ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
चुकीचे खाणे, व्यायामाचा अभाव आणि मानसिक तणाव यामुळे उच्चरक्तदाब होण्याची शक्यता असते.
आधीच उच्चरक्तदाब असणाऱ्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत अधिक सतर्क राहणे गरजेचे असते.
उच्चरक्तदाबाची समस्या असताना तुम्ही गरम पाण्याने अंघोळ करत असाल, तर ते अतिशय हानिकारक ठरू शकते.
साधारणतः गरम पाण्याने अंघोळ केल्यास शरिराला आराम मिळतो.
पण गरम पाणी शरिरावर पडल्याने रक्तवाहिन्या प्रसरण पावू लागतात.
यामुळे हृदयावर जोर पडून रक्तदाब अचानक वाढण्याची शक्यता असते.
अचानक वाढलेल्या रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका तसेच इतर हृदय संबंधित समस्या होऊ शकतात.
यापासून वाचण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर ठरेल.
यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो व अनेक आरोग्यदायी फायदेही मिळतात.