Kashmir Tour Package Saam tv
लाईफस्टाईल

Kashmir Tour Package: मार्च महिन्यात IRCTC ची भन्नाट ट्रिप! बजेटमध्ये लुटा बहार-ए-काश्मीरमध्ये मजा

Kashmir IRCTC Tour: Full Package, Booking Process | यंदाच्या मार्च महिन्यात तुम्हीदेखील काश्मीरला फिरण्याचा प्लान करत असाल तर आयआरसीटीसा हा भन्नाट प्लान एकदा पाहाच. कमी बजेटमध्ये तुम्ही येथील निसर्गसौंदर्य आणि सुंदर नजारे पाहू शकता. खर्च किती, बजेट प्रोसेस कशी असेल पाहूया

कोमल दामुद्रे

IRCTC Tour Package For Kashmir:

काश्मीर हा पृथ्वीवरील स्वर्ग. इथलं निसर्गसौंदर्य पर्यटक प्रेमींना भुरळ पाडते. मार्च महिन्यात अनेक पर्यटकप्रेमी काश्मीरला फिरण्याचा प्लान करतात. यावेळी बर्फ वितळू लागतो. मार्च महिन्यापासून बर्फाच्छादित पर्वत आणि हिरवीगार झाडी दिसू लागतात.

जर यंदाच्या मार्च महिन्यात तुम्हीदेखील काश्मीरला फिरण्याचा प्लान करत असाल तर आयआरसीटीसा हा भन्नाट प्लान एकदा पाहाच. कमी बजेटमध्ये तुम्ही येथील निसर्गसौंदर्य आणि सुंदर नजारे पाहू शकता. खर्च (Price) किती, बजेट (Budget) आणि बुकिंग प्रोसेस कशी असेल पाहूया.

पॅकजचे नाव - Jammu & Kashmir Ex-#Nagpur

पॅकेज कालावधी - ७ रात्री आणि ८ दिवस

प्रवास - फ्लाइट मोड

कुठे फिरता येईल?

गुलमर्ग, जम्मू, पहलगाम, श्रीनगर

प्रवास कधी कराल?

29 मार्च 2024 ते 5 एप्रिल 2024

1. कोणत्या सुविधा मिळतील?

  • या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला राउंड ट्रिप फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासचे तिकीट मिळेल.

  • राहाण्यासाठी हॉटेलची सुविधा मिळणार आहे.

  • या पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण मिळेल.

2. प्रवासाचा खर्च किती येईल?

  • या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला सोलो ट्रिप करायची असेल तर तुम्हाला ५५,१०० रुपये (Price) मोजावे लागतील.

  • कपल्स जाणार असाल तर प्रत्येक व्यक्तीला ४६,००० रुपये द्यावे लागतील.

  • तीन लोकांसाठी प्रति व्यक्तीला ४४,००० रुपये भरावे लागतील. जर यामध्ये तुमच्यासोबत लहान मुले असतील तर तुम्हाला बेडसाठी (5-11 वर्षे) ४०,४०० रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय ३६,८०० रुपये मोजावे लागणार आहे.

  • IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती ट्विट करुन दिली आहे. जर तुम्हाला नेपाळचे सुंदर दृश्य पाहायचे असेल तर या टूर पॅकेजचा तुम्ही लाभ घेऊ शकता.

3. बुकिंग प्रोसेस

या टूर पॅकेजसाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. याशिवाय तुम्हाला IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

Cheesy White Sauce Maggi: चमचमीत नाश्ता हवाय? बनवा चीज व्हाईट सॉस मॅगी, सोपी आहे रेसिपी

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

SCROLL FOR NEXT