Research on Pregnancy in Space saam tv
लाईफस्टाईल

Research on Pregnancy in Space: अंतराळात गर्भधारणा आणि प्रसूती शक्य आहे का? नव्या संशोधनातून मोठी बाब समोर

Is Pregnancy Possible in Space: गुरुत्वाकर्षण नसल्यामुळे, शरीरातील रक्तप्रवाह आणि द्रवपदार्थांचे संतुलन बदलते. याचा परिणाम गर्भवती मातेच्या आरोग्यावर आणि गर्भाच्या वाढीवर होऊ शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

  • अंतराळात गर्भधारणा शक्य असू शकते.

  • अंतराळात बाळंतपण आणि देखभाल अशक्य आहे.

  • कॉस्मिक किरणांचा भ्रूणावर घातक परिणाम होऊ शकतो.

जशी मंगळ ग्रहावर मानवी मोहिमेसाठी तयारी सुरू आहे, तशी चंद्र आणि मंगळावर मनुष्य वस्ती बसवण्याचं स्वप्नं सत्यात उतरवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशा वेळी एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो अंतराळात शारीरिक संबंध, गर्भधारणा, बाळंतपण आणि बाळाची देखभाल शक्य आहे का? यावरच लीड्स विद्यापीठाचे प्रोफेसर एमेरिटस ऑफ कम्प्युटेशनल बायोलॉजी अरुण विवियन होल्डन यांनी संशोधन केलं आहे . त्यांचा अभ्यास The Conversation (२२ जुलै २०२५), Science Alert (२८ जुलै २०२५) आणि Experimental Physiology (२७ जून २०२५) या वैज्ञानिक जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाला आहे.

अंतराळात गर्भधारणा शक्य, पण बाळंतपण नाही

प्रो. होल्डन यांच्या मते, पृथ्वीवर गर्भधारणेसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञानामध्ये भरपूर प्रगती झाली आहे. गर्भधारणा, भ्रूणाचे गर्भाशयात प्रत्यारोपण आणि विकास या प्रक्रिया शक्य आहेत. अंतराळातही गर्भधारणा होऊ शकते पण बाळंतपण आणि नवजात बाळाची देखभाल मात्र सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही. अंतराळातील परिस्थिती शरीरासाठी अत्यंत गुंतागुंतीची आणि धोकादायक आहे.

गर्भाशयात मूल द्रवामध्ये तरंगत असतं आणि सूक्ष्म गुरुत्वाकर्षण अनुभवतं, हे खरं असलं तरी अंतराळातील मायक्रोग्रॅव्हिटी म्हणजेच सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वेगळी आहे. अशा वातावरणात शारीरिक संबंध, गर्भवती होणं, प्रसूती त्यानंतर बाळाला दूध पाजणे या सगळ्या गोष्टी अवघडच नव्हे, तर जवळपास अशक्य आहेत.

एकदा भ्रूण गर्भाशयात स्थिर झाला, तर अंतराळात स्त्री गर्भवती राहू शकते. मात्र प्रसूती किंवा नवजात बाळाची काळजी घेणं या परिस्थितीत होणे अत्यंत कठीण ठरतं.

कॉस्मिक किरणांचा भ्रूणावर आणि नवजातावर घातक परिणाम

पृथ्वीवरील वातावरण आणि चुंबकीय क्षेत्र आपल्याला उच्च-ऊर्जा कॉस्मिक किरणांपासून वाचवतात. या किरणांचा थेट परिणाम भ्रूणावर होऊ शकतो. गर्भधारणेच्या पहिल्या महिन्यात भ्रूणाची पेशी अतिशय वेगाने विभाजित होत असतात. अशावेळी जर एखादी कॉस्मिक किरण त्या पेशींपर्यंत तर ती गर्भपातास कारणीभूत ठरू शकते.

गर्भधारणेच्या तिसऱ्या महिन्यानंतर भ्रूणाचा आकार वाढू लागतो आणि त्या वेळी या किरणांचा परिणाम त्याच्या स्नायूंवर होतो. त्यामुळे बाळ किंवा तर अपंग जन्माला येईल किंवा प्रसवाच्या वेळीच मृत्यू होण्याचा धोका राहतो.

मानसिक आरोग्यावरही परिणाम

अंतराळात जन्मलेल्या नवजात बाळाची वाढ पूर्णपणे मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये होते. यामुळे त्याच्या शरीराच्या हालचाली, स्नायूंची ताकद आणि मेंदूचा विकासही प्रभावित होतो. याचा परिणाम म्हणजे बाळ लवकर डोकं उचलणं, रांगणं किंवा चालणं अशा गोष्टी करण्यात अक्षम ठरू शकतं. संशोधनात असंही सांगण्यात आलं आहे की, या बाळांमध्ये मेमरी लॉस किंवा न्यूरोलॉजिकल विकार होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे गर्भधारणा जरी शक्य असली तरी ती धोकादायक आहे.

चाचणीसाठी उंदिरांच्या भ्रूणांचा प्रयोग

ही संपूर्ण रिसर्च उंदिरांच्या भ्रूणांवर आधारित आहे. अंतराळात मानवी गर्भधारणा कशी होते यावर अद्याप प्रत्यक्ष अभ्यास झालेला नाही. उंदिरांवरील प्रयोगांमधून हे स्पष्ट झालं की मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये भ्रूणाचा प्रारंभिक विकास होतो पण पूर्ण गर्भधारणा आणि बाळंतपण होणं शक्य नाही.

अंतराळात गर्भधारणा शक्य आहे का?

होय, प्रो. अरुण विवियन होल्डन यांच्या संशोधनानुसार, अंतराळात गर्भधारणा शक्य आहे, पण बाळंतपण आणि नवजात देखभाल अत्यंत अवघड आहे.

अंतराळात बाळंतपण का अशक्य आहे?

अंतराळातील मायक्रोग्रॅव्हिटी, कॉस्मिक किरणांचा प्रभाव आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव यामुळे बाळंतपण आणि नवजात बाळाची देखभाल अशक्य आहे.

कॉस्मिक किरणांचा भ्रूणावर काय परिणाम होतो?

कॉस्मिक किरणांचा भ्रूणाच्या विकासावर घातक परिणाम होतो. त्यामुळे गर्भपात, अपंगत्व किंवा प्रसवाच्या वेळी मृत्यूचा धोका असतो.

अंतराळात जन्मलेल्या बाळाच्या विकासावर काय परिणाम होऊ शकतो?

मायक्रोग्रॅव्हिटीमुळे बाळाच्या स्नायूंची ताकद, हालचाली आणि मेंदूचा विकास प्रभावित होतो. त्यामुळे लवकर चालणे, रांगणे यात अडचणी येऊ शकतात.

या संशोधनाची माहिती कशावर आधारित आहे?

हे संशोधन उंदिरांच्या भ्रूणांवरील प्रयोगांवर आधारित आहे. मानवी गर्भधारणेवर अद्याप प्रत्यक्ष अभ्यास झालेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

Vande Bharat Train: वंदे भारत स्लीपर, अमृत भारत; २०२६ मध्ये लॉन्च होतील नवीन ट्रेन; असतील हजारो खास फीचर्स

Pune Accident : पुण्यात पुन्हा भीषण अपघात; महामार्गावर ४ वाहनांची एकमेकांना धडक

Maharashtra Live News Update: हसन मुश्रीफ यांची पुन्हा शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका

SCROLL FOR NEXT