Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Work From Home: केंद्र सरकारची वर्कफ्रॉम होमसंदर्भात एक योजना असून या योजनेअंतर्गत महिलांना २५ हजार मानधन मिळणार असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. या व्हायरल मेसेजमागचं सत्य काय आहे घ्या जाणून...
Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?
Work From Home Saamtv
Published On

Summary -

  • महिलांसाठी २५ हजार देणारी योजना असल्याचा दावा खोटा

  • केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना जाहीर केलेली नाही

  • सोशल मीडियावर दिशाभूल करणारे व्हिडीओ व्हायरल

  • नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी सावध राहावे

संदीप चव्हाण, साम टीव्ही

एक मेसेज व्हायरल होतोय. त्यामध्ये दावा केलाय की, वर्क फ्रॉम होम करणाऱ्या महिलांना आता सरकार 25 हजार रुपये दरमहा देणार आहे...पण, खरंच अशी सरकारची योजना आहे का...? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं चला पाहुयात...

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक मेसेज व्हायरल होतोय. यामध्ये महिलांसाठीच्या 'वर्क-फ्रॉम-होम' योजनेबद्दल माहिती देण्यात आलीय. 'बुद्धसेन 92 टेक ऑफिशियल' नावाच्या यूट्यूब चॅनलच्या नावाने हा फोटो व्हायरल होतोय. यामध्ये दावा केलाय की, केंद्र सरकारच्या 'महिला वर्क फ्रॉम होम योजने'अंतर्गत महिलांना घरबसल्या काम करण्याची संधी दिली जाईल...महिलांना दरमहा २५,००० रुपयांपर्यंत मानधन दिलं जाईल. पण, खरंच आता सरकारने महिलांसाठी ही योजना सुरू केलीय का? या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?
Work From Home: खासगी वाहनं नको घरुन काम करा, इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर IEA च्या सूचना

व्हायरल मेसेजमध्ये केंद्र सरकारने महिलांसाठी महिला वर्क फ्रॉम होम योजना' नावाची एक विशेष योजना सुरू केलीय.या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 25 हजारांची रक्कम मिळेल असे लिहिले आहे. केंद्र सरकारची ही योजना असेल तर महिलांच्या फायद्याची आहे. त्यामुळे आमच्या टीमने याची सत्यता जाणून घेण्यासाठी पडताळणी सुरू केली. त्यावेळी सरकारकडून माहिती मिळवली असता, सरकारने अधिकृत साईटवरच याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यामध्ये असं सत्य समोर आलंय की, केंद्र सरकारची महिलांसाठी वर्क फ्रॉम होम योजना नाही. सरकारने अशी कोणतीही अधिसूचना जारी केली नाही. व्ह्यूज वाढवण्यासाठी दिशाभूल करणारा व्हिडिओ बनवला आहे. कोणतीही लिंक आल्यास त्यावर माहिती भरू नका.

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?
Vastu Tips : पावसामुळे Work From Home करताय; ५ गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा येतील अडचणी

असे व्हिडिओ, मेसेज लोकांची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केले जातात. तुम्ही कोणत्याही फसवणुकीला बळी पडू नका. यूट्यूब चॅनेल्स त्यांच्या व्हिडिओंवर अधिक व्ह्यूज आणि लाईक्स मिळवण्यासाठी दिशाभूल करणारे दावे करतात. त्यामुळे फसवणूक होण्याआधी काळजी घ्या...कोणतीही लिंकवरून अर्ज भरू नका. पैशांचं आमिष दाखवून गंडवलं जातं. त्यामुळे आमच्या पडताळणीत घरून काम करणाऱ्या महिलांना 25 हजार मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?
Work From Home: खासगी वाहनं नको घरुन काम करा, इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर IEA च्या सूचना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com