Amsul Sar Recipe: सर्दी खोकल्यानं हैराण झालात? मग आमसूलाचा वाटीभर सार एकचा टेस्ट करून पाहाच

Sakshi Sunil Jadhav

हिवाळ्यातल्या वाढत्या समस्या

हिवाळ्यात किंवा हवामान बदलाच्या काळात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो. अशावेळी घरच्या घरी बनवता येणारे आणि शरीराला लगेच आराम देणारे 'आमसूल सार' अतिशय फायदेशीर ठरते. पारंपरिक पद्धतीने तयार होणारे हे सार पचन सुधारते, सर्दी कमी करते.

Amsul Sar Recipe

साहित्य

आमसूल 8 ते 9, ओलं खोबरं अर्धी वाटी, गूळ 1 वाटी, लसणाच्या पाकळ्या 7 ते 8, लाल तिखट चवीनुसार, जिरं 1/2 चमचा, हिंग ,हळद 1/2 चमचा, तूप 1 चमचा, कोथिंबीर इ.

Amsul Sar Recipe

आमसूल स्वच्छ धुवा

आमसूलाच्या बिया काढून ते वाहत्या पाण्याने नीट धुवून घ्या. यामुळे त्यातील धूळ व आंबटपणा योग्य प्रमाणात राहतो.

Amsul Sar Recipe

पॅन गरम करा

थोडेसे तूप किंवा तेल गरम करून त्यात जिरं, हिंग घाला. फोडणीची सुवासिकता साराची चव वाढवते. Amsul Sar RecipeAmsul Sar Recipe

Amsul Sar Recipe

लसूण ठेचून परतून घ्या

ठेचलेला लसूण पॅनमध्ये घालून सोनेरी रंग येईपर्यंत परतवा. लसूण सर्दी-खोकल्यावर अतिशय फायदेशीर असतो.

Amsul Sar Recipe

ओलं खोबरं घाला

खोबरं घालून दोन मिनिटे हलके परतल्याने साराची टेक्स्चर आणि चव छान तयार होते. आता अंदाजानुसार पाणी घालून मिश्रण उकळायला ठेवा. पातळ किंवा घट्टपणा आपल्या आवडीनुसार ठेवू शकता.

wet coconut benefit | yandex

आमसूल आणि गूळ मिसळा

उकळी आल्यावर आमसूल आणि गूळ घालून चांगले हलवा. गूळ चव आणि आरोग्य दोन्हीसाठी उत्तम आहे.

kokum soup

लाल तिखट व हळद घाला

तिखट चवीनुसार घाला आणि हळद मिसळून पुन्हा मिश्रणाला उकळी येऊ द्या. हळद शरीरात उब आणते. थंडीत हे नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल.

kokum soup

मिश्रणाला एक-दोन उकळ्या द्या

उकळी आल्यावर गॅस कमी करा. सार छानपणे मिसळल्याने त्याचा आंबट-गोड स्वाद अधिक खुलतो. गॅस बंद करून वरून चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम आमसूल सार तयार आहे.

kokum soup

NEXT: १०० वेळा विचार करा, ५ स्वभाच्या व्यक्तींसोबत मैत्री केल्याने पडाल खड्ड्यात? चाणक्यांनी सांगितले श्रीमंती आणि यशाचे गुपित

Chanakya Niti
येथे क्लिक करा