Sakshi Sunil Jadhav
घरात अचानक पाहुणे आले किंवा तुम्ही खूप थकलेले असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी बेस्ट ठरेल.
मॅगी, दूध, बटर, मैदा, चीज, मीठ, मिरपूड आणि भाज्या (कॉर्न, गाजर, कॅप्सिकम) घ्या.
पाण्यात मॅगी शिजवून घ्या आणि बाजूला ठेवा.
पॅनमध्ये बटर गरम करून त्यात मैदा घालून हलका भाजा.
हळूहळू दूध घालून गाठी होणार नाहीत याची काळजी घेत ढवळा.
सॉसमध्ये चीज, मीठ आणि मिरपूड घालून चव वाढवा.
उकडलेल्या भाज्या सॉसमध्ये घालून चांगलं मिक्स करा.
तयार मॅगी व्हाइट सॉसमध्ये टाकून एकजीव करा.
गॅस कमी ठेऊन 2-3 मिनिटे शिजवा, ज्यामुळे क्रीमी टेक्स्चर येईल.
वरून एक्स्ट्रा चीज टाकून गरमागरम Cheesy White Sauce Maggi सर्व्ह करा.