One Meal A Day for weight loss saam tv
लाईफस्टाईल

Fat burning: फॅट बर्न आणि अँटी-एजिंगसाठी दिवसातून एकदाच जेवण पुरेसं? तज्ज्ञांनी सांगितलं ‘वन मील अ डे’ डाएटचं सिक्रेट

One Meal A Day for weight loss: गेल्या काही वर्षांत वजन कमी करण्यासाठी 'ओएमएडी' (OMAD - One Meal A Day) म्हणजे दिवसातून फक्त एकच वेळ जेवण करण्याची पद्धत खूप लोकप्रिय झाली आहे. हे एक प्रकारचे अति-इंटरमिटेंट फास्टिंग आहे.

Surabhi Jayashree Jagdish

कॅलरीचं प्रमाण कमी केल्याने आयुष्यमान वाढू शकतं, शरीराच्या वृद्धत्वाशी संबंधित जैविक प्रक्रियांमध्ये सुधारणा होऊ शकते. तसंच मानसिक आरोग्य, झोप आणि स्नायूंचं कार्यही सुधारतं, असं अनेक संशोधनांतून समोर आलं आहे. पण प्रश्न असा आहे की, कमी खाल्ल्याने शरीरातील जैविक प्रक्रिया नेमक्या कशा बदलतात आणि वृद्धत्वाची गती कशी मंदावते?

कार्डिओलॉजिस्ट आणि फंक्शनल मेडिसिन तज्ज्ञ डॉ. आलोक चोप्रा यांनी 30 सप्टेंबर रोजीच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये याबाबत माहिती दिलीये. OMAD या संकल्पनेची त्यांनी ओळख करून दिली. OMAD म्हणजे “One Meal A Day” म्हणजेच दिवसभरात फक्त एक वेळच अन्न घेणं. त्यांच्या मते, OMAD पद्धत आतड्यांचं आरोग्य सुधारू शकतं हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करू शकतं आणि स्टेम सेल्सच्या माध्यमातून शरीरातील दुरुस्ती प्रक्रिया सुरू करू शकते.

OMAD म्हणजे काय आणि ते कसं फायदेशीर ठरतं?

डॉ. चोप्रा यांनी सांगितलं की, “वृद्धत्व कमी करायचं आहे का? मग कमी वेळा खा.” OMAD ही केवळ डाएट पद्धत नाही तर दीर्घायुष्यासाठी शरीराच्या प्रक्रियांना पुन्हा एकत्र करणारी जीवनशैली आहे. या पद्धतीत व्यक्ती दररोज साधारण 20 ते 22 तास उपवास ठेवतो आणि फक्त एकदाच जेवणं जेवायचं असतं.

उपवासावर आधारित वेळेचं व्यवस्थापन काही प्रमाणात ‘टाइम-रिस्ट्रिक्टेड ईटिंग’सारखं असतं. यात 18:6, 20:4 किंवा OMAD (18–23 तासांचा उपवास) असे प्रकार मोठ्या प्रमाणत आहेत. यात स्नॅक्सऐवजी एकदाच मुख्य आहार घेतला जातो. ही पद्धत इंटरमिटंट फास्टिंगपेक्षा वेगळी आहे कारण यात उपवासाचा कालावधी साधारणतः 24 तासांपर्यंत पोहोचतो. वजन कमी होण्यास यात मदत होऊ शकते.

2018 मध्ये MIT मध्ये झालेल्या एका महत्त्वाच्या संशोधनाचा उल्लेख करत डॉ. चोप्रा यांनी सांगितलं की, 24 तासांचा उपवास आतड्यातील स्टेम सेल्सची निर्मिती वाढवतो आणि आतड्यांच्या आतील अस्तराचं रिप्रोडक्शन करतो. उपवासाच्या काळात शरीरातील साखरेवर अवलंबून असणारे हानिकारक बॅक्टेरिया उपाशी राहतात त्यामुळे चांगल्या बॅक्टेरियांना वाढण्याची संधी मिळते.

डॉ. चोप्रा यांच्या मते, खऱ्या अर्थाने OMAD पद्धत काही वेळा पचनसंस्थेसाठी कठीण ठरू शकते. कारण एकाच वेळी दिवसभराचं अन्न घेतल्याने प्रोटीनवर ताण वाढतो आणि त्यामुळे सूज (inflammation) निर्माण होऊ शकते. म्हणूनच ते ‘Almost OMAD’ म्हणजेच ‘Strong Fast, Smart Feast’ ही सुधारित पद्धत अवलंबतात. यात 20 ते 22 तासांचा उपवास ठेवला जातो. पण खाण्याचा घेण्याचा कालावधी 2 ते 4 तासांचा असतो.

कोणासाठी OMAD योग्य नाही?

डॉ. चोप्रा यांनी स्पष्ट केलं की, ही पद्धत सगळ्यांसाठी योग्य नाही. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिला, 18 वर्षांखालील व्यक्ती, आजार किंवा शस्त्रक्रियेनंतर बरे होत असणारे रुग्ण, अनियंत्रित दीर्घकालीन आजार असलेले लोक, खाण्याशी संबंधित विकारांचा इतिहास असणारे आणि जे लोक अशा औषधांचा वापर करतात ज्यांना अन्नाची गरज असते यांनी OMAD पद्धतीचा अवलंब करू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune IT Jobs : टाटांच्या कंपनीत नोकरकपात, पुण्यातील २५०० कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यायला लावला, कुटुंबाच्या अडचणी वाढल्या

Manoj Jarange: आपल्या जातीचा अपमान केला तर... मनोज जरांगे पाटलांचा इशारा|VIDEO

कुलदीप यादवचा मॅजिक बॉल, फलंदाजाच्या दांड्या गुल; बाद कधी झाला कुणालाच कळलं नाही, VIDEO

Dussehra Story: श्रीरामांनी रावणाचा वध करताना किती बाणांचा वापर केला? जाणून घ्या पौराणिक कथा

Maharashtra Dasara Melava Live Update: दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर उत्तर महाराष्ट्रातून शिवसैनिक दाखल

SCROLL FOR NEXT