Heart attack causes: एका रात्रीत हार्ट अटॅक येत नाही! धुम्रपान, कोलेस्ट्रॉल सोडून 'या' साध्या गोष्टी वाढवतात धोका

How heart attack risk increases: वर्षानुवर्षे आपल्या जीवनशैलीतील लहान-सहान चुकांमुळे हृदयावर हळूहळू ताण येतो आणि एक दिवस तो गंभीर रूप धारण करतो. अनेकदा लोकांना असे वाटते की, फक्त धूम्रपान आणि उच्च कोलेस्टेरॉलमुळेच हृदयविकार होतो.
Heart attack causes
Heart attack causessaam tv
Published On
Summary
  • हृदयविकारापूर्वीचे सूक्ष्म संकेत कोणते असतात?हृदयविकारापूर्वी शरीर सूक्ष्म संकेत देत असते.

  • सततची सूज हृदयविकाराचा धोका वाढवते.

  • इन्सुलिन प्रतिकार हृदयाच्या रक्तवाहिन्यांना धोका निर्माण करतो.

हृदयविकाराचा झटका येणं क्वचितच अचानकपणे घडताना दिसतं. अनेकदा आपल्याला वाटतं की ही समस्या एकदम होते पण प्रत्यक्षात शरीर त्याआधीच हलक्या पण महत्त्वाच्या इशाऱ्यांनी आपल्याला सतर्क करत असतं. हे संकेत दुर्लक्षित केले जातात किंवा किरकोळ वाटून सोडून दिले जातात आणि नंतर खूप उशीर होतो.

अजूनही अनेक लोक असा गैरसमज आहे की, हृदयविकाराचं कारण फक्त कोलेस्ट्रॉल, धूम्रपान किंवा वय असतं. पण आता विज्ञान सांगतंय की यामागे आणखी कारणं आहेत, जसं की सततची सूज, खराब झोप, शरीरातील हार्मोन्सचं असंतुलन.

सततची सूज

सूज म्हणजे आपल्याला लागलं संसर्ग झाला तर शरीर त्याविरुद्ध लढायला निर्माण करत असलेली प्रक्रिया. पण हीच सूज जर सतत टिकून राहिली तर ती धोकादायक बनते. हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील आतील भिंती कमकुवत होतात आणि कोलेस्ट्रॉल जमा होण्याची शक्यता वाढते. परिणामी ब्लॉकेज आणि हृदयविकाराचा धोका निर्माण होतो.

इन्सुलिन रेसिस्टन्स

ही समस्या फक्त डायबेटिक लोकांमध्ये असते असं समजलं जातं, पण हे चुकीचं आहे. साखर वाढण्याआधीच शरीर जर इन्सुलिनला प्रतिसाद देणं थांबवलं तर यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांवर हळूहळू परिणाम होतो. शरीरात जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार होतं, जे ब्लड प्रेशर वाढवतं, पोटाभोवती चरबी साठवून ठेवतं आणि रक्तवाहिन्यांच्या भिंतींना कमजोर करतं.

Heart attack causes
Gym overtraining symptoms: दररोज जीमला जाताय? जर 'ही' लक्षणं दिसली तर समजा शरीर विश्रांती मागतंय!

अपुरी झोप

झोप कमी झाली की फक्त थोडं आळस येतो, मूड बिघडतो असं वाटतं पण झोपेचा थेट परिणाम हृदयावर होतो. सतत कमी झोप झाल्यास रक्तदाब वाढतो, हार्मोनल असंतुलन निर्माण होतं आणि हृदयविकाराचा धोका लक्षणीय वाढतो. 6 तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा धोका सुमारे 20% ने जास्त असल्याचं अनेक संशोधनातून दिसून आलं आहे.

कामाच्या ठिकाणी असलेला ताण

आजच्या जगात तणाव ही सवयीसारखी गोष्ट झाली आहे. मात्र तिचा सततचा मानसिक तणाव हृदयावर प्रत्यक्ष शारीरिक परिणाम करतो. तणावात शरीर अ‍ॅड्रेनालिन आणि कोर्टिसोल निर्माण करतं हे हार्मोन्स जास्त काळ राहिले तर रक्तदाब वाढतो, हृदयाच्या गतीवर परिणाम होतो, रक्तात गाठी होण्याचा धोका वाढतो. हार्वर्ड संशोधनानुसार, कामाचा ताण हृदयविकाराचा धोका जवळपास 40% ने वाढवतो.

Heart attack causes
Kidney failure symptoms on legs: पायांवर 'ही' लक्षणं दिसली तर समजा किडनी खराब होतेय; बदल लक्षात घेऊन लगेच उपचार घ्या

कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास

जर तुमच्या घरात वयाच्या 55 (पुरुष) किंवा 65 (स्त्रिया) आधी कुणाला हृदयविकार झाला असेल तर तुम्हालाही धोका जास्त असतो. पण आपल्या जीवनशैलीच्या सवयी, आहार, व्यायाम, तणाव हे जनुकांपेक्षा जास्त महत्त्वाचं ठरतं.

Heart attack causes
Uncontrolled diabetes symptoms: शरीरात 'हे' बदल दिसले तर समजा डायबेटीज नियंत्रणाबाहेर गेलाय; लक्षणं ओळखून त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या

लठ्ठपणा

लठ्ठपणा म्हणजे फक्त दिसण्याचा किंवा आळशीपणाचा विषय नाही. हा शरीरातील हार्मोन्स, सूज, इन्सुलिन प्रतिकार आणि मेटॅबोलिझमशी संबंधित गंभीर मुद्दा आहे. विशेषतः पोटाभोवती जमा होणारी चरबी अत्यंत धोकादायक असते, ती अंतर्गत अवयवांभोवती जमा होते. यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, कोलेस्ट्रॉल वाढतो आणि उच्च रक्तदाब तयार होतो.

Q

हृदयविकारापूर्वीचे सूक्ष्म संकेत कोणते असतात?

A

सततची सूज, इन्सुलिन प्रतिकार, अपुरी झोप, मानसिक तणाव आणि लठ्ठपणा हे हृदयविकारापूर्वीचे महत्त्वाचे संकेत आहेत.

Q

सततची सूज हृदयासाठी का धोकादायक आहे?

A

सततची सूज रक्तवाहिन्यांच्या भिंती कमकुवत करते, कोलेस्ट्रॉल जमा होण्यास प्रवृत्त करते आणि ब्लॉकेजचा धोका वाढवते.

Q

सततची सूज रक्तवाहिन्यांच्या भिंती कमकुवत करते, कोलेस्ट्रॉल जमा होण्यास प्रवृत्त करते आणि ब्लॉकेजचा धोका वाढवते.

A

इन्सुलिन रेसिस्टन्स म्हणजे शरीर इन्सुलिनला प्रतिसाद देणे थांबवणे. यामुळे रक्तदाब वाढतो, पोटाभोवती चरबी जमा होते आणि रक्तवाहिन्या कमकुवत होतात.

Q

अपुरी झोप हृदयविकाराचा धोका कसा वाढवते?

A

6 तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांमध्ये रक्तदाब वाढतो, हार्मोनल असंतुलन निर्माण होते आणि हृदयविकाराचा धोका 20% ने वाढतो.

Q

कामाचा ताण हृदयवर कसा परिणाम करतो?

A

कामाच्या ताणामुळे अ‍ॅड्रेनालिन आणि कोर्टिसोल सतत वाढतात, ज्यामुळे रक्तदाब वाढतो, हृदयगती बदलते आणि रक्तात गाठी पडण्याचा धोका वाढतो. हार्वर्डच्या संशोधनानुसार, हा धोका 40% ने वाढवतो.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com