salt inktake saam tv
लाईफस्टाईल

Salt Intake: अतिप्रमाणात मीठ खाण्यामध्ये भारतीय पुढे; तुम्हीही खाता का जास्त मीठ? होतील 'हे' गंभीर परिणाम

side effects of eating excess salt: भारतातील लोकांना चमचमीत खाणं खूप आवडतं. त्यातच आता जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार भारतात अधिक प्रमाणात मीठ खाणाऱ्या लोकांची संख्या जगात जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आपण दिवसभरात किती प्रमाणात मीठाचं सेवन करतो हे तुम्हाला माहिती आहे का? मीठ हे कमीच खावे असं म्हणतात. जेवणात मीठ कमी पडलं की ते अळणी होतं . आणि जास्त झालं की ते खारटं होतं. म्हणून मीठाचं खूप महत्त्व आहे. पण रोज रोज अधिक प्रमाणात मीठ खाल्यावर त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात. जास्त प्रमाणात मीठाचे सेवन केल्यावर ब्लड प्रेशर सारखे आजार होण्याची शक्यता आहे. तसंच किडनीचे आजार, हाडं कमकुवत होण्याची देखील शक्यता असते.

डब्ल्यूएचओ (WHO) च्या एका अहवालानुसार, भारतात राहणाऱ्या व्यक्ती आपल्या रोजच्या आहारात गरजेपेक्षा जास्त मीठाचं सेवन करतात. मीठ जास्त खाणं शरीरासाठी हानिकारक आहे, हे तर आपल्या सर्वांना माहितच आहे. मग तुम्ही सुद्धा जास्त मीठ खाता का?

मीठाचं सेवन करण्यात भारत पुढे

भारतात सर्वात जास्त हार्ट अटॅकने मृत्यू पावणाऱ्याची संख्या जास्त असून ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच कमी वयात हार्ट अटॅकने मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढत जातेय. WHO च्या वैश्विक अहवालानुसार, भारतातील लोक हे गरजेपेक्षा अधिक मीठाचं सेवन करतात. या अहवालात भारत देशाचा क्रमांक पहिल्या ५० देशांमध्ये येतो. भारतासाठी ही बाब अत्यंत गंभीर आहे.

सोडियमयुक्त पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन केल्याने , हार्ट अटॅक, लठ्ठपणा, हृदयाचे रोग, किडनीचे विकार, आणि ऑस्टियोपोरोसिस सारखे आजारांना बळी पडू शकतो. म्हणून आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोजच्या जीवनात मीठाचं प्रमाण कमी केले पाहिजे.

किती प्रमाणात मीठ शरीरासाठी योग्य?

कामाचा ताण आणि दगदग यामधून आपल्या समोर ज्या खाण्याच्या गोष्टी येतात, त्याचं आपण सेवन करतो. त्यामुळे इन्सटंट फूड, फास्ट फूड आणि पॅकेज फूड यांच विक्रीते आणि खाण्याचं प्रमाण वाढलंय. रोज रोज बाहेरच खाणं हे आरोग्यासाठी चांगला नाही. हे आपल्याला माहीतच आहे. तरीही नाइलाजाने ते खावं लागत. मात्र, काही लोक आवडीने खातात.

प्रोसेस्ड फूड, इन्सटंट फूड, फास्ट फूड आणि पॅकेज फूड मध्ये प्रिजर्वेटीव वापरले जाते. आणि यात अधिक प्रमाणात मीठ वापरण्यात येतं. त्यामुळे पदार्थ दीर्घकाळ टिकून राहतात. अधिक प्रमाणात मीठ खाल्ल्याने नको ते आजार ओढवून घेण्याची शक्यता असते. म्हणून मीठ पूर्णपणे सोडून देणं हा उपाय नाही. दिवसभरात एका स्वस्थ मानवी शरीरासाठी ४ ते ५ ग्रॅम मीठ हे आवश्यक आहे. म्हणजेच एक चमचा मीठ हे शरीराची गरज भागवतात. मात्र, भारतातील लोक एका दिवसात ११ ग्रॅम पेक्षा अधिक प्रमाणात मीठ खातात. जे आरोग्यावर गंभीर परिणाम करतात.

उच्च रक्तदाबाचा त्रास

दररोज अधिक प्रमाणात मीठ खाल्ल्याने हायपरटेन्शन आणि हाय ब्लडप्रेशर सारखे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी हे धोकादायक मानलं जातं. नॅशनल हेल्थ सर्वेनुसार, प्रत्येकी चार व्यक्तींपैकी एक व्यक्तीला उच्चरक्तदाब आजार आहे. हृदयाचे आजार टाळण्यासाठी आहारात कमी मीठाचे सेवन करावे, असा सल्ला डॅाक्टर देतात.एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात मीठ खात असेल तर त्या व्यक्तीला तहान लागणं, पोट फुगणं, पाय सुजणं तसंच ब्लडप्रेशर वाढणं यांसारखी समस्या जाणवू शकतात.

written by: Priyanka mundinkeri

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अष्टविनायक महामार्गावर कवठे गावाजवळ ट्रक आणि दुध गाडीचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

Mumbai : सतत डोअरबेल वाजवल्याने सटकली, तरुणाने डिलिव्हरी बॉयवर केला गोळीबार; मुंबईत थरार

Rajesh Khanna: गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू; राजेश खन्ना यांनी या अभिनेत्रीसोबत केलं गुपचुप लग्न, अनेक वर्षांनंतर केला खुलासा

SCROLL FOR NEXT