Blocked heart arteries symptoms: हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यानंतर शरीरात होतात 'हे' बदल

Surabhi Jayashree Jagdish

हृदयातील ब्लॉकेज

हृदयातील ब्लॉकेज ही एक गंभीर समस्या आहे. वेळेत याचं निदान झालं तर जीव वाचवता येऊ शकतो. चला जाणून घेऊया याची काही सुरुवातीची लक्षणं काय असतात.

पहिलं लक्षणं

हृदयातील ब्लॉकेजचे पहिले लक्षण म्हणजे हलक्या वेदना, जळजळ किंवा दडपण जाणवणे, जे शारीरिक हालचाल केल्यानंतर वाढू शकते.

शारीरिक हालचाल

जरी थोडीशी शारीरिक हालचाल किंवा पायऱ्या चढल्यानंतर श्वास लागणं सुरू झालं तर हे हृदयापर्यंत ऑक्सिजन पोहोचत नसल्याचं लक्षण असू शकतं.

रक्तप्रवाह

रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे मेंदूपर्यंत ऑक्सिजनची कमतरता होऊ शकते ज्यामुळे भोवळ येऊ शकते.

थकवा

पूर्ण विश्रांती घेतल्यानंतरही थकवा जाणवत असल्यास, ते हृदयाच्या समस्येचं लक्षण असू शकतं.

घाम येणं

कोणताही शारीरिक श्रम न करता घाम येणं हे हृदयावर अनावश्यक ताण येत असल्याचं लक्षण आहे.

पायांमध्ये वेदना

पायांमध्ये रक्तप्रवाह कमी झाल्याने चालताना वेदना जाणवणं हे देखील हृदयातील ब्लॉकेजशी संबंधित असू शकतं.

वारंवार गॅस होणं

वारंवार गॅस होणं, अपचन होणं किंवा छातीत जळजळ होणं हेही कधी कधी हृदयातील ब्लॉकेजची लक्षणं असू शकतात.

एकांतात मुली गुगलवर काय सर्च करतात? वाचून तुम्हाला बसेल धक्का

येथे क्लिक करा