातील चयापचय प्रक्रियेत बदल होतात, ज्यामुळे भूक कमी लागते.

Sudden weight loss

सततच्या वेदना

शरीरातील काही वेदना दीर्घकाळ टिकून राहिल्यास त्याचा संबंध कॅन्सरशी असतो. अनेक रुग्णांमध्ये सतत होणारी वेदना हे पहिलं लक्षण असू शकतं. पाठीचा त्रास हा स्वादुपिंड किंवा अंडाशयाच्या कॅन्सरशी संबंधित असू शकतो.

Warning signs of tumor

त्वचेतील बदल

काही कॅन्सर शरीराच्या आत नव्हे तर त्वचेवरही दिसून येतात. जखम भरून न येणं किंवा त्वचेच्या रंगात बदल होणं ही लक्षणं गंभीर ठरू शकतात. काही वेळा विचित्र प्रकारचे पुरळही त्वचेच्या कॅन्सरचे संकेत असू शकतात.

Health awareness

शरीरावर गाठ किंवा सूज दिसणं

शरीरात अचानक गाठ जाणवणं किंवा एखादा भाग जाड झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. सर्व गाठी कॅन्सरच्या नसल्या तरी त्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक असू शकतात. स्तनाचा किंवा टेस्टिक्युलरच्या कॅन्सरमध्ये हे लक्षणं दिसतं.

Unexplained weight loss

सततचा खोकला

दीर्घकाळ टिकणारा खोकला गंभीर आजाराचे संकेत असू शकतो. विशेषतः खोकल्यात रक्त येत असल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये घशाच्या कॅन्सरवेळी हे लक्षण दिसून येतं.

Health checkup

सतत होणारी डोकेदुखी

वारंवार आणि न थांबणारी डोकेदुखी काही वेळा न्यूरोलॉजिकल समस्यांचे संकेत देऊ शकते. मेंदूमध्ये ट्यूमर असल्यास अशा प्रकारची लक्षणं दिसू शकतात.

Early diagnosis importance

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Weak heart signs | saam tv
येथे क्लिक करा