
बल्गेरियातील प्रसिद्ध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांनी 2025 वर्षासाठी एक भीतीदायक भाकीत केलं होतं. ज्यामुळे जगभरात चिंतेचं वातावरण पसरलंय. त्यांनी ‘डबल फायर’ याबाबत भविष्यवाणी केली होती. याशिवाय ऑगस्टमध्ये काहीतरी भीषण घडण्याची शक्यता असल्याचं सूचित केलं होतं. आता ही भविष्यवाणी खरी ठरेल का, याबाबत अनेकांच्या मनात भीती आहे.
बाबा वेंगा यांना ‘बाल्कनची नास्त्रेदमस’ असं म्हटलं जातं. त्यांची बहुतांश भाकितं जरी थेट स्पष्ट नसली तरी ती काळजाला भिडणारी आणि काळजी वाढवणारी असतात. आता त्यांनी केलेल्या 'डबल फायर' अर्थात दुहेरी आगीच्या इशाऱ्याने अनेकांची झोप उडाली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘स्वर्गातून आणि पृथ्वीवरून एकाच वेळी आग उठेल’.
या भविष्यवाणीचे अनेकांनी वेगवेगळे अर्थ लावण्यास सुरुवात केली आहे. काहींच्या मते ‘पृथ्वीची आग’ ही जंगलात लागणाऱ्या भीषण आगीशी संबंधित आहे. तर ‘स्वर्गातून उठणारी आग’ ही उल्कापात किंवा सूर्यापासून येणाऱ्या तीव्र सौर लहरींचं संकेत असू शकतं. त्यामुळे ही आग प्रत्यक्षात नैसर्गिक आपत्तीचं रूप घेऊन येऊ शकते, असा अंदाज काही तज्ज्ञ मांडत आहेत.
बाबा वेंगांची ही भविष्यवाणी थरका उडवणारी आहे. कारण 2025 मध्ये अमेरिकेत, कॅनडात आणि युरोपमधील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जंगलांना आग लागली आहे. त्याचबरोबर अंतराळ संस्थांनीही उल्कापाताबाबत काही धक्कादायक इशारे दिले आहेत, ज्यामुळे ही 'डबल फायर'ची शक्यता आणखी गंभीर वाटते आहे.
दरम्यान, काही जण या भाकिताचा प्रतिकात्मक अर्थ लावतायत. त्यांच्या मते ‘स्वर्गातून येणारी आग’ म्हणजे एखादा दिव्य संदेश किंवा आध्यात्मिक चेतावणी असू शकते. तर ‘पृथ्वीची आग’ ही माणसाने स्वतःच्या चुकीमुळे निर्माण केलेल्या समस्या जसं की युद्ध, पर्यावरणाचा ऱ्हास याचं प्रतीक असू शकते.
बाबा वेंगांचं खरं नाव वांगेलिया पांडेवा गुश्तेरोवा होतं. त्यांचा जन्म 1911 मध्ये झाला होता. त्यांनी आपला मृत्यू होण्याआधी 5079 पर्यंतच्या अनेक घटनांची भविष्यवाणी केली होती. त्यांच्या अनेक भाकितांमध्ये सोव्हिएत युनियनचं विघटन, 9/11 हल्ला, चेरनोबिल दुर्घटना यांचा अचूक उल्लेख होता.
सध्या बाबा वेंगांच्या ‘डबल फायर’च्या भविष्यवाणीमुळे जगभरातील अनेकांचे लक्ष या महिन्यावर आणि संभाव्य घटनांवर केंद्रित झालं आहे. ती एक नैसर्गिक आपत्ती असेल का, की एखादी मानवनिर्मित घडामोड हे काळच ठरवेल. पण बाबा वेंगांचा हा गूढ आणि भीतीदायक इशारा मात्र नक्कीच विचार करायला भाग पाडणारा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.